मधुमेहाचा त्रास आहे?? मधुमेह नियंत्रित करणारे ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा –

१] तुळशीची पाने –

तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडेंट आणि तेल असते. त्यामुळे शरीरात युजेनॉल, मेथल युजेनॉल आणि कॅरियाफोलिनच्या वाढीस मदत होते. या घटकांमुळे पँकिअँट्रिक बीटा सेल्सचे (इन्सुलिनचा साठा व नियंत्रण करणाऱ्या पेशी) कार्य सुरळीत होऊन इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढते. तसेच तुळशीच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट्समुळे तणावावर नियंत्रण राहण्यास मदत होते.

रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 2-3 तुळशीची पाने किंवा एक टेबलस्पून तुळशीच्या पानांचा रस प्यावा.

२] ब्लूबेरीची पाने –

आयुर्वेदानुसार शेकडो वर्षांपासून मधुमेहावर नियंत्रण करण्यासाठी ब्लूबेरीची पाने वापरतात. ब्लूबेरीच्या पानांमुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. जर्नल ऑफ न्युट्रिशननुसार बिलबेरीच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँथोसायनिडिन असते. यामुळे ग्लुकोज ट्रान्सपोर्टेशन आणि फॅट मेटॅबॉलिझमसाठी प्रोटिन्स वाढण्यास मदत होते.

बिलबेरीची पाने खलबत्यात कुटून अनशेपोटी दररोज 100 मिलीग्रॅम खावीत.

३] दालचिनी –

दालचिनीमुळे इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. दररोज अर्धा टिस्पून दालचिनीची पावडर खाल्याने इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून वजन नियंत्रित राहते. हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे.

एक महिनाभर दररोजच्या आहारात 1 ग्रॅम दालचिनीचा समावेश केल्यास रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

४] ग्रीन टी –

ग्रीन टी अनफरमेंटेड असून त्यात पॉलिफिनॉल हा घटक मुबलक असतो. पॉलिफिनॉलमधील अँटिऑक्सिडंट आणि हायपोग्लेसिमिक गुणधर्मांमुळे रक्तातील शर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते व इन्सुलिनचे कार्य सुरळीत होते.

गरम पाण्यामध्ये ग्रीन टीची बॅग 2-3 मिनिटे बुडवून ठेवा. टी बॅग काढून चहा प्या. ग्रीन टी तुम्ही सकाळी किंवा जेवणानंतर घेऊ शकता.

५] कारले –

कारल्यामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. कारले मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. कारण त्यामधील कॅराटिन आणि मोमोर्डिसीन हे घटक रक्तातील शर्करेची पातळी  नियंत्रित राहण्यास मदत करतात.

आठवड्यातून किमान एकदा कारल्याची भाजी खावी. लवकरात लवकर शर्करा नियंत्रणात आणण्यासाठी एक एक ग्लास कारल्याचा रस तीन दिवस अनोशा पोटी घ्यावा.

6] शेवग्याची पाने –

शेवग्याच्या पानांमध्ये ऊर्जा वाढवण्याची क्षमता असते. शेवग्याच्या पानांमुळे अन्नाचे पचन होऊन रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

शेवग्याची काही पाने धुवून त्यांचा रस काढावा. हा रस दररोज सकाळी अनशेपोटी ¼ कप घ्यावा. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

७]कडुलिंब –

भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या या झाडाच्या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत. कडुलिंबाच्या पानांमुळे इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढते. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्तातील शर्करेची  पातळी  नियंत्रित राहते. हायपोग्लायसोमिक औषधांची गरज कमी होते.
अनशेपोटी कडुनिंबाच्या पानांचा रस प्यावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com