‘या’ कंपनी मध्ये फक्त बिस्कीट खाण्यासाठी मिळणार वर्षाला तब्बल ४० लाख रुपये पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्याला कोणताही ताण न पडताआरामात काम असणारी नोकरी मिळावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. कामाबरोबरच थोडी मज्जा, मस्ती आणि आरामही मिळावा असं सर्वांना वाटते. मात्र अशी नोकरी खरोखरच मिळू शकते का असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. नोकरीसंदर्भात सतत विचार करणारे अशी या चिंतेने ग्रस्त असणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहे कारण एक बिस्कीट कंपनी केवळ बिस्कीटांची चव घेण्यासाठी ४० हजार पाऊंड (जवळजवळ ४० लाख रुपये) वार्षिक पगार देत आहे. होय ही अफवा नाही खरोखरच स्कॉटलॅण्डमधील ‘बॉर्डर बिस्किट्स’ कंपनीने अशाप्रकारच्या नोकरीसाठी अर्ज मागवले असल्याचे वृत्त इंडिपेंडेंट या वेबसाईटने दिलं आहे.

‘बॉर्डर बिस्किट्स’ कंपनीने मास्टर बिस्किटर पदासाठी अर्ज मागवले आहेत. बिस्किटांची चव घेण्याच्या मोबदल्यात वर्षाला ४० लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. हा फूल टाइम जॉब असणार आहे. वर्षभरामध्ये ३५ अतिरिक्त सुट्ट्याही दिल्या जाणार आहेत. बिस्किटांची चव घेऊन त्यांच्या गुणवत्तेबद्दलचा अहवाल देणं हे या पदावरील व्यक्तीचे मुख्य काम असणार आहे. यासाठी मास्टर बिस्किटरला महिन्याला ३ लाख ३३ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बिस्किट निर्मितीसंदर्भातील ज्ञान असण्याबरोबरच चवीचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य असणं अत्यावश्यक असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सतत संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना या व्यक्तीने सुचवणे आवश्यक आहे असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com