महाराष्ट्र अंनिसतर्फे विवेक जागर करंडक 2020 नाट्य स्पर्धेचे आयोजन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त आंतर – महाविद्यालयीन नाट्य सादरीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

येत्या १८ ॲागस्ट ला महाविद्यालयीन तरुणांसाठी ‘विवेक जागर करंडक’ ही नाट्य सादरीकरण स्पर्धा पनवेल शाखेतर्फे घेण्यात आली आहे. शाखेचे नाट्य स्पर्धा आयोजनाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. यावर्षी कोरोना आणि सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही स्पर्धा ॲानलाईन पद्धतीने पार पडणार आहे. झूम ॲप व फेसबुकवर प्रेक्षकांना ही स्पर्धा लाईव्ह पाहता येणार आहे. ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ या थीमवर आधारित स्पर्धेसाठी विषय ‘भय इथले संपत नाही’ असा देण्यास आला आहे. सदर स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक आहे.

महाविद्यालयीन तरुणांसाठी आपलं म्हणणं सांस्कृतिक अंगाने लोकांपुढे ठेवण्याची ही उत्तम संधी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला ७ वर्ष पूर्ण होत आहेत, मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार सापडलेला नाही. डॉक्टर दाभोलकरांच्या खूनाचा निषेध करतानाच कोणत्याही प्रकारची हिंसा ही मानवतेला घातकच आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात, हा विचार समिती रुजवू पाहतेय. म्हणूनच ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे अभियान राबवले जाते. तरुणाईने हिंसा मुक्त समाजाचा विचार करावा, मानवतेचा जागर करावा यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. अधिकाधिक तरुणाईने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्कासाठी :- प्रियांका – ८६५२६१७३८२ वैभव – ८०८२६९३९०३

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com