झिवाचा गिटार वाजवत गाणं गातांनाचा व्हिडीओ व्हायरल;धोनीच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद

टीम हॅलो महाराष्ट्र। भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसा तर सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. मात्र, त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा धोनी त्याची मुलगी झिवासोबतचा फोटो किंवा व्हिडीओ आठवणीने आपल्या फॅन्ससोबत शेअर करतो. धोनी सध्या मैदानापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत मसूरी येथे सुट्टीसाठी गेला आहे. या ठिकाणचाच त्याचा मुलगी झिवासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये धोनीची मुलगी झिवा एखाद्या रॉकस्टारसारखी गाणं म्हणताना दिसत आहे. ४ वर्षांची झिवा गिटार वाजवून खूप निरागसपणे गाणं म्हणत आहे. या व्हिडीओत झिवा ‘लँड ऑफ हारमनी’ हे इंग्लिश गाणं म्हणत आहे. धोनीने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. त्याने या व्हिडीओसोबत म्हटलं, ‘बर्फ जीवामधील शानदार टॅलेंटला बाहेर आणत आहे’.

धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये झिवा अगदी लहानग्या वयातही गाणं म्हणताना गिटारही वाजवत आहे. यात ती अगदी गाण्याच्या तालानुसार गिटारवर हात फिरवत आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत या व्हिडीओला २२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com