लहान व्यावसायिकांसाठी OYO ची खास ऑफर, हॉटेल बुकिंगवर मिळणार 60% सूट !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी असलेल्या OYO ने जागतिक MSME दिनानिमित्त लहान आणि मध्यम उद्योगांसाठी एक खास सवलत प्लॅन जाहीर केला आहे. ज्याअंतर्गत आता व्यावसायिकांना ओयो हॉटेल्समधील मुक्कामावर 60 टक्के सवलत मिळेल. या अंतर्गत व्यावसायिकांना देशभरातील सुमारे 2000 ओयो प्रॉपर्टीजवर उपलब्ध असलेल्या 10,000 हून जास्त हॉटेल्समधून निवड करता येईल.

OYO was the big disruptor in India's hotel industry, forcing even Tatas to  take note

OYO कडून याबाबत नुकतेच एक निवेदन जारी केले गेले आहे. ज्यानुसार आता व्यावसायिकांना 27 जून ते 3 जुलै 2022 या एका आठवड्याच्या कालावधीमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. देशाच्या आर्थिक विकासात MSME चे योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीचा हा उपक्रम आहे.

OYO 2400 Maleo Exclusive Residence , OYO Hotels Bandung, Book @ Rp112408 -  OYO

OYO मधील प्रोडक्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य सेवा अधिकारी असलेले श्रीरंग गोडबोले यांनी सांगितले कि, “आमचे बरेचसे ग्राहक कर्मचारी लहान आणि मध्यम व्यवसायांचे मालक आहेत किंवा काम करतात. ते आम्हाला निवडतात कारण आम्ही अगदी कमी नोटीसवर देखील सहजपणे बुकिंग, सोयीस्करपणे ठिकाणे, कमी किमतींमध्ये स्वच्छ हॉटेल्स देण्यास सक्षम आहोत. याव्यतिरिक्त, सिंगल इनव्हॉइस, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सिंगल व्हेंडर रजिस्ट्रेशन सहित इतरही अनेक फायदे आहेत.

OYO 63448 Oasis Hotel, OYO Rooms Kolkata, Book @ ₹839 - OYO

हे लक्षात घ्या कि, OYO App, वेबसाइट, ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरून बुकिंग करून आणि चेक-इनच्या वेळी आपले बिझनेस व्यवसाय कार्ड दाखवून व्यवसायिकांना या ऑफरचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.oyorooms.com/

हे पण वाचा :

Canara Bank ने सुरु केली स्पेशल FD, असा असेल व्याज दर !!!

Vladimir Putin : आता रशियामध्ये सुरु होणार भारतीय सुपरमार्केटची साखळी, ब्रिक्स परिषदेत पुतिन यांनी दिले संकेत

PAN-Aadhar Linking साठी आता फक्त 6 दिवसच बाकी, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया

Multibagger Stocks : राकेश झुनझुनवालाची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअर्सने 2 वर्षांत दिला 175% रिटर्न !!!

EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे पैसे !!!

Leave a Comment