चेन्नई सुपर किंग्स आयपीएल मधून बाहेर ; साक्षी धोनीने लिहिली ‘ही’ भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकवलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन यंदा निराशाजनक राहीले आहे. रॉयल चॅलेंजर बॅंगलोरला ८ विकेट्सनी हरवल्यानंतरही सीएसके प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलीय. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडीयन्सला मात दिल्यानंतर चेन्नईची प्लेऑफ संधी गेली होती. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात अस प्रथमच घडलं की चेन्नईच्या टीमने प्ले ऑफमध्ये स्थान न मिळवल नाही.

चेन्नईची ही सुमार कामगिरी पाहून फॅन्स खूपच निराश आहेत. याच दरम्यान महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षीने एक इमोशनल पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केलीय. सीएसके प्लेऑफमध्ये न पोहोचल्याबद्दल तिने ही पोस्ट केलीय. खूप भावनिक कविता तिने लिहिलेय. या टीमने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. प्रेक्षकांच्या मनात टीम नेहमीच सुपर किंग्ज राहील असं तिला यातून सांगायचंय.

हा केवळ एक खेळ आहे. तुम्ही कधी जिंकता कधी हरता. कित्येक वर्ष विजयाचे साक्षीदार बनता तर कधी पराजयाचा सामना करता. एक आनंद साजरा करत असतो तर दुसऱ्यांचं मन तुटत असतं.

काही विजय, काही पराजय दुसऱ्यांच्या लक्षात राहतात. हा एक खेळ आहे. इथे कोणी हरु इच्छित नाही. पण सर्व विजेते नाही होऊ शकत. तुम्ही विजेते होतात. तुम्ही आजही विजेते आहात. खऱ्या योद्धाचा जन्म झालाय. असे या कवितेचे बोल आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook