घोरपडीच्या तेलाने वाढते सेक्स पावर? जाणुन घ्या काय आहे सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। घोरपडीबद्दल आपण अनेकदा ऐकलं आहे वाचलंही आहे. एका ठिकाणी चिकटलेली घोरपड सहजासहजी निघत नाही हे आपल्याला माहित आहेच, पण याच घोरपडीच्या शरीराचे तेल बनवून वापरल्यास सेक्स पावर वाढते असा दावा बरेचजण करतात. यामुळेच सध्या भारतात मोठ्या प्रमाणात घोरपडीच्या कत्तली केल्या जात आहेत. जसे की, आपण सगळेच जैव विविधतेच्या साखळीत येतो. प्रत्येक सजीवाला या साखळीमध्ये एक विशेष वैशिष्ट्य आहे. एखाद्या सजीवाची संख्या कमी झाल्याने संपूर्ण साखळीवर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच आज आपण घोरपडीच्या तेलाने सेक्स पावर वाढते का यामागचे तथ्य जाणून घेऊया. 

वास्तवात घोरपडीसारखा दिसणारा सांडा पाल (मॉनिटर लिझार्ड) हा प्राणी आहे. या प्राण्याच्या शरीरात एक विशेष प्रकारचं तेल असत.  ज्यामध्ये एफ्रीडिसिया हा घटक आढळतो जो तेलासारखा दिसतो. सर्वत्र या प्राण्याला घोरपड समजून मोठ्या प्रमाणात याची कत्तल केली जाते. त्याच्या बिळातून बाहेर काढून त्याची कत्तल करून, तेल काढून ते विकले जाते. मात्र हे तेल वापरल्याने हाडांच्या समस्या दूर होतात किंवा सेक्स पावर वाढते या दाव्यांमध्येही फारसे तथ्य दिसून येत नाही. उलट हे तेल लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. 

हे तेल शरीराच्या ज्या भागावर लावले जाते. त्या भागातील त्वचा जळू शकते. त्यामुळे सेक्स पावर वाढविण्याच्या या असल्या थोतांड अफवांवर आणि दाव्यांवर विश्वास न ठेवता योग्य ते तथ्य जाणून घेऊन मगच वापर केला पाहिजे. अशाप्रकारच्या तेलाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची गुजरात आणि कच्छच्या भागात संख्या अधिक दिसून येते. याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook