धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब

अमरावती प्रतिनिधी | राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. विदर्भात अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाणही अधिक आहे. खबरदारी म्हणुन प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. अशात आता एका तरुणीचा कोरोना चाचणीसाठीचा स्वॅब गुप्तांगामधून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे सदर घटना घडली आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

बडनेरा येथील एक तरुणी कोरोना चाचणी करण्याकरता दवाखाण्यात गेली होती. त्यावेळी तिचा स्वॅब घेण्याकरता तिला एका रुममध्ये घेऊन जाऊन तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर तिचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. मात्र स्वॅब घशातून घेतात याची माहिती असल्याने तरुणीने सदर प्रकार आपल्या भावाला सांगितला. भावाने पडताळणी केली असता स्वॅब घशातूनच घेतला जातो अशी माहिती मिळाली. त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार केली. तपासणीवेळी स्वॅब घेणार्याने तरुणीला मैत्रीसाठी मेसेज केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, बडनेरा पोलिसांनी लॅब टेक्निशियनला अटक केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला कडक शिक्षा देण्यात येईल असं ठाकूर यांनी सांगितले आहे. अमरावतीच्या खासदार नवणीत राणा कौर यांनीही अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com