आता 3D न्यूज अँकर सांगणार टीव्हीवर बातम्या; चीन मध्ये पहिला प्रयोग यशस्वी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील पहिली थ्रीडी न्यूज अँकर चीनमध्ये नुकतीच लाँच करण्यात आली आहे. चीनमधील एका सरकारी वृत्त संस्थेने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामगिरी केली आहे. थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली ही जगातील पहिली न्यूज अँकर बनली आहे.

चिनी सरकारी न्यूज एजन्सीने सिन्हुआमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या एका 3D न्यूज अँकरचा नुकताच समावेश केला आहे. व्हर्च्युअल प्रेझेंटर्सच्या जगतामध्ये ही 3D न्यूज अँकर एक अनोखा प्रयोग ठरली आहे. ही अँकर मोकळेपणाने फिरू शकते तसेच चेहर्‍यावरील हावभावही करू शकते. ती आपल्या केसांची तसेच पेहरावाची स्टाईल देखील बदलू शकते. मिळालेल्या रिपोर्टसनुसार भविष्यात बातम्या सादर करण्यासाठी याचा उपयोग केला जाईल.

 

या 3D न्यूज अँकरला बनवणारी कंपनी असे म्हणते की,” ती मानवी आवाजाची नक्कल करू शकते. चेहरा तसेच ओठांचे हाव-भाव ओळखू शकते. आपली स्टाईल देखील बदलू शकते. यापूर्वी २०१८ मध्ये सिन्हुआने ‘क्यू हाव’ या नावाने न्यूज वर्ल्डमध्ये डिजिटल अँकर आणले होते. आवाज, चेहर्‍याची हालचाल आणि वास्तविक न्यूज अँकरच्या हावभावाची नक्कल करण्यासाठी त्यांनी मशीन लर्निंग टेक्निकचा उपयोग केला. येत्या काही दिवसांतच ही 3D न्यूज अँकर अनेक प्रसंगी स्टुडिओबाहेरच्या ताज्या बातम्या वाचताना दिसू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment