कोरोनाचा शोध घेण्यासाठी ‘हे’ स्मार्ट हेल्मेट तयार; संपूर्ण शरीर होणार स्कॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी जगभरात आधुनिक साधने वापरली जात आहेत. अशातच इटलीमध्ये कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर सुरू झाला आहे. या स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्क्रिनर बसविण्यात आले आहेत.

स्मार्ट हेल्मेट कोरोना विषाणूची तपासणी करेल
रोम विमानतळावरील प्रवाशांना या स्मार्ट हेल्मेटच्या तपासणीतून जावे लागेल. कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. या आधुनिक उपकरणाद्वारे विमानतळावरील प्रवाशांचे आणि कर्मचार्‍यांचे तापमान तपासले जाईल. त्यातील कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर प्रवाशांच्या शरीराच्या तापमानातील चढउताराची नोंद घेतील. सुरक्षा अधिकारी हे स्मार्ट हेल्मेट घालून विमानतळावर लोकांना स्कॅन करतील. हे हेल्मेट त्याच्या आसपास हजर असलेल्या लोकांचा चेहरा स्कॅन करेल. तसेच, सात मीटर अंतरावर उपस्थित असलेल्या व्यक्तीचे तापमान देखील सांगेल. हे हेल्मेट प्रवाशांच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सम्पूर्ण शरीराचे स्कॅन करेल.

७ मीटरच्या परिघात असलेल्या रुग्णांस ओळखले जाईल
असे स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञान वापरणारे रोम हे युरोपमधील पहिलेच शहर बनले आहे. मात्र , यापूर्वीही, संयुक्त अरब अमिराती आणि चीनमध्ये यांसारख्या आधुनिक डिव्हाइसचा वापर केला गेला आहे. अधिकाऱ्यांना अशी आशा आहे की या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवासी त्यांच्या घरी सुखरुप आणि आरामात जाऊ शकतील. हवाई मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे शरीर गरम किंवा ताप असल्यास त्यांना उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुढच्या महिन्यापासून रोम विमानतळावरून बरीच उड्डाणे सुरू होणार आहेत. या स्मार्ट हेल्मेटची रचना इटली आणि चीनमधील काही अभियंत्यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment