लडाख मध्ये लपलाय ‘हा’ खजिना ज्याच्यावर आहे लाल ड्रायगनची नजर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळ चीन हा लडाखवर नजर ठेवून आहे. काहीही झाले तरी त्याला येथे कब्जा करायचा आहे, पण भारताच्या कठोर भूमिकेमुळे त्याची ही युक्ती यशस्वी होऊ शकलेली नाही. अलीकडेच पुन्हा एकदा चिनी सैन्याने एलएसी लाइन ओलांडली आणि भारतीय सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. मात्र, लडाखवर चीनची नजर येथे लपलेल्या खजिण्यासाठीच आहे हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे.

सामरिक तसेच आर्थिक दृष्टीने चीनसाठी लडाख हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण असे म्हटले जाते की इथले पर्वत हे युरेनियम, ग्रॅनाइट, सोने तसेच रेअर अर्थसारख्य मौल्यवान धातूंनी परिपूर्ण आहेत आणि त्यामुळे चीन त्यांच्यावर डोळा ठेऊन आहे. ज्या गलवण क्षेत्रासाठी चीन आणि भारत यांच्यात वाद सुरू त्याच्या अगदी जवळच असलेल्या गोग्रा पोस्टच्या जवळ ‘गोल्डेन माउंटन’ आहे. असे म्हणतात की या डोंगरावर सोन्याचे बरेच साठे आहेत, ज्यामुळे ड्रॅगन वारंवार इथे घुसखोरी करण्यात गुंतला आहे.

यासह लडाखच्या बर्‍याच भागात उच्च दर्जाचा युरेनियम साठा सापडला आहे. ज्याद्वारे केवळ अणुऊर्जा नाही तर आण्विक बॉम्ब देखल बनवता येतील. २००७ मध्ये जर्मनीने लडाखमधील काही पर्वतांचे नमुने घेतले होते. त्यामध्ये ५.३६टक्के युरेनियम जमा असल्याचे आढळून आले. ते देशातील इतरत्र सापडलेल्या युरेनियमच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. तेव्हापासून चीनचे या जागेकडे लक्ष आहे आणि त्याला ते आपल्या ताब्यात घ्यायचे आहे.

युरेनियमचा वापर अणुबॉम्बसाठी केला जातो
अलीकडेच चिनी तज्ञांनी अमेरिकेशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अणुबॉम्बची संख्या वाढवून १००० करण्याची घोषणा केली आहे. एका अंदाजानुसार सध्या चीनकडे जवळपास २६० अणुबॉम्ब आहेत. जर चीनला १००० अणुबॉम्ब बनवायचे असल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर युरेनियमची आवश्यकता भासु शकते. अशा परिस्थितीत चीन येथून युरेनियम काढून आपल्या अणुबॉम्ब वाढविण्यामध्ये मोठे यश मिळवू शकतो.

अरुणाचलच्या सीमेवर सोन्या आणि चांदीचे साठे
अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर चीनने सोन्याचे उत्खनन केले आहे. त्याला हे सोने तिबेटमधील युलामेड गावात सापडले आहे. असे म्हटले जाते की या भागातून बरेच सोने, चांदी आणि रेअर अर्थ खनिजे सापडली आहेत, ज्याची किंमत सुमारे ६० अब्ज डॉलर्स एवढी आहे. ते काढण्यासाठी चीनने बोगदे बनविले असून उत्खननानंतर हजारो ट्रक येथे नेले जातात. चीनने या संपूर्ण प्रदेशात रस्ते आणि विमानतळांचे जाळेही तयार केलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment