महाबळेश्वर तालुक्याच्या कोव्हीड रुग्णालयाचा घनशाघोळ :सर्वसामान्य तडफडुन सोडातयत जीव : आबा नक्की काय भानगड

सातारा प्रतिनीधी : महाबळेश्वर तालुक्यांतील कोव्हीड १९ यासंसर्ग रोगाच्या प्रादुर्भाव वाढत आहे . स्थानिक आमदार व प्रशासनाने अधिगृहीत केलेल्या बेल एअर हाॅस्पिटलने रुग्नाच्या उपचाराकरीता टांग दिल्याने . पुन्हा महाबळेश्वर तालुक्याकरीता नव्याने पाढे म्हणत स्थानिक आमदार .पुन्हा कोव्हीड १९ सासाथ रोगाच हाॅस्पिटल उभारण्याच्या शेख चिल्ली यत्रणा कामाला लागली असल्याचे पुन्हा जनतेला भासवले जात ‌आहे . महाबळेश्वर तालुक्यासह जिल्ह्यातुन अत्यावस्थेत येणारे .रुग्न पाचगणीतील बेल एअर रुग्णालय अधिगृहीत कोव्हीड रुग्णालय असताना देखील रुग्नानकडुन पैसे घेतले जात आहे .ज्या बेल एअरची लाल फित स्थानिक आमदारा मकरंद पाटील यांनी कापली . तेच ५९ बेडचे अधिगृहीत रुग्णालय सर्वसामान्यानकडुन पैसे घेवु लागले आहेत . तर पैसे न देणार्या रुग्नाना रुग्नालयाच्या दारात जीव सोडावी लागत असल्याच्या भयकरं घटना समोर घडु लागल्या आहेत.

स्थानिक आमदार व जिल्हाअधिकारी सातारा यांनी बेल एअर हाॅस्पिटल ५० बेड व आॅक्सीजन करीता अधिगृहीत केले होते . यानंतर स्थानिक आमदारांनी महाबळेश्वर तालुक्याला ५० बेडचे अत्याधुनिक आॅक्सिजनसह .सुसज्ज कोव्हीड रुग्णालय उभारलय असल्याचे सांगितले .काही दिवस बेल एेअरने रुग्नाची सेवा केली .मात्र मध्ये काय माशी शिकली अन् बेल एअरने रुग्नाना सेवा पैशांच्या मोबदल्यात द्यायला सुरवात केली असल्याची धक्कादायक सत्य समोर आले आहे .

स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासन सर्वसामान्य जनतेला चक्क फसवल आहे . पाचगणच्या अधिगृहीत केलेल्या मुजोर बेल एअर ने रुग्नाना पैसे आकारल्याने .सर्वसामान्याना आता कोव्हीड रुग्णालय नसल्याने .नवीव रुग्णालय डाॅन अॅकेडमीत उभे करत पुन्हा नवीन कुटील डाव लोकप्रतिनीधी व प्रशासन मिळुन पुन्हा जनतेला मुर्ख बनवत आहेत . डाॅन अॅकडमी येथे उभारण्यात येणार्या नवीन रुग्नालयाकरीता प्रशासन स्टाफ व कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी कोठून उपलब्ध करणार . हा एक संशोधनाचा विषय आहे .जिल्हाअधिकार्यानी अधिगंृहीत केलेले बेल एअर ने व्यवसाय माडलाय .तर स्थानिक लोकप्रतिनीधी मकरंद पाटील नवीन कोव्हीड १९ रुग्णालय उभारणार असल्याचे सांगत आहेत.

दिवसेंदिवस कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाची साथ वाढत आहेत . तर लोकप्रतिनीधी व प्रशासन “तहान लागल्यावर विहीर खेदतायत “असा सगळा घनशाघोळ महाबळेश्वर तालुक्यांत सुरु असताना .सर्वसामान्य मात्र रग्नालयाच्या दारात जीव सोडत आहेत . सर्वसामान्यांचा जीव कवडी मोलाचा तर धनदाडग्याचा मात्र लाखमोलाचा हे जळजळीत सत्य महाबळेश्वर तालुक्यांत स्पष्ट दिसु लागले आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com