दिवसभर स्क्रीन समोर बसता आहात ?? ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्यासाठी डोळा हे महत्वाचे अवयव आहे.कारण डोळा हे जर अवयव नसेल तर सर्व सृष्टी दिसण्यास मदत होत नाही. तसेच अनेक कामे अडचणीची होऊ शकतात. म्हणून डोळ्याला सर्वात महत्वाचे ज्ञानेंद्रिय म्हंटले जाते.गेल्या काही महिन्यांपासून देशात आणि जगभरात कोरोनाचे संकट वाढले आहे. त्या काळात अनेक लोक घरी बसून काम करत आहेत त्यामुळे स्क्रीन चा धोका निर्माण होता हे. अनेक लोक रात्रंदिवस लॅपटॉप च्या समोर बसून काम करत आहेत. त्यामुळे त्याच्या स्क्रीन मधून निघणाऱ्या किरणांचा त्रास हा आपल्या डोळयांना सर्वात जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे डोळ्याची काळजी घेणे जास्त गरजचे आहे.

हे करा घरगुती उपाय —

–आपल्या आहारात क ,अ आणि ई या जीवनसत्त्वाचा समावेश आपल्या आहारात करून घ्यावा. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. तसेच वाढत्या वयाचा प्रभाव हा आपल्या रेटिनावर पडत नाही. त्यामुळे कमी वयात दृष्टी कमी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

— रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम सकाळी उठल्या उठल्या दररोज खावेत.

— फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आपल्या दररोज च्या आहारात असायला हवा. त्यातील केरोटीन व्हिटॅमिन मुळे डोळ्यांची क्षमता वाढण्यास मदत होते.

— वेलची दुधात टाकून पिल्याने डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यातील शक्ती वाढण्यास मदत होते. आणि त्याच पद्धतीने डोळ्याला थंडावा मिळतो.

–नियमित अक्रोडाचे सेवन करावे. त्यात असलेल्या जीवनसत्वामुळे डोळ्यातील पेशी मजबूत होण्यास मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com