दीर्घायुषी होण्याचे रहस्य , जाणून घ्या …

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

टीम, HELLO महाराष्ट्र । आयुष्यात कितीही दुःख आले तरीही प्रत्येकाला आपण खूप जगावं असाच वाटत . पण दीर्घायुषी होण्याचे रहस्य हे आरोग्याशी नाही तर मनाशी जोडलेले आहे … लहानपणापासून आपण समाजाने घातलेल्या नियमांच्या चौकटीत जगतो . शिक्षण , नोकरी , लग्न , संतती आणि मृत्यू यात आयुष्य कुठे हे मात्र शोधतच राहतो . म्हणूनच प्रत्येकाला दीर्घायुषी व्हावं अस वाटत . म्हणूनच दीर्घायुषी होण्यासाठी काय करायला हवा हे आज आपण पाहणार आहोत .

life-317x160

रोजची धावपळ आपण करतो ते भविष्य घडवण्यासाठी, आणि नेहमी भविष्याच्या भीतीने वर्तमान देखील खरा करतो. रोज नोकरी, घर , स्वयंपाक, मुलं अशा दिनक्रमात हरवून जातो. आपल्याला काय आवडत ? आपले छंद काय हे देखील आपल्या लक्षात नसते.

या मार्गाने आयुष्य जगा आणि व्हा दीर्घायुषी …

१. दिवसातून काही वेळ एकटे राहा . स्वतःशी बोला , आत्मचिंतन करा

२. शाळा ,महाविद्यालयीन आयुष्यातील वह्या पुस्तके चाळा, त्यातून तुमच्या जुन्या आठवणी आणि तुमचे छंद पुन्हा सापडतील . या छंदांना आठवड्यातून किमान एकदा थोडा वेळ द्या .

३. रोज ८ तास झोप घ्या. लवकर उठून किमान ३० मी व्यायाम करा . मोकळ्या हवेत फिरायला जा . स्वच्छ सूर्यप्रकाशात बसा.

४. जोडीदाराशी प्रेमळ संवाद साधा, वादाचे विषय काढूच नका. चुका विसरून स्वभाव आहे तसा समजून घ्या . एकमेकांचे कौतुक करा त्यातून स्नेहबंध वाढतो . जोडीदाराशी मानसिक नातं आणि सेक्स लाईफ परिपूर्ण असणे देखील आयुष्यातले मोठे सुख आहे .

५. कामातला तोच तोचपणा नैराश्य आणतो . त्यामुळे घरातील कामामध्ये कधीतरी मदत करा . अगदी सोपी आणि आवडतील अशी कामे केली तरी चालतील . पुरुषाने घरातील कामे करू नये आणि स्त्रीने चूल आणि मूल सांभाळावे हा या समाजाने घातलेला नियम मोडीत काढा . घरासाठीच पुरुष कमावतो आणि स्त्री त्या वास्तूला घर बनवते त्यामुळे कामांमध्ये बदल केल्याने पुरुषार्थ कमी होतो किंवा स्त्री मॉडर्न होते हि मानसिकता बदला.

६. अगदी पृथ्वीवर मानवी आयुष्य सुरु झाले तेव्हा पासून सौन्दर्य खुलवणे हे स्त्रियांना आवडते . त्यात आता पुरुषही मागे नाहीत. स्वतःच्या सौन्दर्याला वेळ द्या . पार्लरला जाणे आणि खरेदी करणे हे जरी नेहमी जमत नसेन तरी घरगुती उपायांनी सौन्दर्य खुलवण्याचा प्रयत्न करा . नेहमीची हेअर स्टाईल , कपड्यांची पद्धत यात वेळोवेळी बदल करा .

७. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करणे देखील दीर्घायुषी होण्याचा मार्ग आहे .आपले काम एन्जॉय करता आले पाहिजे .

८. घरातली सेटिंग देखील बदल करत राहा .

९. मित्र परिवाराशी मनसोक्त गप्पा मारा .

१०. दरवर्षी एखादी मोठी सुट्टी घेऊन फिरायला जा. निसर्गसानिध्यात वेळ घालवा. दर महिन्याला जवळ का होईना फिरायला जा .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com