गरम व्हायला लागले म्हणून महिलेने उघडला विमानातील आपत्कालीन दरवाजा आणि पंखांवरुन चालू लागली; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधीकधी लोक अशा चमत्कारी कृती करतात ज्या पाहिल्यावर त्यांच्यावर ना हसू येत नाही किंवा ना रागही येतो. एका विमान उड्डाण दरम्यान, एका महिलेने असे कृत्य केले आहे ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. जेव्हा या महिलेला विमानात गरमी जाणवत होती तेव्हा तिने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि त्यामधून बाहेर पडत विमानाच्या पंखांवरुन चालत निघाली.

द सनच्या म्हणण्यानुसार, ही युक्रेनमधील घटना आहे जिथे इमरजेंसी रिस्पोंस टीमने त्या महिलेला विमानाच्या पंखांवरुन खाली उतरण्यास सांगितले. अहवालानुसार, तुर्की येथून उड्डाण घेतल्यानंतर एक विमान युक्रेन विमानतळावर उतरले, तेथे विमानात बसलेल्या एका महिलेने आपत्कालीन दरवाजा उघडला आणि जाऊन विमानाच्या पंखांवर फिरत बसली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ही महिला विमानाच्या पंखांवर बिन्दास्तपणे चालत आहे जणू ती काही विचित्र गोष्ट नाही आणि तिने यापूर्वीही बर्‍याचदा असे केले आहे.

त्यामागील कारण विचारले असता तिने सांगितले की गरम होत होते
युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सनेही या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांच्या निवेदनानुसार विमान क्रमांक PS6212 अंतल्याहून कीवकडे जात होता. युक्रेन विमानतळावर टर्मिनल डीच्या गेट 11 जवळ थांबल्यानंतर एका महिला प्रवाशाने एका महिलेने आपत्कालीन दरवाजा उघडला आणि विमानाच्या पंखांवरुन चालण्यास सुरवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तुर्कीच्या अंतल्यामध्ये सुट्टीनंतर परत येत होती. जेव्हा विमान युक्रेनच्या कीवमध्ये उतरले तेव्हा तिला गरम होऊ लागले, त्यानंतर तिने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि पंखांवरुन चालू लागली आणि मग तिथेच बसली. या घटनेनंतर या महिलेला युक्रेन आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सने ब्लॅकलिस्ट केले. जेव्हा या महिलेला कारण विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की तिला खूप गरम होत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com