लज्जास्पद!! चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चेन्नईचा कर्णधार धोनीला सामन्याच्या १७ व्या षटकात ११ धावांवर त्रिफळाचीत केले होते. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या षटकात २६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पहिले २ चेंडू जाधवने निर्धाव खेळले. आणि तिसऱ्या चेंडूवर धाव घेतली. पुढे रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. त्यामुळे चेन्नईला सामना गमवावा लागला.

क्रिकेटपटूच्या कुटुंबातील व्यक्तींना धमक्या देण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही क्रिकेटपटूंनी मैदानात चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यांना धमक्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडियावर विराटच्या कामगिरीवरून ट्रोल केले आहे.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा कोलकाता विरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. मात्र, आता त्याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणे हे लज्जास्पद असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com