हाताच्या समस्यांविषयी असणारे व्यायाम

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा कधी कधी जाड वस्तू उचलल्यामुळे किंवा जाड कोणत्याही प्रकारचे काम हे हाताच्या साहाय्याने केल्याने हात दुखू लागला असता, त्यावर अनेक घरगुती उपाय करूनही आपल्याला पाहिजे तसा फरक किंवा हात दुखणे काही केल्यानं कमी होत नाही . त्यावेळी घरगुती व्यायाम केल्याने हात काही प्रमाणात कमी दुखू शकतो. बैठे काम करणार्‍या व्यक्तींनी मध्ये मध्ये हातांना आराम देणारा व्यायाम केला पाहिजे. संगणकावर काम करणार्‍यांच्या हाताचे कोपरे बर्‍याच कालावधीसाठी एकाच स्थितीत राहतात. अशाने हाताचे स्नायू आखडून दुखण्याचा त्रास होतो. त्यासाठी कोणते व्यायाम करणे आवश्यक आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

व्यायाम १

  • दोन्ही हात समोर करत आरामात बसावे.

  • दोन्ही हात सावकाशपणे मागे घ्या. हातांवर दाब असल्याप्रमाणे मागे घ्या. या वेळी हाताची बोटे वरच्या दिशेने असावीत.

  • आता पंजांना खालच्या दिशेने झुकवा. बोटांची दिशा जमिनीच्या बाजूने असावी.

  • हा प्रकार करताना मनगट एकदम सरळ असावे.

व्यायाम २

  • आरामदायी स्थितीत बसा

  • आता उजव्या हाताची मूठ बांधा आणि अंगठय़ाला इतर बोटांच्या मदतीने दाबा

  • आता बंद मुठीला हळूहळू फिरवा. या वेळी कोपरा आणि हात एका रेषेत सरळ असेल याकडे लक्ष द्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook