विजयी होऊनही मुंबई चिंतेत ; कर्णधार रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या १३ व्या हंगामात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना रंगला. शुक्रवारच्या या सामन्यात मुंबईने दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहितच्या जागेवर किरोन पोलार्ड मुंबईच्या संघाचे नेतृत्व करीत होता. प्ले-ऑफच्या शर्यतीत असताना रोहितसारख्या खेळाडूचे दुखापतग्रस्त होणे मुंबई इंडियन्सला खूप मोठा धक्का आहे. मागच्या सामन्यात रोहितला थोडा ताप आणि थकवा जाणवत होता अस पोलार्ड म्हणाला. रोहित सारखा खेळाडू आणि यशस्वी कर्णधार संघाबाहेर असणं ही मुंबईसाठी खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे.

मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर रोहित आता सावरतो आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीत सुधारणा आहे. बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेनंतर टीम मॅनेजमेंटने रोहितला चेन्नईविरुद्ध सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिले आहे. कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . चेन्नईविरुद्ध सामना झाल्यानंतर रविवारी मुंबईचा सामना राजस्थानविरुद्ध रंगणार आहे. त्यामुळे तोपर्यंत रोहित संघात पुनरागमन करतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रोहित शर्मा मुंबईचा यशस्वी कर्णधार असून आत्तापर्यंत रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने तब्बल 4 वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. एक आक्रमक सलामीवीर आणि चतुर कर्णधार अशी दुहेरी भूमिका रोहित करतोय. त्यामुळे रोहित शर्मा लवकरच बरा होऊन संघात सामील व्हावा हीच मुंबईच्या चाहत्यांची इच्छा असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook