रवा खाण्याचे आहेत ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रवा हा नाश्त्यासाठी रोजच्या आहारातील पदार्थ आहे. रव्यामध्ये प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे पौषक तत्व आहेत. तसेच कॅल्शियम, लोह, मॅगेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक असते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ए आणि डी देखील आढळते.जाणून घेऊया रवा खाण्याचे जबरदस्त फायदे….

1) रव्याचे सेवन केल्याने अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.

2) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास रवा उपयोगी आहे.
सध्या आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अत्यंत गरजेचे आहे.

3) फायबर हे वजन कमी करण्यास मदत करते. रव्याचे पदार्थ खाल्ल्‌याने पटकन भूक लागत नाही. नाश्‍त्यामध्ये आपण शिरा, डोसा, इडली करतो. रव्यामध्ये फायबर भरपूर असतात.

4) फायबर जास्त असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते.

5) रव्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असतात. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.

6) रव्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.

7) रव्याचा उपयोग टीऑक्‍सिडंट म्हणूनही केले जाते. त्यात सेलेनियम नावाचे पोषक तत्व आढळते.

8) रव्याचे विविध प्रकार बनतात शिरा, आप्पे, रव्याची बर्फी, रव्याचा उपमा, रव्याचा लाडू, डोसा, इडली इत्यादी.

9) रवा प्रमाणात खावा, अधिक खाल्यास फायबरमुळे पोट फुगण्याची शक्‍यता असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com