कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. महाराष्ट्रमध्ये दर दहा लाखांमागे ४०४६ तर कर्नाटकमध्ये दर दहा लाख लोकांमागे ५०५० तपासण्या होत असल्याचं समोर आलं आहे.

भाजप आणि मित्रपक्षांची सरकारं असलेल्या ठिकाणी कोरोना तापसण्यांची संख्या ही नगण्य असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये बिहार, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. बिहारमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या तपासण्याचं प्रमाण केवळ ६१८ आहे, तर मध्यप्रदेशमध्ये २२०४ आणि गुजरातमध्ये ३३१२ इतकं आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये ५ लाखांहून अधिक तपासण्या झाल्या असून याठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी अत्याधुनिक उपचारांच्या पद्धतीचा वापरही सुरु झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment