धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या लेखांची मालिका गेली 27 दिवस गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड लिहित आहेत. आज या मालिकेतला 27 वा लेख आव्हाडांनी लिहिला आहे. ‘साहेब माझे विठ्ठल’ या शिर्षकाखाली राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा या क्षेत्रांतला पवारांचा वावर यावर आव्हाड बोलते होत आहेत. आजच्या लेखातून महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड कशी झाली अन् शरद पवारांनी त्यात कशी भूमिका बजावली याचं गुपित आव्हाडांनी सांगितलं आहे.

2008 चा तो काळ होता.BCCI चे अध्यक्ष होते पवार साहेब. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता.त्यावेळी संघाचा कर्णधार राहुल द्रविड.तेव्हा पवार साहेब देखील Bcci अध्यक्ष या नात्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर होते.दौरा सुरू असताना एक दिवस अचानक राहुल द्रविड पवार साहेबांना भेटायला आला.साहेबांनी त्याला अचानक येण्याचं कारण विचारलं.द्रविड म्हणाला, “मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा..!” चालु दौऱ्यात द्रविड सारखा खेळाडू अशी मागणी करतोय हे पाहून साहेबांना थोडा धक्का बसला. यावर साहेबांनी द्रविड ला विचारले की, “इंग्लंड दौरा सुरू असताना,आणि या दौऱ्यावर तू कॅप्टन असताना असा तडकाफडकी निर्णय कसा घेता येईल..? दुसरं म्हणजे हे निर्णय मी घेत नाही.यासाठी तू निवडसमितीकडे जायला हवं..कारण हा निर्णय पूर्णतः निवड समितीचा असतो…!”

तरीदेखील द्रविडने साहेबांकडे,”मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळीक द्या,माझ्या व्यक्तिगत कामगिरीवर या जबाबदारीमुळे परिणाम होतो” हा धोशा कायम ठेवला.तो ऐकत नाही म्हटल्यावर साहेबांनी द्रविडला पर्यायी कर्णधाराच नाव सुचवायला सांगितले.द्रविडणे यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाव साहेबांना सुचवलं. साहेबांनी मग सचिनला कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल विचारलं.सचिनने देखील कामगिरीच कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास प्रांजळपणे नकार दिला.

दौरा सुरू होता आणि या दौऱ्यात संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हते.शेवटचा उपाय म्हणून साहेबांनी मग त्या दोघांनाच योग्य व्यक्तीच नाव सुचवायला सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनी मिळून एकच नाव घेतले. ते नाव होत महेंद्रसिंग.

साहेबांनी यावर विचार केला. सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू धोनी च नाव घेतायत म्हटल्यावर साहेबांनी मोठ्या विश्वासाने हे नाव निवडसमितीला सुचवलं. दिलीप वेंगसरकर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते.धोनीच्या नावावर सचिन ,राहुल आणि खुद्द Bcci अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती.निवड समितीने धोनीला कर्णधार बनवत असल्याचा निर्णय जाहीर केला..! पुढे याच महेंद्रसिंग धोनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवला.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com