व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नव्हतं, नाहीतर तिथंच राजीनामा दिला असता- उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राज्यात भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तंबी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतल्याने त्यांनी फक्त समज दिली. महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता” अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.

दिल्लीमधील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी सांगितलं की, “व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतल्याने त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं. मी कधीही कोणाची बाजू घेत नाही. जर व्यंकय्या नायडू चुकले असते तर तिथेच बोललो असतो. सभापती या नात्याने घटनेला धरुनच ते बोलले. चुकीचं बोलले असते तर मीच त्यांना माफी मागण्यास सांगितलं असतं’.” ते पुढे म्हणाले, ”अनेकांनी या घटनेनंतर वाद सुरु केला आहे. माझी त्या सर्वांना वाद थांबवा अशी हात जोडून विनंती आहे. महाराजांच्या नावे आतापर्यंत भरपूर राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता” असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.

“जे घडलंच नाही त्यावरुन राजकारण सुरु आहे. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना माहिती आहे. हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याऐवजी आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस खासदाराला विचारायला हवा. शरद पवार तिथेच बसले होते त्यांना विचारा,” असं उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी ते एक महान व्यक्ती असल्याचा टोला लगावला. आपल्याकडे महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागणारे असं म्हणत आहे हे आश्चर्यचकित करणारं आहे असंही ते म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment