आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी दिल्लीची जनता आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करीत आहोत असे ट्विट केले आहे.

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. मुंबईच्या मार्गावरून ते आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने जाते आहे. या पातळीवर राज्य प्रशासनाने नागरिकांना दोन दिवस घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच काय करावे आणि काय नाही याची यादीही जाहीर केली आहे. अद्याप ज्या ठिकाणी वादळाचा तडाखा बसण्याचा धोका आहे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कामही सुरु आहे. एनडीआरएफ च्या टीमदेखील तैनात आहेत. या कठीण समयी अरविंद केजरीवाल यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे.

 

केजरीवाल यांच्या ट्विट ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या साहस आणि धाडसाने या परिस्थितीवर मात करेल असेही मुख्यमंत्र्यांनी त्याच्या ट्विट मध्ये लिहिले आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळ आता भूपृष्ठावर आदळले असले तरी अद्याप जीवित हानी झालेली नाही. मात्र बऱ्याच ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. झाडे कोसळली आहेत. विजेचे खांब पडले आहेत. तर काही परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. आता हे वादळ उत्तरेकडे गेले असून ते नाशिक तसेच इतर भागात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment