Tuesday, March 21, 2023

प्रेमाविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाला विवस्त्र करून बेदम मारहाण

- Advertisement -

औरंगाबाद | जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा येथे गावातल्या मुलीसोबत प्रेमाविवाह केल्यामुळे एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खुलताबाद तालुक्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.

किशोर साहेबराव चव्हाण असे त्या तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वी किशोर साहेबराव चव्हाण यांनी गावातील एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तो गाव सोडून कन्नड येथे राहत होता. 2 जुलै रोजी आईला भेटण्यासाठी तो गावात आला होता. त्यावेळेस गावातील मुलीच्या नातेवाईकांनी त्याला पकडून विवस्त्र केले आणि बेदम मारहाण केली. त्यात तो प्रचंड जखमी झाला आहे. मारहाणी नंतर मरणासन्न अवस्थेत त्याला गावाच्या बाहेर टाकून देण्यात आले.

- Advertisement -

मुलाच्या नातेवाईकांना घडलेला प्रकार समजताच त्यांनी त्याला खुलताबादला उपचारासाठी दाखल केले.नग्न करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. उपचारानंतर तो परत कन्नड येथे गेला. विवस्त्र करून मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी अद्याप खुलताबाद पोलिसांनी कोणत्याही आरोपीवर कारवाई केलेली नाही.