गरोदर पणाच्या काळात तोंडाचे आरोग्य तपासणे का आहे फायदेशीर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला एक वेगळ्या वातावरणातून जावे लागते. त्या काळात त्यांना त्याच्या आरोग्याबरोबर त्यांच्या बाळाचे पण आरोग्य मजबूत राखणे गरजेचे असते. अनेक वेळा प्रत्येक महिला हि साऱ्या शरीराची तपासणी झाली तरी दात आणि तोंड याची तपासणी करत नाही पण याची तपासणी करणे फार गरजचे आहे. गरोदरपणात प्रत्येक गरोदर स्त्री ने दातांचे चेकअप्स नियमित करणे महत्त्वाचे आहे. यामुळे दातांच्या समस्या समजतात. त्यावर वेळीच उपचार करता येतात. तसंच गरोदरपणासंबंधित काही दातांच्या समस्या, लक्षणे असतील तर त्याचे निदान होण्यास देखील मदत होते.

गरोदरपणाचे पहिले तीन महिने फार गंभीर असतात. कारण याच टप्प्यात गर्भाला अवयव विकसित होत असतात. त्या काळात गर्भाची नव्याने वाढ होत असते. त्यामुळे मळमळणे, उलटी होणे असे त्रास होतात आणि हे गरोदरपणाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे आहेत. गरोदरपणात तसंच गरोदरपणात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे हिरड्यांचे विकार किंवा इन्फेकशन होण्याचा धोका असतो. त्या काळात कधी तरी दात दुखण्याच्या समस्या पण जाणवतात. त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. कोणतेही इन्फेकशन झाल्यास त्याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात गरोदर स्त्री ने इन्फेकशनपासून दूर रहावे. जास्तीत जास्त करून ब्लड इन्फेकशन झाल्यास त्याचा परिणाम वर होऊ शकतो.

कमीत कमी दिवसातून दोन वेळा ब्रश करा. सतत आपले तोंड धुवा. आणि चुळा भरा. कोमट पाण्यात मीठ घालून त्याच्या साह्याने चुळा भरा. परंतु, तुमच्या दातांचे आरोग्य तपासून, त्याचा समस्या जाणून घेऊन त्यावर कोणते उपचार करायचे हे डेंटिस्ट अधिक योग्य पद्धतीने सांगू शकतात. म्हणून दातांची कोणतीही समस्या जाणवल्यास लगेच डेंटिस्टची भेट घ्या. कारण त्यामुळे तोंडाच्या समस्यांचा गर्भावर होणारा परिणाम आपण रोखू शकतो. जर योग्य पद्धतीने काळजी नाही घेतली तर कॅन्सर सारख्या महाभंयकर आजराला सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच सावध राहिलेले बरे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook