नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सीजन टँक लिक…आतापर्यंत २२ रुग्ण दगावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत नाशिकच्या महापालिका आयुक्तांच्या माहितीनुसार किमान १० ते ११ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते ते दगावले अशी माहिती मिळाली होती. मात्र नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २२ रुग्ण दगावले असल्याची माहिती मिळाली आहे.  या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅंक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला होता. या दरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे लिंक झालेला ऑक्सिजन टॅंक हा 20 KL क्षमतेचा होता. या घटनेनंतर मात्र रुग्णालय परिसरात एकच धावपळ सुरू झाली. हॉस्पिटल प्रशासन या आपत्तीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र हॉस्पिटल मधील पेशंट सहित त्यांचे नातेवाईक हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत अशी माहिती मिळत आहे.

नाशिकमधील टँकच्या वाल्व गळतीमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. त्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे रुग्णालयात निश्चितच परिणाम झाला असावा परंतु अद्याप मी अधिक माहिती गोळा करीत आहे. अधिक माहिती गोळा केल्यानंतर आम्ही एक प्रेस नोट जारी करू अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

BIG BREAKING : नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सीजन टँक लिक… 11 रुग्ण दगावले**पा Video

Leave a Comment