बिहारमध्ये झालेल्या बस-ट्रकच्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l मजुरांच्या अपघातांचे सत्र सुरू असताना त्यात पुन्हा एका अपघाताची भर पडली आहे. बिहारमध्ये असणाऱ्या बागलपूर येथे झालेल्या अपघातात 9 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात अनेक मजूर हे जखमी झाले आहेत. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

याबाबत अधिक माहिती अशी की हा ट्रक अनेक मजूरांना घेऊन जात होता. तेवढ्यात बागलपूर येथे या ट्रकचा आणि बसचा भीषण अपघात झाला. त्यात ट्रक पलटी होऊन दरीत कोसळला. त्यात 9 मजूर जागीच ठार झाले. तर अन्य काही मजूर जखमी झाले. या जखमींना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान आज सकाळी महाराष्ट्रामध्येही यवतमाळ जवळ मजुरांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर १५ जखमी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment