रेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360 रुपयांत ; राज्य शासनाने निश्चित केले दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन योग्य किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले असून फक्त २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य किंमतीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध असले तरी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत होती. त्याचीच दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसिव्हीर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत.

राज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook