Sunday, December 7, 2025
Home Blog Page 21

अमित शहांना दगड मारला! दिल्लीत नेमकं काय घडलं??

Amit Shah In Sansad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागेल याबाबतचे नवे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल संसदेत मांडलं. अमित शाह यांच्या या नव्या बिलानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी या विधेयकाला तीव्र विरोध करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अमित शाह यांचे भाषण सुरु असतानाच विरोधी पक्षातील एका खासदाराने विधेयकाची प्रत फाडून अमित शहांवर फेकली. परंतु अमित शहांवर दगडही मारण्यात आले असा गंभीर आरोप भाजप खासदार कंगना राणावत यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसभेत विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने (Kangana Ranaut) विरोधी पक्षाच्या नेत्यांवर मोठा आरोप केला. अमित शहा विधेयक मांडत होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचा माइक ओढण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून शहांवर फेकली. एवढच नव्हे तर काही खासदारांनी त्यांच्यासोबत दगडही आणले होते, जे त्यांनी कागदासह अमित शहा यांच्या तोंडावर फेकले असा दावा कंगना राणावतने केला. विरोधी पक्षांचे खासदार ज्या पद्धतीनं हिंसाचार करत होते, त्या वेळी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी खूप संयमानं संपूर्ण परिस्थिती हाताळली, परंतु हि चिंतेची बाब आहे असं कंगनाने म्हंटल.

संसदेत नेमकं काय घडलं होते –

अमित शहा यांनी संसदेत ३ महत्वाची विधयेक सादर केल्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्याला विरोध केला. विरोधी बाकावरील अनेक खासदार लोकसभेच्या वेलमध्ये पोहोचले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान, काही खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने त्याचे तुकडे फेकले.

कोणतं बिल सर्वात जास्त गाजले –

अमित शहांच्या नवीन बिलानुसार, गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३१ व्या दिवशी राष्ट्रपती पंतप्रधानांना पदावरून हटवतील. राज्यपाल मुख्यमंत्र्यांना हटवतील. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपल्या इतर मंत्र्यांना हटवतील. तर राज्यपाल केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवतील. परंतु जर सदर मंत्री किंवा मुख्यमंत्री पोलीस कोठडीतून सहीसलामत बाहेर आले तर त्यांना पुन्हा त्या पदावर नियुक्त करण्यात येईल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी या दोघांनी अटकेनंतरही काही महिने मुख्यमंत्रीपद सोडलं नव्हते त्यामुळे केंद्र सरकारने हे बिल आणला का? याची चर्चा आता सुरु आहे. अमित शाह यांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याच बिलावरून संसदेत गदारोळ झाला.

Jio Recharge Plan : Jio चा ग्राहकांना दणका!! बंद केला 1.5GB चा रिचार्ज

Jio Recharge Plan 799 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plan । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ ने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. जिओने आपला ७९९ रुपयांचा दिवसाला 1.5GB इंटरनेटचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवस होती. त्यामुळे ग्राहकांना तो परवडत होता, परंतु कंपनीने हा रिचार्ज प्लॅन बंद करत ग्राहकांना धक्का दिला आहे. आता जिओने 889 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1.5GB मिळेल खरं परंतु तुम्हाला ९० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. म्हणजेच काय तर ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे.

जिओच्या ७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Jio Recharge Plan) ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस चा लाभ मिळत होता. तसेच जिओक्लाउड आणि जिओटीव्ही सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस देण्यात येत होता. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांसाठी होती आणि ग्राहकांना एकूण १२६ जीबी डेटा देण्यात येत होता. आता 889 रुपयांच्या नव्या रिचार्ज प्लॅन मध्येही याच सर्व सुविधा मिळतील, परंतु या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त जिओसावन प्रो सबस्क्रिप्शन मिळते.

२४९ रुपयांचा रिचार्ज सुद्धा बंद – Jio Recharge Plan

जिओने ग्राहकांना दिलेला आणखी एक धक्का म्हणजे २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) सुद्धा बंद केला आहे. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी २८ दिवसांची होती ज्यामध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी ५जी डेटा मिळत होता. खरं तर हा कंपनीचा एकमेव १ जीबी डेटा प्लॅन होता ज्याची व्हॅलिडिटी २८ दिवस होती. परंतु आता कंपनीने या प्लॅनची किंमत २४९ रुपयांवरून २९९ रुपये केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. आधीच देशात महागाई वाढत आहे. त्यात मोबाईल रिचार्जच्या किमतीही सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडलं आहे. परंतु मोबाईल रिचार्ज हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनल्याने ग्राहकांना रिचार्ज केल्याशिवाय पर्यायच नाही, हि बाबही तितकीच खरी आहे. त्यातच भर म्हणजे एका रिपोर्टनुसार, एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या वर्षाच्या अखेरीस त्यांचे प्रीपेड आणि पोस्टपेड टॅरिफ आणखी १०-१२ टक्क्यांनी महाग करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास ग्राहकांना जगणं मुश्किल होईल.

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : राज – फडणवीसांमध्ये गुफ्तगू; राजकीय वर्तुळात खळबळ

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Thackeray Meets Devendra Fadnavis । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना आणि नुकतंच कालबेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा दणकून पराभव झाल्यांनतर आज दुसऱ्याच दिवशी सकासकाळी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल ५० मिनिटे चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण होते याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

राजकीय चर्चा झाली ?? Raj Thackeray Meets Devendra Fadnavis

मुंबईत पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा २ मोठे नेते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा तर होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या भेटीतून काही ठोस राजकीय निर्णय समोर येतोय का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळीक वाढली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवर गेले होते. मनसे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांमध्येही चांगलेच सूर जुळले आहेत. अशावेळी आज राज ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने Raj Thackeray Meets Devendra Fadnavis) मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

यापूर्वीही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. परंतु आजच्या भेटीचे जे टायमिंग आहे ते पाहता मनसे प्रमुखांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज कोणालाच नाही. कारण कालच ठाकरे बंधूंचा बेस्टच्या निवडणुकीत दणकून पराभव झाला आहे. यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली, तर दुसरीकडे राज ठाकरे याना थोडासा सॉफ्ट कॉर्नर दिला. त्यामुळे भाजप सुद्धा राज ठाकरेंसाठी वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाकी आपण शिवतीर्थावर पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबत (Raj Thackeray Meets Devendra Fadnavis) अधिक बोलणार आहोत असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय बोलतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.

Ration Card : 1.17 कोटी लोकांचं रेशनकार्ड रद्द; तुमचंही नाव यात आहे का बघा?

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ration Card। रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची आणि धक्कादायक बातमी आहे. खरं तर रेशनकार्ड च्या माध्यमातून केंद्र सरकार गोरगरीब जनतेला मोफत धान्य मिळते. परंतु आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (NFSA) अंतर्गत मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्या १.१७ कोटी लोकांचं रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याने विविध मंत्रालये व सरकारी संस्थांच्या डेटाबेसचा अभ्यास करून अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवली आहे. त्यामुळे या नागरिकांना मोठा धक्का बसणार आहे.

कोण कोण अपात्र होणार? Ration Card

ज्या कुटुंबांकडे उत्पन्नाची ठोस साधने आहेत, त्यांना स्वस्त धान्याचा लाभ घेण्याची गरज नाही असं सरकारला वाटत. जे नागरिक आयकर भरतात, ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे आणि कंपन्यांचे संचालक म्हणून नेमलेले आहेत अशा श्रेणीतील लोकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये ९४.७१ लाख नागरिक आयकर भरतात, १७.५१ लाख लोकांकडे चारचाकी गाड्या आहेत तर ५.३१ लाख लोक कंपन्यांमध्ये संचालक आहेत. आयकर विभाग, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या डेटाबेसवरून हि माहिती काढण्यात आली आहे.

खरं तर ज्यांना रेशनची गरज नाही, ज्यांच्याकडे चांगली उत्पन्नाची साधने आहेत असे मोठ्या संख्येने अपात्र लोक मोफत धान्य योजनेचा लाभ घेत होते. मात्र आता कुठेतरी याला आळा बसवा, गैरप्रकार थांबवावे आणि अधिक पारदर्शकता यावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांची रेशन कार्ड (Ration Card) रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात ग्रामपंचायत ते जिल्हा प्रशासन पातळीवर मोठ्या प्रमाणात छाननी होणार आहे. यासाठी ‘राइटफुल टार्गेटिंग डॅशबोर्ड’ नावाचे एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल.

सरकारच्या या निर्णयामुळे करोडो लोकांचं रेशन बंद होईल, त्यांना स्वस्तात किंवा मोफत मध्ये धान्य मिळणार नाही. परंतु दुसरीकडे ज्याला खरंच गरज आहे अशा लोकांना पात्र लाभार्थ्यांसाठी नवा मार्ग मोकळा होईल आणि खऱ्या अर्थाने योजनेत पारदर्शकता येईल.

Amit Shah New Bill : … तर पंतप्रधानांनाही खुर्ची सोडावी लागणार; अमित शहांनी आणलं नवीन बील

Amit Shah New Bill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amit Shah New Bill । गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी लागेल याबाबतचे नवे विधेयक आज संसदेत सादर कऱण्यात आलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज हे विधेयक सादर केलं, त्यानंतर संभागृहात मोठा गदारोळ उडाला. विरोधकांनी या बिलाला विरोध करत हे विधेयक पूर्णपणे विनाशकारी असल्याचा आरोप केला आहे. अशावेळी मोठमोठ्या नेत्यांच्याही मनात धडकी भरवणारं हे विधेयक नेमकं आहे तरी काय? याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अमित शहांच्या नवीन बिलानुसार, गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३१ व्या दिवशी राष्ट्रपती पंतप्रधानांना पदावरून हटवतील. राज्यपाल मुख्यमंत्र्यांना हटवतील. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपल्या इतर मंत्र्यांना हटवतील. तर राज्यपाल केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवतील. परंतु जर सदर मंत्री किंवा मुख्यमंत्री पोलीस कोठडीतून सहीसलामत बाहेर आले तर त्यांना पुन्हा त्या पदावर नियुक्त करण्यात येईल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी या दोघांनी अटकेनंतरही काही महिने मुख्यमंत्रीपद सोडलं नव्हते त्यामुळे केंद्र सरकारने हे बिल आणला का? याची चर्चा आता सुरु आहे. अमित शाह यांनी हे विधेयक (Amit Shah New Bill) संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधक आक्रमक – Amit Shah New Bill

केंद्र सरकारच्या या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे.काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी हे विधेयक पूर्णपणे विनाशकारी असल्याचं म्हटलं आहे. भारतीय संविधानानुसार कायद्याचं राज्य असलं पाहिजे, जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात. हे विधेयक एका यंत्रणेला पंतप्रधानांचा बॉस करते, असेही तिवारी म्हणाले. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हंटल कि, केंद्र सरकार या कायद्याचा वापर विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी करू शकते, ज्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर ट्विट करत नितीशकुमार आणि चंद्राबाबूं नायडूंना लक्ष्य केलं आहे. मोदी शाह यांनी नवं विधेयक मुख्यमंत्री आणि मंत्र्‍यांना अटक करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी आणलं आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार घाबरले असल्याचं वृत्त आहे, ते पाठिंबा काढून घेतील अशी भीती मोदी सरकारला आहे असं ट्विट राऊतांनी केलं आहे.

Kamva Ani Shika Yojana For Girls : मुलींना दरमहा 2000 रुपये; सरकारने आणली नवी योजना

Kamva Ani Shika Yojana For Girls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kamva Ani Shika Yojana For Girls । राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन योजना लाँच करणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी कमवा आणि शिका’ योजना नावाची हि योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील ५ लाख विद्यार्थिनींना दर महिन्याला २००० रुपये देण्यात येतील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना या योजनेबद्दल थोडक्यात माहिती दिली. सरकारच्या या योजनेमुळे स्त्री शिक्षणाला आणखी बळकटी मिळेल आणि जास्तीत जास्त मुली शिक्षणाचा लाभ घेतील.

कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून शिकत शिकत विद्यार्थिनींना पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार, राज्यभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पाच लाख मुलींना त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांसोबत अर्धवेळ कामात सहभागी होण्यासाठी दरमहा २००० रुपये मिळतील. या पैशामधून मुलींना दैनंदिन खर्चासह शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थीनींसाठी हि योजना जणू एक वरदान ठरणार आहे. तसेच पैशाअभावी त्यांचं शिक्षण अपुरे राहणार नाही. कमवा आणि शिका योजनेच्या (Kamva Ani Shika Yojana For Girls) माध्यमातून विद्यार्थिनींना एकीकडे पैसे तर मिळतीलच, परंतु कामाचा अनुभव सुद्धा मिळेल.

महिला विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्याने आधीच अनेक क्रांतिकारी पाऊले उचलली आहेत. यामध्ये ८४२ वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमधील मुलींसाठी शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करणे आणि भाडे आणि जेवण यासारख्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी दर महिन्याला ६००० रुपये निर्वाह भत्ता समाविष्ट आहे. या पैशामुळे विद्यार्थिनींना राहण्याची सोय तसेच जेवणाची सोय करता येईल. आता शैक्षणिक साहित्य आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी खास विद्यार्थीनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरु करण्यात आली आहे.

100 कोटींची तरतूद – Kamva Ani Shika Yojana For Girls

ही योजना कशी राबवायची? याबाबत आराखडा तयार करणे सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालये त्यांच्याकडील विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करेल. यामध्ये काही तांत्रिक कामे असतील, कार्यालयीन मदत किंवा इतर काही प्रकारचे रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थिनी काम करतील त्यांना दर महिन्याला २००० रुपये मिळतील. विद्यार्थीनींसाठी आणलेल्या या योजनेसाठी सुमारे १०० कोटींची तरतूद करावी लागेल असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Virat Kohli-Rohit Sharma : विराट-रोहित वनडेतुनही निवृत्त? ICC ने दिला धक्का

Virat Kohli-Rohit Sharma

हॅलो कृषी ऑनलाईन Virat Kohli-Rohit Sharma भारतीय क्रिकेट संघाचे 2 अनमोल रत्न असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीची चर्चा नेहमीच सुरु असते. खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने यापूर्वीच टेस्ट आणि टी- २० क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र अधून मधून त्यांच्या वनडे निवृत्तीच्या चर्चा आणि अफवाही सातत्याने समोर येत असतात. दोन्हीही खेळाडू २०२७ मधील एकदिवसीय वर्ल्ड कप खेळतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. मात्र याच दरम्यान, आयसीसीच्या एका कृतीने क्रिकेट चाहत्यांच्या पोटात गोळा आला आहे. ICC च्या ताज्या क्रमवारीतून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचीही नावे गायब झाली आहेत. त्यामुळे दोघांनी निवृत्ती घेतली कि काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

खरं तर मागील आठवड्यात म्हणजेच १३ ऑगस्ट रोजीच्या क्रमवारीनुसार रोहित शर्मा हा दुसऱ्या स्थानावर होता, रोहित शर्माने एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझमला मागे टाकले होते, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होता. मात्र आता ८ दिवसातच दोघांचीही नावे कुठेच दिसेना झाली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. दोन्ही खेळाडूंचा टॉप १०० मध्येही समावेश नाही. आयसीसीच्या रँकिंग सिस्टीममधील ही चूक किंवा तांत्रिक बिघाड असल्याचे बोललं जातंय.

कधी खेळली शेवटची वनडे – Virat Kohli-Rohit Sharma

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही (Virat Kohli-Rohit Sharma) आपला शेवटचा एकदिवसीय सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये खेळला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो अंतिम सामना होता ज्यात रोहितने तुफान बॅटिंग करत भारताला विजय मिळवून दिला होता. रोहितने अंतिम सामन्यात नेत्रदीपक खेळी खेळली होती. त्याचा फॉर्म बघता तो वनडे मधून निवृत्त होईल असे अजिबात वाटत नाही. हीच बाब विराट सोबत आहे. विराट कोहली हा वनडे क्रिकेटची रनमशीन मानली जाते. विराटचा एकदिवसीय सामन्यातील खेळ हा नक्कीच बघण्यासारखा असतो. त्याने आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली होती. विराटचा फिटनेस बघता तो सुद्धा वनडे मधून निवृत्ती घेण्याची शक्यता नाही.

कशी आहे नवीन क्रमवारी ?

१) शुभमन गिल ७८४ गुण
२) बाबर आझम ७३९ गुण
३) डॅरिल मिशेल ७२० गुण
४) चरिथ असलंका ७१९ गुण
५) हॅरी टेक्टर ७०८ गुण
६) श्रेयस अय्यर ७०४ गुण
७) शाई होप ६९९ गुण
८) इब्राहिम झदरन- ६७६ गुण
९) कुसल मेंडिस- ६६९ गुण
10) ट्रॅव्हिस हेड- ६४८ गुण

Mumbai Local Trains Cancelled : मुंबईकरांनो, आज या लोकल ट्रेन रद्द; पहा संपूर्ण यादी

Mumbai Local Trains Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Trains Cancelled । मुंबईची लोकल ट्रेन मध्ये मुंबईकरांची जीवनवाहिनी… मात्र मुसळधार पावसामुळे हीच लाईफलाईन जाग्यावर थांबली आहे. मुंबई आणि उपनगराला मागील काही दिवसापासून पावसाने अक्षरशः झोडपलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती असून मुंबईची तुंबई झाली आहे. रेल्वे ट्रॅक सुद्धा पाण्याने भरले असून त्याचा लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. आज २० ऑगस्ट रोजी अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेन धीम्या गतीने धावत आहेत. लोकल सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी पोहचायला त्यांना उशीर होत आहे. . रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना गरज असेल तरच प्रवास करण्यास आणि सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

कोणकोणत्या ट्रेन रद्द ? Mumbai Local Trains Cancelled

NSP 90012 | 03:40 | नाला सोपारा → बोरिवली
BO 90014 | 04:15 | बोरिवली → चर्चगेट
VR 92002 | 04:00 | विरार→ दादर
VR 92009 | 05:15 | दादर → विरार
NSP 90046 | 05:35 | नाला सोपारा → चर्चगेट
VR 92020 | 04:50 | विरार → चर्चगेट
VR 92021 | 06:25 | चर्चगेट → विरार
NSP 92006 | 05:05 | नाला सोपारा → अंधेरी
VR 92013 | 06:05 | अंधेरी → विरार
NSP 92010 | 05:24 | नाला सोपारा → अंधेरी
NSP 92019 | 06:49 | अंधेरी → भाईंदर
NSP 92022 | 06:33 | नाला सोपारा → अंधेरी
NSP 92033 | 07:41 | अंधेरी → विरार
BO 90082 | 04:05 | बोरिवली → चर्चगेट
BO 90010 | 04:10 | बोरिवली → चर्चगेट
BO 90015 | 04:18 | चर्चगेट → बोरिवली
BO 90060 | 05:31 | बोरिवली → चर्चगेट

प्रवाशांना बाहेर पडण्यापूर्वी रद्द केलेल्या सेवांची (Mumbai Local Trains Cancelled)यादी तपासण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे येथे रेड अलर्ट जारी केला आहे, आज या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे २४ तास मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वेने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन आज रद्द केल्या आहेत. यामध्ये डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस जालना-मुंबई जन शताब्दी यांचा समावेश आहे.

Pune Mumbai Train Cancelled : मुंबई- पुणेदरम्यान सर्व ट्रेन रद्द; पावसामुळे रेल्वेचा निर्णय

Pune Mumbai Train Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Mumbai Train Cancelled । पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्याने मुंबई- पुणे दरम्यान सुरु असलेल्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हीही जर पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणार असाल तर इतर वाहनांचा विचार करावा. रेल्वे विभागाकडून कोणकोणत्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती आपण जाणून घेऊयात.

खरं तर गेल्या ३ दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. खास करून मुंबईत तर पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी आहे. मुंबईतील अनेक लोकल सेवांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबईतील पावसाच्या या अवस्थेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या रद्द (Pune Mumbai Train Cancelled) करण्यात आल्या आहेत. यामध्ये डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस जालना-मुंबई जन शताब्दी यांचा समावेश आहे.

आज रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची यादी – Pune Mumbai Train Cancelled

११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस

१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस

२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस

१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस

काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. तस बघितलं तर मुंबई आणि पुणे हि दोन्ही शहरे महाराष्ट्रातील आघाडीची शहरे आहेत. दोन्ही ठिकाणी लोक नोकरीच्या शोधात जातात. मुंबईतून पुण्याला कामानिमित्त ये जा करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्त आहे. अशा प्रवाशांना या ट्रेन रद्द झाल्याने मोठा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून हवामानाचा अंदाज घेऊन पुढील काही दिवस ट्रेनबाबात वेळोवेळी माहिती अपडेट्स देण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी रेल्वेची अपडेटेड माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Pune Sindhudurg Flight : बाप्पा पावला!! पुण्यातून कोकणात ज्यादा विमाने; प्रवाशांना दिलासा

Pune Sindhudurg Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Sindhudurg Flight । गणेशोत्सवानिमित्त मुंबई- पुण्याहून कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते. कोकणातील चाकरमानी गणपतीला गावी जातो म्हणजे जातोच. अशा चाकरमान्यांसाठी रेल्वे आणि एसटी विभागाने अनेक ज्यादा बसेस सोडल्या आहेत. आता यामध्ये विमान कंपन्याही मागे नाहीत. गणेशभक्तांचा प्रवास आणखी सोप्पा व्हावा, त्यांना लवकरात लवकर कोकणात पोहचता यावे यासाठी प्रादेशिक विमान कंपनी FLY91 ने पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर अतिरिक्त उड्डाणे जाहीर केली आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना पुन्हा एकदा बाप्पा पावला असं म्हणावं लागेल.

कोणकोणत्या दिवशी ज्यादा उड्डाणे- Pune Sindhudurg Flight

पुण्यात नोकरीनिमित्त आलेल्या कोकणवासीयांची संख्या जास्त आहे. अशा प्रवाशाना हि विमानसेवा मोठा दिलासादायक ठरेल. कोकणात रस्ते मार्गाने जायचं म्हंटल तर रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. रेल्वेची तिकीटही बऱ्यापैकी बुक झाली आहेत. त्यामुळे FLY91 चा विमानप्रवास प्रवाशांना कमी वेळेत कोकणात घेऊन जाईल. फ्लाय 91 कंपनीकडून पुण्यातून सिंधुदुर्गला गणेशोत्सवात पाच दिवस जादा विमानेसवा (Pune Sindhudurg Flight) चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार, 24 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबरसाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. या उड्डाणांसाठी तिकिटे एअरलाइनच्या वेबसाइटवर बुकिंगसाठी उपलब्ध आहेत

याबाबत FLY91 चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी म्हंटल कि, “गणेश चतुर्थी हा आमच्या ग्राहकांसाठी एक खास काळ आहे, ज्यामध्ये बरेच लोक कुटुंब आणि मित्रांसोबत प्रवास करतात. आमच्या पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावर अतिरिक्त उड्डाणे जोडून, या उत्सवाच्या काळात प्रवाशांना अधिक पर्याय देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ही ठिकाणे आमच्या प्रादेशिक नेटवर्कसाठी महत्त्वाची आहेत आणि आम्ही शेवटच्या मैलापर्यंत आरामदायी आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी देण्यासाठी वचनबद्ध आहोत. (Pune Sindhudurg Flight)

दरम्यान, FLY91 यापूर्वीही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अतिरिक्त उड्डाणे सुरु केली होती. कंपनीने 14, 15 आणि 18 ऑगस्ट रोजी पुणे-गोवा-पुणे आणि पुणे-सिंधुदुर्ग-पुणे क्षेत्रांमध्ये सेवा सुरू केल्या. गर्दीच्या सीजन मध्ये प्रवाशांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि दुसरीकडे विमान कंपनीचा फायदाही व्हावा अशा दोन्ही उद्देशाने FLY91 काम करत आहे.