कोरोनामुळे लग्न लावायला पंडित मिळेना; महिला पोलिस अधिकार्‍यांनेच लावून दिलं लग्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे.अशा परिस्थितीत अनेक लग्नें पुढे ढकलण्यात आली आहेत. आणि ज्या लोकांना लग्न करायचे आहे अशांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात लॉकडाउन मुले जिथे पंडित मिळाला नाही तिथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अंजली अग्निहोत्रीने पंडितची भूमिका साकारून वधू-वरांसह लग्नाचे विधी पूर्ण केले.ही घटना गोटेगाव तहसीलमधील झोदेश्वर शहरातील. श्रीनगर येथे राहणारे लक्ष्मण चौधरी यांचे लग्न नरसिंगपूरच्या इतवारा येथील ऋतू हिच्याशी ठरले होते. प्रशासनाने या दोन्ही कुटुंबांना हे लग्न करण्याची परवानगी दिली होती, पण त्यांना पंडित मिळत नव्हता. मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच हा विवाहसोहळा पार पडणार होता.

लग्नाच्या विधी पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणताही पंडित मिळाला नाही. त्यानंतर लोकांनी उपनिरीक्षक अंजलीला पंडितची भूमिका साकारण्याची विनंती केली कारण अंजली या ब्राह्मण कुटुंबातील आहेत.त्याही अगदी आनंदाने तयार झाल्या आणि वैवाहिक विधी पार पाडला.अंजली या पोलिसी ड्रेसमध्येच होत्या आणि तेथील सर्व लोकांनी मास्क देखील घातलेला होता.

या लग्नाबाबत अंजली म्हणतात की त्या गस्तीवर होत्या, त्यादरम्यान त्यांना मंदिरात काही लोक जमलेले दिसले.त्यांना प्रशासनाची परवानगी मिळाली आहे परंतु पंडित न मिळाल्याने निर्माण झालेल्या समस्येची माहिती त्यांना दिली आणि लग्नात सहकार्य करण्याची विनंती केली आणि मी ते मान्य केले कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच सर्वांना सहकार्य करण्याचे निर्देश दिलेले आहेत. काही मंत्रांच्या आधारे त्यांनी त्या जोडप्यांवर वैवाहिक संस्कार केले.ज्याविषयी माहिती नव्हती ती गुगलवरून घेतली आणि हवन कुंड नसल्याने त्यांनी दिवा वापरला.

विशेष म्हणजे कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपुष्टात येईल. लॉकडाऊन आता ३ मे ते १७ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणालाही लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याची परवानगी नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment