व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ डाॅ. शिवाजीराव कदम यांना जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान समारंभ शनिवार, दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी (आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 14 व्या ‘स्मृतिदिनी’) सकाळी 11 वाजतां यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे आयोजित करण्यात आला आहे.

सन 2022 चा पुरस्कार भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण जेष्ठ संपादक व विचारवंत मधुकर भावे यांचे हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

प्रतिष्ठानचेवतीने शनिवारी सकाळी 9.30 वाजतां आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या श्री शिवाजी हायस्कूल शेजारील ‘समाधीस्थळी’ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान समारंभाकरिता कराडकर आणि परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर व सर्व विश्वस्तांच्यावतीने करण्यात आले आहे.