Sunday, December 7, 2025
Home Blog Page 22

CM Rekha Gupta Attacked : मुख्यमंत्र्यांवर हल्ला, कानशिलात लगावली; राजकीय वर्तुळात खळबळ

CM Rekha Gupta Attacked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन CM Rekha Gupta Attacked । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जनता दरबार सुरु असतानाच हा हल्ला झाला असून हल्लेखोराने रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावल्या आहेत. सदर व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्याशेजारी जाऊन आरडाओरडा केला आणि त्यांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याने हा हल्ला का केला? तो कोणत्या इतर पक्षाशी संबंधित आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं? CM Rekha Gupta Attacked

दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात रेखा गुप्ता यांचा जनता दरबार भरला होता. त्यावेळी सदर हल्लेखोराने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, निवेदन देताच तो आक्रमक झाला… त्याने आरडाओरडा केला आणि रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली. या व्यक्तीने एक नव्हे तर अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या (CM Rekha Gupta Attacked). त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केली. रेखा गुप्ता आणि हल्लेखोरांमध्ये जोरदार झटापट झाली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.

या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तही रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पोलिसांनी सदर हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. आरोपी आत मध्ये कसा घुसला आणि तो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचला? त्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला का केला? कोणत्या राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. हा विरोधकांचा कट असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. एक मुख्यमंत्री सतत जनतेत राहून लोकांचे प्रश्न सोडवत आहे, लोकांना भेटत आहे हे विरोधकांना सहन होत नाही, त्यामुळे यामागे राजकीय कट असल्याचे दिसते. दिल्ली पोलिस चौकशी करत असून लवकरच या हल्ल्यामागचे तथ्ये बाहेर येतील असं मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हंटल.

ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; बेस्ट निवडणुकीत शून्य जागा

uddhav and raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हि ठाकरे बधुंची जोडी एकत्र येऊनही काही फायदा झालेला नाही. पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल रात्री उशीरा जाहीर झाला. यामध्ये शशांक राव यांच्या पॅनलने 12 जागा जिंकत सत्ता मिळवली. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या महायुती प्रणित समृद्धी पॅनलला 9 जागा मिळाल्या. एकही जागा जिंकता न आल्यामुळे ठाकरे बंधूना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिवसेनेने आपली ९ वर्षाची सत्ता गमावली आहे.

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. या युतीने उत्कर्ष पॅनल निवडणुकीत उतरवलं होते. त्यांना आव्हान देण्यासाठी मदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर तिसरीकडे बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव यांनी सुद्धा आपले २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. हि निवडणूक एकुण 35 केंद्रावर पार पडली. तब्बल 150 उमेदवार रिंगणार होते. या तिरंगी लढतीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला.

ठाकरे बंधुंच्या पराभवानंतर भाजप अक्षरशः तुटून पडली. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ठाकरेंना डिवचलं आहे. एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?… या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!! असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर!! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून त्यानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु आहे. कोकणी माणूस एकवेळ नोकरीवर लाथ मारेल, पण कोकणात तो गणपती उत्सवासाठी जाणार म्हणजे जाणारच… कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकार कडून अनेक विशेष ट्रेन आणि बस चालवण्यात येत आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत कोकणवासीयांना गुडन्यूज दिली आहे. कोकणात मागील वर्षापेक्षा जास्त 267 रेल्वेच्या फेऱ्या होतील असं फडणवीस यांनी म्हंटल आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी केंद्र सरकार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी यावर्षी मुंबईहून २६७ रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. खास करून कोकणात जाणारे मुंबईकर दरवर्षी गणेशोत्वस काळात कोकणात जातात, त्यांना या स्पेशल ट्रेनचा फायदा होईल. दरवर्षी पेक्षा यंदा खूप मोठ्या प्रमाणावर गणेशोत्वसानिमित्त आम्ही रेल्वेगाड्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. चाकरमानी आणि कोकणात राहणाऱ्या मुंबईकरांसाठी ही मोठी व्यवस्था केली आहे,असं फडणवीस यांनी म्हंटल.

कोकणात मोदी एक्सप्रेस चीही सुविधा

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. मात्र यंदा एक नाही, तर दोन दोन मोदी एक्सप्रेस कोकणात धावणार आहेत. या मोदी एक्सप्रेस मध्ये भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. कोकणाकडे जाणारी पहिली मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. रत्नागिरी आणि कुडाळ येथे या ट्रेनला थांबा असेल आणि शेवटचे स्टेशन सावंतवाडी असेल. तर कोकणाकडे जाणारी दुसरी मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. वैभववाडी आणि कणकवली या स्थानकांवर या ट्रेनला थांबा असेल. या दोन्ही रेल्वे मधील आसन क्षमता मर्यादित असल्याने प्रवाशांनी वेळेत तिकिटे बुक करणे महत्वाचे आहे.

यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील लोकांनी भाजप आणि राणे कुटुंबाला पूर्ण पाठिंबा दिला. या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आम्ही मोदी एक्सप्रेस या रेल्वेसेवेचा आणखी विस्तार करत असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

… तर फडणवीसांची खुर्ची जाईल; कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा थेट इशारा

bachhu kadu devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्रजी, तुम्ही जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर तुमची खुर्ची सुद्धा राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे राज्यस्तरीय पदाधिकारी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात ते बोलत होते.

यावेळी आपल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले, निवडणुका दुय्यम आणि आंदोलन प्रथम हाच आपला कानमंत्र आहे. आपल्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे कर्जमाफी देणार नाही म्हणणाऱ्या सरकारला ६ महिन्यात वठणीवर आणलं आहे. एकही आमदार नसताना आपण सरकारला नाचवलं आहे. देवेंद्र फडणवीसाना शेवटी शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार करावी लागली. परंतु आपल्याला फक्त समिती नको आहे, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. हा फक्त ट्रेलर होता… पिक्चर अभी बाकी है असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला. ही लढाई शेतकरी कष्टकरी आणि दिव्यांगाची आहे. या लढाईच्या माध्यमातून आपला अंकुश सरकारवर असावा. आपल्याला राज्यभरातील सर्व संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकारला आपल्यासमोर, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगा समोर झुकलेच पाहिजे.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या मतचोरी आरोप आणि बोगस मतदान प्रकरणावरूनही बच्चू कडू यांनी भाजपवर आपली तोफ डागली. ? EVM हे काँग्रेसचे पाप आहे पण त्याचा वटवृक्ष भाजपने केला. भाजपने लोकांचं मत चोरले त्यामुळे तुमचं आमचं अस्तित्व संपलं. देशाच्या लोकशाहीचे संविधान उघड पाडण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे भाजप विरोधात रान उठवा …. स्वातंत्र्यानंतर च्या स्वातंत्र्याची हि एक नवीन लढाई आहे. कारण मतदानाचा अधिकार गेला तर लोकांना कोण विचारेल?? असा सवालही बच्चू कडू यांनी केला. मतदानात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा नसेल तर लोकशाईला अर्थ नाही असं बच्चू कडू यांनी म्हंटल.

Maharashtra Rain Deaths : मोठी बातमी!! पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, अनेकांचं स्थलांतर

Maharashtra Rain Deaths

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Deaths । महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या या तडाख्यात राज्यातील १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचे स्थलांतर करण्यात आलं असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

अनेकांच्या घरात पाणी शिरलं – Maharashtra Rain Deaths

संपूर्ण राज्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग बघायला मिळत असताना मराठवाड्यात तर अक्षरशः पावसाने थैमान घातलं आहे. मराठवाड्यात पावसामुळे नदी नाले दुथड्या भरून वाहत आहेत, लोकांच्या शेतात पाणी साचलं आहे.. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे, तर अनेक जनावरे वाहून गेली आहेत. खास करून नांदेड जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर जात आहे. नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्यपावसाच्या तडाख्यात 9 जणांचा मृत्यू (Maharashtra Rain Deaths) झाला. मात्र सध्या पाऊस थोडाफार ओसरला असून परिस्थिती सामान्य होत आहे. याबाबत गिरीश महाजन यांनी माहिती देत म्हंटल कि, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास लष्कराची मदत घेत आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करत म्हंटल,नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पावसामुळे मुंबई सुद्धा तुंबली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. ट्रेनच्या ट्रॅक वर पाणी साचलं आहे. परिणामी सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईन ठप्प झाली आहे, तर काही मार्गावर धीम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु आहे. मुंबई अहमदाबाद हायवेला सुद्धा नदीचे स्वरूप आलं आहे. तारेवरची कसरत करून लोक गाडी चालवत आहेत. काही गाड्या पाण्यातच बंद पडत आहेत. एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्राची पावसामुळे दैना उडाली आहे.

Mumbai Rain Updates : पावसामुळे मुंबईची तुंबई!! सर्वत्र पाणीच पाणी; रेल्वेसेवा ठप्प

Mumbai Rain Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Rain Updates । महाराष्ट्राची राजधानी मुंबईला पावसाचे चांगलंच झोडपलं आहे. कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहरासह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणीच पाणी बघायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या धोक्यामुळे मुंबई महापालिकेने महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज (मंगळवार 19 ऑगस्ट) सुट्टी जाहीर केली आली आहे. तसेच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.

मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Mumbai Rain Updates) झाले आहे. रस्त्यावर चहुबाजूनी पाणीच पाणी साचल्याने कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची अक्षरशः दैना उडाली. शाळेत जाणारी मुले आणि पालकही चिंतेत होते, मात्र मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले. तसेच सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. खरं तर भारतीय हवामान विभागाने कालच मुंबई व महाराष्ट्रातील अनेक भागांना रेड अलर्ट तर काही भागांना यलो अलर्ट जारी केला होता. मुंबईला रेड अलर्ट असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रेल्वेसेवा ठप्प – Mumbai Rain Updates

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सायन-दादर स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने मुंबईची हि जीवनवाहिनी जाग्यावरच थांबली आहे. तर काही रेल्वेगाड्या धीम्या गतीने धावत आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे ५५ मिनिटही उशिरा धावत आहे. हार्बर लाईन वरील मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर यांसारख्या सखल भागांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेन धीम्या गतीने धावत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत थांबले आहेत. Mumbai Rain Updates

मुंबई अहमदाबाद हायवे सुद्धा पाण्याखाली गेला असून या रस्त्याला नदीचे स्वरूप आलं आहे. महामार्गावरील गाड्या पाण्यातूनच प्रवास करत आहेत. खास करून दुचाकीस्वारांना मोठ्या संकटाना सामोरे जावं लागत आहे, कारण अनेक गाड्या पुराच्या पाण्यात बंद पडत आहेत, परिणामी पाण्यातूनच गाडी पुढे ढकलावी लागत आहे. हायवेवर पाणी साचल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने आणि जीवावर उदार होऊन सुरु आहे. एकूणच काय तर पावसामुळे मुंबईकरांची अक्षरशः दैना उडाली आहे.

… म्हणून मी शरद पवारांबरोबर गेलो; ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण बनलं. मधल्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दुसरा भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात घडला… यानंतर राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या.. परंतु २०१९ पासून ते आजपर्यंत उद्धव ठाकरेंवर मात्र हिंदुत्व सोडल्याचा आणि भिन्न विचाराच्या पक्षांशी आघाडी केल्याचा आरोप होतो. खास करून भाजप आणि शिंदे गटातील नेते आजही त्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. परंतु आपण महाविकास आघाडीची स्थापना का केली? शरद पवार आणि काँग्रेस सोबत आपण का गेलो? याचा मोठा खुलासा आज ६ वर्षांनी उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपच्या राजकारणात व्यक्तिगत द्वेष सूड होता म्हणूनच मी शरद पवारांसोबत गेलो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हंटल आहे.

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपवर आसूड घेतला. मला प्रश्न पडला की मी डावा आहे की, उजवा आहे? दोन्ही हात आपलेच आहेत. त्यामुळे डावा, उजवा करण्याची गरज नाही. आम्ही सडलेल्या मानसिकतेविरोधात आहोत. आम्ही भाजपसोबत 25-30 वाया घालवली. शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांचं नात तर तुम्हाला माहीतच आहे, मतभेद टोकाचे होतेपण मैत्री त्यापलीकडची होती .. थोडक्यात काय तर त्यांच्यामध्ये मतभेद होते. शिवसेना आणि कम्युनिष्ठांमध्ये देखील प्रचंड संघर्ष झाला, पण राजकारणात व्यक्तिगत द्वेष सूड असता कामा नये, म्हणूनच शरद पवार, आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ शकलो असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकावरून सरकारवर जोरदार घणाघात केला. जात -पात धर्म काही बघू नका, जो कोणी देशाविरोधात कारवाया करेल त्याला फासावर लटकवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. परंतु एकीकडे रोकड सापडली म्हणून वसईच्या पालिका आयुक्तांना अटक झाली. मग मंत्र्यांच्या घरी बॅगा दिसल्या तरी का अटक नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.  या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील उपस्थित होते.

FASTag Annual Pass : उद्यापासून टोल नाक्यावर वाहनांना सूट? ही योजना लागू होणार

FASTag Annual Pass

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन FASTag Annual Pass । देशात सध्या सणासुदीचे दिवस चालू झालेत..सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सरकारने मध्यमवर्गाला खुश करण्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे १५ आगस्त पासून सोलापूर जिल्हातील खाजगी कार वाहनांना टोलमधून सवलत मिळणार आहे. वर्षाला एकदम ३००० रुपये भरल्यानंतर २०० फेऱ्यांमागे एक टोल आणि एका फेरीची सवलत असणार आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्हातील जवळपास ३ लाख कार मालकांना फायदा होणार असल्याची अशी माहिती सोलापूर – पुणे महामार्ग प्रकल्पाचे संचालक राकेश जवादे यांनी दिली आहे.

राज्यातील महत्वाच्या महामार्गापैकी असलेल्या पुणे – सोलापुर महामार्गबाबत हि महत्वाची घोषणा म्हणावी लागेल. कारण जवळपास याचा फायदा ३ लाख कार मालकांना होणार आहे.. ३००० रुपयाच्या रिचार्ज वर तुम्ही कुठेही देशभरात दोनेशे फेऱ्या मारू शकतात. पण एक महत्वाची अट आहे,ति म्हणजे प्रत्येक वाहनांना Fastag असला पाहिजे. जर Fastag नसेल तर दुप्पट टोल आकारला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत यापूर्वीच घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच १५ ऑगस्ट पासून होणार आहे. FASTag Annual Pass

नेमका टोल किती असेल? FASTag Annual Pass

Fastag नसलेल्या वाहनांना आहे तितका टोल भरावा लागेल. जर Fastag असेल तर तुम्हाला टोलची अर्धी किंमत भरावी लागेल. जर तुम्ही त्याच मार्गावरून २४ तासाच्या आत रिटर्न आल्यास त्याच्यापेक्षाही कमी किमतीत तुमचा प्रवास होईल.

कार मालकाचे किती पैसे वाचतील..

जर एका वेळेस प्रवास केला तर तुमच्याकडून ७५ रुपये घेतात आणि २४ तासाच्या आत परत आल्यास ३५ रुपये घेतात. जर चारचाकीने २०० फेऱ्या मारल्या तर किमान ११००० रुपये होतात. पण ३००० रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला देशात कुठेही २०० फेऱ्या मारता येतील. म्हणजे काय तर चक्क ८००० रुपयाची बचत होणार आहे.

FASTag वार्षिक पास कसा खरेदी करायचा?

ज्या वापरकर्त्यांना FASTag वार्षिक पास मिळवायचा (FASTag Annual Pass) आहे त्यांना त्यांचा वाहन क्रमांक आणि FASTag आयडी वापरून हायवे ट्रॅव्हल अॅप किंवा NHAI/MoRTH वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

यानंतर, तुम्हाला तुमचा FASTag ऍक्टिव्ह आहे का ? आणि नोंदणीकृत वाहन आयडीशी लिंक केलेला आहे याची खात्री करावी लागेल.

या सर्व सूचनांचे पालन केल्यानंतर आणि डिटेल्स भरल्यानंतर, तुम्हाला वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये FASTag ३,००० रुपयांसह अपडेट करावा लागेल.

एकदा का हि प्रोसेस सबमिट झाली कि मग तुमचा FASTag वार्षिक पास ऍक्टिव्ह होईल आणि तुम्ही प्रवास करू शकता.

BSNL Recharge Plans : BSNL चा स्वस्तात मस्त रिचार्ज; 84 दिवस नो टेन्शन

BSNL Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Recharge Plans । देशी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्तात मस्त आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणारे रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. जिओ, एअरटेल, वोडाफोन- आयडिया सारख्या कंपन्यांचे रिचार्ज महाग असल्याने ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणावर बीएसएनएल कडे वळत आहेत. मार्केट मध्ये बीएसएनएलचे एकामागून एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी तब्बल ८४ दिवस आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे ७ रुपयांच्या खर्चात तुम्हाला दररोज ३ जीबी इंटरनेटला लाभ घेता येईल.

BSNL चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- BSNL Recharge Plans

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… अलीकडेच बीएसएनएलने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत या नवीन प्लॅनबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने म्हंटल कि, बीएसएनएल वापरकर्ते फक्त ५९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. ज्यांना रिचार्जसाठी जास्त पैसे खर्च न करता मनसोक्त इंटरनेटचा आनंद लुटायचा आहे अशा ग्राहकांसाठी बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plans) नक्कीच परवडणारा असेल.

कोणकोणते फायदे मिळतात?

BSNL चा ५९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plans) सर्वच बाजूनी ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची मुभा आहे. महत्वाची बाब म्हणजे बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांसाठी आहे. म्हणजे जवळपास तुम्ही ३ महिने या प्लानचा लाभ घेऊ शकता. तेही फक्त ५९९ रुपये… महिन्याचा हिशोब केल्यास प्रति महिना २०० रुपये पडेल. जर तुम्ही दिवसाला ३ जीबी इंटरनेट देणारे एअरटेल, जिओचे रिचार्ज प्लॅन बघितले तर बीएसएनएल पेक्षा खूपच महाग आहेत… त्यामुळे तुम्हालाही कमी पैशात बीएसएनएलचा रिचार्ज परवडेल.

1 रुपयात सिमकार्ड –

बीएसएनएलने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक खास फ्रीडम ऑफर देखील आणली आहे. यामध्ये तुम्ही १ रुपयांत नवीन सिमकार्ड खरेदी करू शकता किंवा तुमचे जुने सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करू शकता. या ऑफर अंतर्गत कंपनी फक्त १ रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज २ जीबी डेटा देत आहे. एवढच नव्हे तर दररोज १०० एसएमएसचा लाभ तुम्हाला मिळतोय.

D Mart च्या बिलांवर शिक्का का मारतात? कारण अगदी वाचण्यासारखं आहे

D Mart bill stamp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । D Mart तर तुम्ही नक्कीच सतत जात असाल आणि नवनवीन वस्तूंची आणि सामानाची खरेदी करत असाल. आपल्या समोर डीमार्ट म्हटले कि भलं मोठं किराणामालाचे दुकान,महागड्या कपड्याची दुकाने, स्मार्टफोन मोबाईलचे दुकाने, सर्वत्र असणारी स्वच्याता,आकर्षक वस्तू असं चित्र उभा राहतं .देशातील प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात अनेक डी मार्टची दुकाने उभी आहेत. देशातील श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांची पसंती डी मार्टला असते.आपल्या दैनदिन जीवनात उपयोगी पडणारी प्रत्येक वस्तू हि डी मार्ट मध्ये मिळत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने डीमार्टच्या खरेदीला प्राधान्य देत असतात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळी ,दसरा, अशा सनानिमित्य सवलतीच्या मोठ्या बंपर ऑफर असतात त्याचा देखील लाभ ग्राहक घेतात.पण ग्राहकांना अनेक वेळा प्रश्न पडला असेल कि बिल देऊन बाहेर जाताना बिलावर शिक्का का मारत असतील? शिक्का मारून नेमकं काय साध्य होतंय? चला तर जाणून घेऊयात…

या 7 कारणामुळे डी मार्टमध्ये बिलांवर शिक्का मारतात– D Mart

1) आपल्या स्टोअरला भेट दिलेल्या ग्राहकांला विश्वास आणि पारदर्शकता वाटावी.

2) डी मार्ट स्टोअरमधील वस्तूंच्या चोरीचे प्रकार टाळण्यासाठी बाहेर पडताना क्रॉस पद्धतीने वस्तू चेक करतात. त्यानंतर बिलावर शिक्का मारला जातो.

३) D Mart च्या बिलावर शिक्का मारला जातो कारण ते बिल वैध (valid) आहे आणि खरेदीची नोंद झाली आहे, हे दाखवण्यासाठी

४) काही वेळा बिलात देखील चुका होऊ शकता. मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक बिघाडांमुळे होऊ शकतात.तसेच वस्तू चुकीच्या पद्धतीने स्कॅन केल्या जाऊ शकतात, त्यांचे वजन चुकीचे असू शकते किंवा किंमत चुकीची असू शकते. हि गोष्ट एक्झिट चेक दरम्यान आढळून येतात.

५) बिलावर शिक्का मारल्याने, खरेदीची नोंद व्यवस्थित झाली आहे, हे तपासले जाते. यामुळे, मालाची विक्री आणि एकूणच व्यवहार व्यवस्थितपणे रेकॉर्ड होतो.

६) बिलावर शिक्का मारल्याने, बिलात फेरफार करणे किंवा त्याची कॉपी करणे अवघड जाते. यामुळे चुकीच्या गोष्टीना आळा बसतो.

७) कधी कधी आपण एखादी वस्तू रिटर्न करायला जातो, त्यावेळी बिलावर शिक्का असणे गरजेचं असते.

दरम्यान, देशातील रिटेल क्षेत्रात काम करणारी D Mart हि आघाडीची कंपनी आहे. आज देशात डी मार्टचे जाळे १२ राज्यात पसरले असून ४१५ हून अधिक स्टोअर उभारले आहेत. माणसाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, मग त्या कपड्यांपर्यंत ते अगदी किचन मधील भांड्यांपर्यंत… आंघोळीच्या साबणापासून ते गहू- तांदळापर्यंत , कोणती वस्तू नाही असं कधीच डीमार्ट मध्ये बघायला मिळणार नाही.,,, ग्राहकांना सर्वकाही एकाच छताखाली देणाऱ्या डीमार्टची स्थापना केली राधाकृष्ण दमाणी यांनी… मुंबईतून सुरु झालेलं डीमार्ट पुढे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. डीमार्टच्या माध्यमातून हजारो युवकांना नोकऱ्याही मिळत आहेत.