सतत हेडफोन्स कानात घातल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण मुला मुलींना गाणे ऐकण्याचे वेड असते. त्यामुळे सतत त्याच्या कानात हा हेडफोन अडकवलेला असतो. कॉलेज मध्ये जाताना,बाहेर फिरताना, प्रवास करताना, कामावर जाताना किंवा अगदी घरातसुद्धा लोक हेडफोन लावून हिंडताना दिसतात. बाइक वर असल्यांवर सुद्धा सतत हा हेडफोन्स त्याच्या कानात अडकलेले असतात. आता तर अत्याधुनिक हेडफोनच्या मदतीने आपण संगीताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. म्हणजे याच कारणाने बाजारात सध्या वेगवेगळ्या हेडफोनच्या कंपन्यांची विक्री वाढली आहे. कमी किंमतीत सुद्धा सहजरित्या हेड फोन्स बाजारात उपलब्ध आहेत.

नवी फीचर्स असणारे, महागडे हेडफोन वापरायची क्रेझ वाढली आहे. हेडफोन हा जसा स्वतःच्या मनोरंजनासाठी चांगला आहे. त्याच पद्धतीने तो स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा फार घातकी आहे. कारण अनेक वेळा हेडफोन्स मुळे अपघात झाल्याचे ऐकले किंवा पहिले सुद्धा असेल कारण जर एकदा हेडफोन्स कानात गेले कि समोरचा किंवा मागचा किती हॉर्न वाजवतोय याचे भान हे हेडफोन्स घातलेल्या व्यक्तीला अजिबात नसते.

सतत हेडफोन लावून गाणी ऐकल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हाला ही तासनतास हेडफोन लावून गाणी ऐकायची सवय असल्यास वेळीच सावध व्हा, कारण, त्यातून तुम्हाला गंभीर आजारांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते. सतत इयरफोन लावल्याने कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. कानातून रक्तस्राव येऊ शकतो. काही काळाने त्याचं गंभीर आजारात रुपांतर होण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर त्याच्या अतिवापराने तुम्हाला कानाचा कॅन्सरही होऊ शकतो.

हेडफोन वापरण्यासंबंधी काही छोट्या- मोठ्या गोष्टी आपण नकळतपणे करतो. तासंतास आपण हेडफोन घालून ठेवल्याने कानामध्ये असणाऱ्या छोट्या पडद्यांवर ताण येतो तसेच ते छोटे पडदे याना होल पडण्याची जास्त शक्यता असते त्याचा परिणाम हा आपल्या कानावर पडून आपल्याला ऐकू कमी येऊ शकते. कायमस्वरूपी ऐकू न येण्याचे प्रमाण वाढू शकते. आणि पण, त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. काही वेळेला अनेकांना अशी सवय असते. कि कोणताही विचार न करता दुसऱ्या व्यक्तीचे हेडफोन वापरतात. पण, त्या व्यक्तीला जर फंगल इन्फेक्शन असेल तर ते तुम्हालाही होऊ शकतं. त्यामुळे हेडफोनचा जितका कमी वापर करता येईल त्याचा प्रयत्न करा. इयरफोन किंवा हेडफोन लावून अखंड गाणी ऐकल्याने कानाच्या पडद्यांवर दाब येऊन ते बधीर होतात. शक्यतो हेड फोन्स चा वापर करणे टाळा. गरज असेल तरच हेड फोन वापरा. त्यामुळे ऐकण्याची श्रवणशक्ती कमकुवत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com