अपचन झाल्यास ‘या’ घरगुती सोप्या उपायांचा करा वापर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा लोकांना आपल्या ताण तणावामुळे झोप लागत नाही . तर कधी कधी कामाचे टेन्शन यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे कधीकधी खाल्लेले अन्न पचत नाही. कधी कधी बाहेरच्या गोष्टी जास्त आहारात आल्या तर फूड पोंझिनिग होऊन आपण खाल्लेले अन्न पचत नाही. जेव्हा अन्न योग्य पचन होत नाही तेव्हा पोटात जडपणा जाणवतो. करपट, आंबट ढेकर येतात याला अपचन म्हणतात. अनेक लोकांना घाईत जेवण करणे याची सवय असते. काही वेळेला मसालेदार पदार्थ खाणे, अपुरी झोप, मद्यपान करणे, ताणतणाव असणे.अशा गोष्टीमुळे अपचनाचा त्रास आपल्याला होत असतो जेव्हा अपचन होते तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटते. याचसाठी आज आपण अपचनावर घरगुती कोणते उपाय केले जातात हे पाहणार आहोत.

— अपचनाचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४ ते ५ तुळशीची पाने चावून खा. किंवा तुळशीच्या पानांचा रस तयार करा आणि तो मधासोबत खा.

— अनेक वेळा आपल्या घरात जर आजी लोक असतील तर त्यांच्या आयुर्वेदीक बटव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आढळतात. योग्य पचन न झाल्यास ओवा खाल्ला जातो. पोटात दुखत असेल तर सुद्धा ओवा हा खाल्लं जातो. अपचन झाल्यास ओवा घरात भाजून ठेवा रात्री जेवण झाल्यावर अर्धा चमचा भाजलेला ओवा थोड्याश्या काळ्या मिठाबरोबर चावून खा. त्यावर कोमट पाणी प्या. या उपायाने अपचन जाणवणार नाही.

— पुदिना हा सुद्धा पोटाच्या विकारासाठी चांगला आहे. अपचनामुळे अस्वस्थ वाटत असेल तर पुदिन्याचा चहा चांगला उपाय आहे. पुदिन्याची काही पाने पाण्यात टाकून एक उकळी द्या. हे पाणी चहासारखे प्या. याने तोंडाला चव देखील येईल व खाल्लेले अन्न लवकर पचेल.

—- अपचनापासून आराम हवा असेल तर सर्वात सोपा व प्रत्येकाला करण्यासारखा उपाय म्हणजे पाण्याचे योग्य नियोजन. जेवण करताना पाणी पिऊ नये. दिवसभरात कमीत कमी ५ ते ७ लिटर इतके पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

— अनेकांना आहारात जर मसाल्याचे पदार्थ नसतील तर जेवण जात नाही. पण जास्त प्रमाणात जर मसाल्याचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला पोट दुखीचा आजार होऊ शकतो. खूप जड व मसालेदार अन्न खाल्ले असेल तर लिंबू व आलं उपयोगी पडेल. थोडस कोमट पाणी करून त्यात दोन चमचे लिंबाचा रस व थोडा आल्याचा रस मिसळा. हा सरबत रात्री जड अन्न खाल्ल्यावर प्या . त्यानंतर तुमचे सारे खाल्लेले पचन होईल . बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com