कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

यूएन राईट्स चीफ मिशेल बॅशलेट यांनी नुकतेच एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आशियाई देशांमध्ये त्यांच्या सरकारविरोधात आवाज उठविणार्‍या लोकांवर अत्याचार केले जातात. याबरोबरच त्यांना अटकही केली जात आहे. तसेच, लोकांना तुरुंगात डांबूनही ठेवले जात आहे. मात्र हे , पीडित लोकं केवळ माहिती आणि सूचनाच शेअर करत होते.

 

आशियाच्या १२ देशांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन
मिशेल म्हणाल्या की,’ बांगलादेश, कंबोडिया, चीन, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ, म्यानमार, फिलीपिन्स, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएनाम अशा देशांमध्ये लोकांना अटक केली जात आहे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत ​​आहेत. मात्र, प्रेस आणि सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती आणि अफवा पसरविल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

अल्पसंख्याकांविरूद्ध द्वेष पसरविणे चांगले नाही
यूएनचे उच्चायुक्त मिशेल म्हणाल्या की, ‘ चुकीची माहिती थांबविणे महत्वाचे आहे जेणेकरुन सर्वसामान्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जाऊ शकते. परंतु अल्पसंख्यांकांच्या नावावर द्वेष किंवा कारवाई पसरवणे योग्य नाही.

मिशेल बॅशलेट म्हणाल्या की, सरकारांना कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहे जेणेकरून चुकीची माहिती आणि अफवा पसरु नयेत, मात्र त्यांनी समाजातील प्रत्येक भागात संवेदनशीलता आणि कृतीची तीव्रता लक्षात घेऊन पावले उचलली पाहिजेत. मिशेल बॅशलेट म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या साथीच्या नावावर माहिती, प्रवाह आणि मुक्त अभिव्यक्तीच्या उत्स्फूर्त देवाणघेवाणीवर बंदी घालू नये. मिशेल यांना चीनचा खूप राग आला आहे.

या देशांमध्ये परिस्थिती अधिक वाईट आहे
मिशेल म्हणाल्या की डझनहून अधिक वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य लोकांना चीनमध्ये ताब्यात घेतल्याची माहिती मला मिळाली आहे. काहींवर सोशल मीडियावर आपली मते किंवा माहिती शेअर केल्याचा आरोप आहे किंवा त्यांनी सरकारच्या कामकाजाच्या अडचणींबद्दलची माहिती लोकांना शेअर केली आहे.

मिशेल म्हणाल्या की, भारतातही कोरोना संकटकाळात काही पत्रकार आणि डॉक्टरांवर जाहीरपणे भाषण केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. तर इंडोनेशियात ५१ जणांवर फौजदारी खटले सुरू आहे. त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी फेक बातम्या पसरवल्या.

कंबोडियात ३० लोकांना अटक करण्यात आली आहे. ज्यात एक १४ वर्षाची मुलगी देखील आहे. त्यांच्यावर आरोप आहे की ते कोरोना विषाणूबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटी माहिती शेअर करत होते.

त्याच वेळी व्हिएतनाममधील ६०० हून अधिक फेसबुक युझर्सना कोरोना विषाणूची माहिती ऑनलाइन शेअर करण्याविषयी विचारले गेले आहे. मिशेल म्हणतात की, अशा वाईट काळात वैद्यकीय व्यावसायिक, पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते आणि सामान्य लोकांना त्यांचे शब्द मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment