अभिमानास्पद! मेजर सुमन गवानी बनली UN कडून सन्मानित होणारी पहिली आर्मी अधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात मेजर असलेल्या सुमन गवानी यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) वतीने प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यूएनचे महासंचालक अँटोनिया गुतारेशे यांनी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मेजर सुमन यांना हा पुरस्कार इंटरनेशनल डे ऑफ यूनाइटेड नेशंस पीसकीपर्स निमित्त देण्यात आला. लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

२०१८ ते २०१९ दरम्यान सुदानमध्ये पोस्टिंग
मेजर सुमन गवाणी यांनी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात (यूएनएमआयएस) काम केले आहे. सन २०१९ पर्यंत तिला येथे पोस्ट केले गेले होते. शुक्रवारी न्यूयॉर्कमधील यूएनच्या मुख्यालयात आयोजित एका ऑनलाइन समारंभात या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. मेजर सुमन व्यतिरिक्त ब्राझिलियन नेव्ही अधिकारी कार्ला मॉन्टरिओ डी कॅस्ट्रो अराझो यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यूएनच्या वतीने हा सन्मान मिळाल्यानंतर मेजर सुमन म्हणाल्या, ‘ काम, पद किंवा रँक काहीही असो, मात्र शांतिदूत म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या कामात महिला आणि पुरुष या सर्वांचे विचार आणि दृष्टीकोन समानपणे समाविष्ट करा. ‘ मेजर सुमन नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ पर्यंत युएनएमआयएस मध्ये सैन्य निरीक्षक म्हणून तैनात होत्या.

मेजर सुमन यांना हा सन्मान का देण्यात आला
मिशनमध्ये लष्करी निरीक्षकांसह लैंगिक हिंसाचाराविरूद्धच्या मोहिमेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा गौरव झाला आहे. यासह, लैंगिक समस्यांकडे लक्ष देण्याची त्यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. पहिल्यांदाच भारतीय सैन्याच्या एखाद्या अधिकाऱ्याला यूएनच्या या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे की, “या अधिकाऱ्याने लिंग संतुलन राखण्यासाठी लष्करी गस्तीत सहभागी होण्यास प्रोत्साहित केले; फील्‍डवरील कठीण परिस्थितीतही ती आपल्या कर्तव्यापासून मागे हटली नाही,”. सैन्याच्या वतीने असे सांगितले जात आहे की,’ मेजर सुमनची निवड नैरोबीतील यूएनच्या वेगवेगळ्या मंचांवर लैंगिक हिंसाचाराशी संबंधित ट्रेनिंग कार्यक्रमांसाठी झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment