येरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवारांना ईडीने नुसती नोटीस दिली तर इतकी त्यांची घालमोल झाली. आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन आम्हाला येरवड्यात टाकले तेव्हा आमची काय हालत होती, ते तुम्हाला काय समजणार? आता जमलंच तर तुम्हीही येरवड्याची हवा खाऊन या अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली. राज्यात विरोधी पक्ष आता फक्त नावाला शिल्लक असून त्यांना नक्की काय करायचंय हेच समजेना झालंय. निवडणुकीच्या आधी कितीही ओरडलं तरी ५ वर्षांच्या कामाचाच जनता विचार करणार असल्याचं खोत यावेळी म्हणाले.

शरद पवार स्वतःला पुरोगामी समजतात ना, मग त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी महात्मा गांधींना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्याठिकाणची खोली घ्यावी आणि निवांत आराम करावा असंही खोत पुढे म्हणाले. पंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Leave a Comment