Sunday, December 7, 2025
Home Blog Page 23

Mumbai To Madgaon Train : मुंबईतून कोकणात धावणार स्पेशल ट्रेन; पहा वेळापत्रक आणि थांबे

Mumbai To Madgaon Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Madgaon Train । मुंबईतून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने रेल्वेला नेहमीच मोठी गर्दी बघायला मिळते. त्यातच सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे आणि उद्यापासून १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असेल. यापार्श्वभूमीवर परतीच्या प्रवासात प्रवाशाना त्रास होऊ नये यासाठी रेल्वे विभागाने मुंबई आणि गोवा दरम्यान, एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हि ट्रेन कोकणच्या निसर्गातून धावणार आहे. मुंबईतून कोकणात धावणाऱ्या या स्पेशल ट्रेनमुळे प्रवाशांची गर्दी आटोक्यात येईल. या ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल? कोणकोणत्या स्थानकांवर तिला थांबा असेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

कसं असेल वेळापत्रक? Mumbai To Madgaon Train

ट्रेन क्रमांक ०१५०२ हि विशेष रेल्वे १७ ऑगस्ट २०२५ (रविवार) रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१५०१ हि विशेष रेल्वे १८.०८.२०२५ (सोमवार) रोजी सकाळी ०८.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगावला पोहोचेल.(Mumbai To Madgaon Train)

कोणकोणत्या स्थानकावर थांबा –

मुंबईतून कोकणात धावणारी ही विशेष (Mumbai To Madgaon Train) ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

कशी असेल ट्रेनची रचना –

ही विशेष रेल्वेगाडी 20 डब्ब्यांची असेल. या ट्रेन मध्ये एक एसी-२ टियर, तीन एसी-३ टियर, दोन एसी-३ टियर इकॉनॉमी, ८ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास, १ जनरेटर कार आणि १ सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल. १३ ऑगस्ट २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर या स्पेशल ट्रेन साठी बुकिंग सुरु झालं आहे.

Monsoon Tourism Places In Maharashtra : लॉँग विकेंडला फिरायला जाताय? पावसाळ्यातील 5 बेस्ट ठिकाणे पहाच

Monsoon Tourism Places In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Monsoon Tourism Places In Maharashtra । मित्रानो, उद्या १५ ऑगस्ट आणि त्यानंतर शनिवार- रविवार…. म्हणजेच काय तर सलग ३ दिवस सुट्टी… आता ३ दिवस सुट्टी म्हंटल्यावर फिरायला जाण्याची इच्छा तर होणारच ना… खास करून मुंबई पुण्यातील नोकरदार वर्ग तर या सुट्ट्यात हमखास कुठेतरी फिरण्याचा प्लॅन आखतोच… पण सध्याच्या पावसाळयाच्या दिवसात फिरायला जायचं तर नेमकं कुठं जायचं?? निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनसोक्त मजा कुठे करायची? याबाबत आपल्या मनात नेहमीच गोंधळ उडतो. परंतु चिंता करू नका… मुंबई पुणे शेजारील ५ बेस्ट पर्यटन स्थळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याठिकाणी जाऊन तुम्ही फुल्ल एन्जॉय करू शकता.

१) अलिबाग / काशीद बीच –

मुंबईपासून 95–120 किमी अंतरावर असलेला हा बीच पर्यटनाचे खास आकर्षण आहे. अथांग समुद्रकिनारा, आसपास मुरूड जंजिरा सारखा किल्ला.. आणि मुंबईत पुण्यापेक्षा वेगळं वातावरण यामुळे कायमच अलिबागला पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. मुंबईपासून फेरीने सहज याठिकाणी पोहोचता येईल. अलिबागमध्ये पॅरासेलिंग, जेट स्की, बोटिंग, कायाकिंग, वॉटर स्कूटर आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या साहसी खेळांची सोय आहे, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

२) बदलापूर – Monsoon Tourism Places In Maharashtra

तुम्हाला माहिती नसेल तर फिरण्यासाठी आणि सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी बदलापूर सुद्धा बेस्ट ठिकाण आहे. कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा, भोज धरण, कार्णाळा पक्षी अभयारण्य, भगीरथ धबधबा, बारवी धरण हि इथली प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय बदलापूर मध्ये अनेक उत्तम रिसॉर्ट अगदी परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. बदलापूर मधील मुळगाव या गावाजवळ वसलेले खंडोबाचे मंदिर उंच टेकडीवर असल्याने आसपासचे नयनरम्य दृश्ये दिसतात.

३) लोणावळा – खंडाळा

मुंबईपासून ८५ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे पर्यटकांचं सर्वात आवडत ठिकाण…. याठिकाणी तुम्ही भुशी डॅम, राजमाची पॉईंट, लायन आणि टायगर पॉईंट, लोणावळा लेक, राजमाची किल्ला ट्रेक, विसापूर आणि लोहगड ट्रेक्स, यांसारखी दृश्ये पाहू शकता… मनमोहक दृश्याचे फोटो काढू शकता. पावसाळ्याच्या दिवसात हिरवाई, धबधबे आणि धुके—शहरी गोंधळापासून सुटका मिळवायची असेल लोणावळा तुमच्यासाठी उत्तम ठिकाणं ठरेल. लोणावळ्यात जेवणाचीही उत्तम सोय असल्याने तुमची ट्रिप वाया जाणार नाही.

४) इगतपुरी –

पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरण्यासाठी (Monsoon Tourism Places In Maharashtra) असणाऱ्या ठिकाणांपैकी इगतपुरी हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. ध्यान, निसर्ग, इतिहास आणि साहसाचा अप्रतिम संगम म्हणजे इगतपुरी… मुंबई- नाशिक मार्गावर असलेल्या इगतपुरीत दरवर्षी हजारो लोक पर्यटनासाठी येतात. इगतपुरी शहराला फॉग सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या शहराच्या जवळपास अनेक धबधबे आहेत. पावसाळ्यात त्याचे सौदर्यं पर्यटकांना खास अनुभव देते. इगतपुरीचा भावली धबधबा पर्यटकांसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथील अद्भूत दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

५) कर्जत –

मुंबईपासून साधारण 100-110 किमी अंतरावर असलेलं कर्जत हे महाराष्ट्रातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक डोंगर, दऱ्या, नयनरम्य दृश्ये आणि हिरवीगार निसर्गरम्यता आहे. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कर्जतमध्ये तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग, अशा विविध ऍक्टिव्हिटी करू शकता. परंतु खबरदारी घेणेही गरजेचं आहे. पावसाळ्यात ट्रेक करताना पायासाठी चांगले, घसरणरोधक शूज वापरा, म्हणजे तुम्ही चालताना घसरणार नाही. पर्यटनानंतर कर्जतमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय सुद्धा चांगली आहे. बरेच व्हिला आणि रिसॉर्ट इथं मुक्कामासाठी तुम्हाला उपलब्ध असतील. तसेच जेवणाचं सांगायचं झाल्यास, कर्जत परिसरात खासकरून मटणाची करी फारच लोकप्रिय आहे. तसेच शाकाहारी लोकांसाठी गरम पिठलं-भाकरी, उसळवर तुम्ही ताव मारू शकता.

Indian Railways Rules : रेल्वेने प्रवास करताय?? तिकीट चेकिंगचा नियम जाणून घ्या

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Rules । आपल्यापैकी बहुतेक जण दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. त्यात महत्वाचे म्हणजे तो प्रवास शक्यतो आरक्षित तिकिटाने करतो. कारण दूरच्या प्रवासाला प्रवासांना आरामाची आवश्यकता असते. पण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात आरक्षित डब्बात विना तिकीट करणाऱ्या प्रवासाची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षित डब्ब्यात सतत तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. पण याचा भलताच त्रास प्रवासांना होत आहे.. सततच्या तिकीट तपासणीमुळे प्रवाशांची रात्रीच्या वेळी झोपमोड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण रात्रीच्या वेळी तिकीट तपासण्याचा अधिकार तिकीट चेकरला आहे का? तिकीट चेकर तुमचे तिकीट केव्हा तपासू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? हीच माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

तिकीट चेकर केव्हा तिकीट तपासू शकतो? Indian Railways Rules

रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभाग नवनवीन नियम जारी करत असते. प्रत्येक नियमाचा उद्देश हाच असतो कि प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळावी आणि कोणताही त्रास होऊ नये. तिकीट चेकिंगचा नियम सुद्धा प्रवाशांचे हिट लक्ष्यात घेऊनच करण्यात आला आहे. रेल्वेचा नियम पहिला (Indian Railways Rules) तर तिकीट तपासणी अधिकारी हे रात्री १० नंतर तपासणी करू शकत नाही. प्रवाशांना रात्री शांत झोपता यावी म्हणून हा नियम करण्यात आला आहे. परंतु जर एखादा प्रवासी रात्री १० वाजल्यानंतर ट्रेनमध्ये चढला तर त्या विशिष्ट परिस्थितीत टीटीईला तिकीट तपासण्याची परवानगी आहे. परंतु कधीही कोणाला उठवून तुझं तिकीट दाखव असं म्हणण्याचा अधिकार तिकीट चेकरला नाही.

खरं तर रेल्वे प्रशासन चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहते. पण प्रवाशी हे नियम (Indian Railways Rules) माहित नसल्याने तक्रार करत नाहीत. आरक्षित डब्ब्यात रात्री १० नंतर दिवे बंद केले जातात. तसेच मोठ्याने गाने लावण्यास सुद्धा प्रतिबंध असतात. अगदी फोन वरती हि मोठ्याने बोलता येत नाही. रात्रीच्या वेळी सफाई कर्मचाऱ्यांची हालचाल देखील कमी केली जाते. हे सर्व नियम प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व आनंदी व्हावा म्हणून काळजी घेतली जाते.म्हणून प्रत्येक प्रवासांनी या नियमाचा वापर केला पाहिजे.आणि आपलं प्रवास सुखाचा करून घेतला पाहिजे. जर तुम्हाला कोणती अडचण वाटली तर तुम्ही रेल्वे विभागाकडे तक्रार सुद्धा करू शकता.

Modi Express For Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त मोफत प्रवास अन जेवण; कोकणवासीयांसाठी धावणार मोदी एक्सप्रेस

Modi Express For Ganeshotsav 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Modi Express For Ganeshotsav 2025 । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. मात्र यंदा एक नाही, तर दोन दोन मोदी एक्सप्रेस कोकणात धावणार आहेत. मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मागील १२ वर्षांपासून हजारो गणेश भक्तांसाठी ही विशेष रेल्वे सेवा मोफत चालवली जात आहे. यंदा या मोफत रेल्वे सेवेचे हे १३ वी वर्ष आहे. विशेष बाब म्हणजे या मोदी एक्सप्रेस मध्ये भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

नितेश राणे यांनी याबाबत माहिती देताना म्हंटल कि, यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील लोकांनी भाजप आणि राणे कुटुंबाला पूर्ण पाठिंबा दिला. या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आम्ही मोदी एक्सप्रेस (Modi Express For Ganeshotsav 2025) या रेल्वेसेवेचा आणखी विस्तार करत आहोत. तसेच या दोन्ही गाड्यांमधील सर्व प्रवाशांना मोफत जेवण आणि पिण्याचे पाणी देखील मिळेल, जेणेकरून त्यांचा प्रवास आरामदायी होईल. ही फक्त एक यात्रा नाही, तर कोकणच्या मातीशी आणि गणपती बाप्पाच्या दरबाराशी जोडण्याचे एक साधन आहे. प्रत्येक कोकणवासीयाने त्यांच्या गावी पोहोचून कोणत्याही तणावाशिवाय उत्सव साजरा करावा अशी आमची इच्छा आहे.

कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक – Modi Express For Ganeshotsav 2025

पहिली ट्रेन : कोकणाकडे जाणारी पहिली मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. रत्नागिरी आणि कुडाळ येथे या ट्रेनला थांबा असेल आणि शेवटचे स्टेशन सावंतवाडी असेल.

दुसरी ट्रेन : कोकणाकडे जाणारी दुसरी मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. वैभववाडी आणि कणकवली या स्थानकांवर या ट्रेनला थांबा असेल. या दोन्ही रेल्वे मधील आसन क्षमता मर्यादित असल्याने प्रवाशांनी वेळेत तिकिटे बुक करणे महत्वाचे आहे.

कधीपासून कराल बुकिंग?

तिकीट वाटप 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. इच्छुक प्रवाशांनी आपल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करावी. ‘प्रथम येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर बुकिंग होईल. गणेशोत्सवादरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी असते, अशावेळी हि मोदी एक्सप्रेस हजारो प्रवाशांना मोठा दिलासा देईल.

Pune Metro Nigdi To Chakan : पुणेकरांसाठी नवीन मेट्रो लाईन!! कुठून- कुठपर्यंत धावणार पहा

Pune Metro Nigdi To Chakan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro Nigdi To Chakan । पुणे हे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महत्वाचे औद्योगिक शहर म्हणून पुढे येत आहे. देशातील महत्वाच्या १० शहरात पुण्याची गणना केली जाते. लोकसंख्याचा जर विचार केला तर आजघडीला पुण्याची लोकसंख्या हि दीड कोटीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुण्यात वाहतुकीची समस्या तर नित्याचीच असते. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी नवनवीन रस्ते, मेट्रो लाईन जोडण्याचे काम सुरु आहे. पुणेकरांचा प्रवास सोप्पा आणि आरामदायी व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणजे आता निगडी ते चाकण अशी नवीन मेट्रो सेवा पुण्यात सुरु होणार आहे. हा मार्ग जवळपास ३५ ते ४० किलोमीटरचा असेल. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. चाकणला कामानिमित्त जाणाऱ्यांना या मेट्रोहच मोठा फायदा होईल.

शंकर जगताप यांनी ट्विट करत म्हंटल, निगडी-चाकण मेट्रो: भविष्य योग्य दिशेने वाटचाल करत आहे! पिंपरी-चिंचवडसाठी एक गेम-चेंजर जवळ येत आहे महामेट्रोने अधिकृतपणे पीसीएमसीला तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला आहे – निगडी ते चाकण मेट्रो (Pune Metro Nigdi To Chakan) प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल आहे. स्वर्गीय लक्ष्मणभाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, पिंपरी-चिंचवड एक औद्योगिक पॉवरहाऊस बनले. तो वारसा पुढे नेत, मी राज्य विधानसभेत ही मागणी मांडली – आणि आता आपण ते घडताना पाहत आहोत. आपल्या शहरासाठी अधिक स्मार्ट, हिरवे आणि वेगवान भविष्याचे स्वागत करूया असं शंकर जगताप यांनी म्हंटल.

कसा असेल मेट्रो मार्ग – Pune Metro Nigdi To Chakan

प्रस्तावित मेट्रो प्रकल्प हा निगडी ते चाकण या औद्योगिक पट्ट्यातून जाणार आहे. त्यांची लांबी हि जवळपास ३५ ते ४० किलोमीटर आहे. पुणे पिंपरी चिचवड आणि पुण्याचा ग्रामीण भागातूनही मेट्रो जात असल्याने आता पुण्याची गती वाढणार आहे. चाकण एमआयडीसीहून पुण्यात किवा पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. याला एक चांगला पर्याय म्हणून या मेट्रोमार्गाकडे पहिले जाईल.

मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे पिंपरी-चिंचवडमधील आधीच गर्दी असलेल्या रस्त्यांवरील भार कमी होऊन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवाय, निगडी ते चाकण दरम्यानची मेट्रो कनेक्टिव्हिटी औद्योगिक कॉरिडॉरमध्ये सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करून स्थानिक उद्योगांना आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि वाढत्या शहरीकरणाचे कारण देत लोणी काळभोर ते उरुळी कांचनपर्यंत मेट्रो नेटवर्क वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात मेट्रोमुळे पुण्याची गती निश्चित वाढणार आहे.

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून ‘या’ वाहनांना बंदी

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Goa Highway । गणेशोत्सव अगदी १२- १३ दिवसांवर आला असून मुंबई पुण्यातून कोकणात जाणारे चाकरमानी तयारीला लागले आहेत. मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त काही स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. तर चारचाकी वाहनधारक किंवा बसने जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई गोवा महामार्गावरून जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावरून गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त या महामार्गवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत माहिती दिली असून चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या वेळेत बंदी ? Mumbai Goa Highway

मुंबई गोवा महामार्गाची अवस्था आधीच वाईट आहे. त्यात गणेशोत्सवाला या महामार्गावर गाड्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि प्रवाशांना आरामात कोकणात जाता यावे यासाठी प्रशासनाने अवजड वाहनांना काही ठराविक कालावधीसाठी बंदी घातली आहे.
त्यानुसार 23 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत या बंदीचे पालन अवजड वाहन चालकांना पाळावे लागणार आहे.

दरम्यान, गणेश भक्तांसाठी मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी तयारी करण्यात आली आहे. पोलीस मदत केंद्र , टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा प्रवाशांना देण्यात येईल. एवढंच नव्हे तर वैद्यकीय कक्ष, रूग्‍णवाहिका सेवा, बालक आहार कक्ष, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गणेशभक्तांचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा व्हावा यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत.

अवजड वाहनांना पर्यायी मार्ग कोणते?

अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर बंदी असली तरी, त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या काळात ही अवजड वाहने पुणे-सातारा- कराड- कोल्हापूरमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास करू शकतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटातून या वाहनांना कोकणात जावे लागेल.

Panvel To Karjat New Train : पनवेल- कर्जत नवा रेल्वेमार्ग!! 2782 कोटींचा प्रोजेक्ट गेमचेंजर ठरणार

Panvel To Karjat New Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Panvel To Karjat New Train । मुंबई,पुणे ठाणे या परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्पाचे काम चालू आहे.. मुंबई पुणे या पट्टयात रेल्वेचे विस्तारीकरण, उड्डाण पुलाची कामे, तसेच महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहे.हर्बल लिंक रोड,अटल सेतू, विरार आणि आलिबाग प्रकल्प अश्या अनेक प्रकल्पाची काम चालू आहे.विशेष म्हणजे मुंबई उपनगरीय रेल्वे सुविधा सुधारण्यासाठी सरकारचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे. याच उपनगरीय रेल्वे संदर्भातील महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतलेला पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर होय..या पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वेचे काम वेगाने सुरू असून, प्रकल्पाचे 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे खालून कशी धावणार लोकल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे खालून लोकल धावणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पनवेल मार्गे कर्जत (Panvel To Karjat New Train) या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. त्यामुळे कल्याणमार्गे होणारी गर्दीही कमी होईल. तसेच मुंबई आणि ठाणे या भागातील प्रवासांसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणारा आहे. या नव्या रेल्वे मार्गाचा रोडमाप पहिला तर हा मार्ग डोंगराळ भागातून जात आहे. त्यात वावरले, नधाळ आणि किरवली असे तीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.तर काही भागाचे खोदकाम पूर्ण झाले असून, 65 पुलांपैकी 59 पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुणे एक्सप्रेस-वे अंडरपाससाठी गर्डर लाँच करून एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे.

प्रकल्पाचा अंदाजित खर्च– Panvel To Karjat New Train

हा प्रकल्प मुंबई ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट- ३ हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळा अंतर्गत 2782 कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण केला जात आहे. हा प्रकल्प दोन जुन्या स्थानकांना जोडतो, तसेच उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पूल यामध्ये समाविष्ट आहे. सध्या या जुन्या लाइनवर प्रामुख्याने मालगाड्या आणि लांबपल्ल्याच्या प्रवासी गाड्या धावतात. या नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई- कर्जतदरम्यान लोकल हि पनवेलमार्गे धावू शकणार आहे..

या प्रकल्पाची वैशिष्ट्यं काय असतील?

आतापर्यंत प्रकल्पाचे काम हे ७० टक्के झाले असून, या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ६५ पैकी ५९ पुलाचे देखील झाले आहे. रेल्वे मार्गाचे काम साधारणतः 70 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी ३० किलोमीटर काम पूर्ण झाले. तर जवळपास २१ किलोमीटरचे रूळ बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यात उसरली, चिखले, मोहोपे या चौकदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्प अंतर्गत पनवेल, चिखले, मोहोपे, चौक, कर्जत हि स्थानके असणार आहे.

रायगड, नवी मुंबई आणि या आसपासच्या भागातील प्रवासांना या प्रकल्पामुळे सुधारित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच या भागातील विकासाला देखील चालना मिळणार आहे. तर दुसरीकडे पनवेल मार्ग कर्जतला जाणाऱ्या प्रवासंच्गा ३० मिनिट वेळ वाचणार आहे. तसेच कल्याण मार्गावरील गर्दी देखील कमी होणार आहे. मुंबई कर्जत दरम्यान लोकल गाड्या पनवेल मार्गे धावतील. या प्रकल्पाचा फायदा हा नवी मुंबई,ठाणे उपनगर आणि रायगडच्या काही भागाला होणार आहे. या पट्टयात विकासाचे अनेक मोठे प्रकल्प येऊ शकतात.

17 New Gram Panchayat In Maharashtra : महाराष्ट्रात तयार होणार 17 नवीन ग्रामपंचायती; जयकुमार गोरेंची मोठी घोषणा

17 New Gram Panchayat In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 17 New Gram Panchayat In Maharashtra । महाराष्ट्रात १७ नवीन ग्रामपंचायती निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या ग्रामपंचायत व पंचायत राज विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या नवीन ग्रामपंचायतीच्या निर्मितीमुळे आता महाराष्ट्रातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या २७ हजार ९६८ इतकी झाली आहे‌. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे संबंधित गावे विकासाच्या प्रवाहात येतील अशी आशा जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २४३ (खंड छ) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ४ नुसार या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती (17 New Gram Panchayat In Maharashtra) करण्यात आली आहे. नव्याने स्थापन आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे विभागातील सात, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा, कोकण व नागपूर विभागातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे या सर्व गावांच्या विकासाला आता गती मिळेल आणि सर्व गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील असे मत जयकुमार गोरे यांनी मांडलं.

कोणकोणत्या नव्या ग्रामपंचायतीचा समावेश? 17 New Gram Panchayat In Maharashtra

पुणे – ढाकाळे व खामगळवाडी (बारामती तालुका), एडगाव व भोरवाडी (जुन्नर तालुका), गार, बेटचीवाडी, मवीनगार (दौंड)

छत्रपती संभाजीनगर – निंबायती व रामपुरा ( सोयगाव )

रत्नागिरी – चिंद्रवली व उमरे ( रत्नागिरी तालुका)

जालना – पाथरवाला बुद्रुक व कुरण ( अंबड ) हिवराराळा व हनुमान नगर (बदनापूर)

नागपूर – पोटा व चनकापूर (सावनेर)

नव्या ग्रामपंचायतीचे फायदे काय ?

नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे गावाचा विकास होतो, स्थानिक समस्यांवर तातडीने तोडगा काढता येतो, लोकांच्या सहभागाला वाव मिळतो. सरकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेता येतो. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

Congress On Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत?? काँग्रेसने केलं स्पष्ट

Congress On Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी बघायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू भविष्यातील राजकारणात सुद्धा एकत्र राहण्याची शक्यता आहे. परंतु उद्धव ठाकरे हे आधीच महाविकास आघाडीत असल्याने राज आणि उद्धव एकत्र कसे येणार? कि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेऊन येणार याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहे. नुकताच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा पार पडला असून त्यावेळी राज ठाकरेंबाबत बोलणं झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाविकास आघाडीसोबत जाणार का? याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या तरी राज ठाकरे आमच्या आघाडीत नाहीत असं त्यांनी म्हंटल आहे.

आज रमेश चैनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप होत आहे. या कार्यशाळेत बोलताना चैनिथला यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती.

रमेश चैनिथला म्हणाले, दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काहीही अडचण नाही. परंतु सध्या तरी राज ठाकरे आमच्या आघाडीत नाहीत. तसेच आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होऊ ही शकणार नाही. आघाडीबाबत आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ असे म्हणत रमेश चैनिथला यांनी खळबळ उडवून दिली आहे. चैनिथला यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडी तुटणार किंवा काँग्रेस स्वबळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार का? या चर्चांना जोर आला आहे.

यावेळी त्यांनी महायुती सरकारही टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी आहे, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्यांनी अजून कर्जमाफी केली नाही अस रमेश चैनिथला यांनी म्हंटल. तसेच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. लवकरात लवकर निवडणुकीच्या घोषणा केल्या पाहिजे, अशी मागणीही चैनिथला यांनी केली.

Ganeshotsav 2025 : गणपतीला अर्पण करा या गोष्टी; तुमचंही भाग्य उजळेल

Ganeshotsav 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025 । यावर्षी २७ ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच्या आधीच हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. १० दिवसाचा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्सहाने साजरा केला जातो. याकाळात गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. आरती म्हंटली जाते. गणेशाच्या भक्तीत भाविक अगदी तल्लीन होतात. जीवनात प्रगती आणि उन्नती मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्र देखील भगवान गणेशाची पूजा करण्याचा सल्ला देते. परंतु हि पूजा करत असताना काही गोष्टी गणपती बाप्पाला अर्पण कराव्या. यामुळे तुमचं भाग्य नक्कीच उजळू शकते.

१) दुर्वा-

गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडते. म्हणूनच पूजा करताना गणरायाला दुर्वा अर्पण कराव्या.. सनातन शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे की, अनलासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर गणपतीच्या अंगाची आग झाली होती. त्यावेळी कश्यप ऋषींनी गणपतीला 21 दुर्वांची जुडी अर्पण केली, ज्यामुळे त्याची आग शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते. जर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर भगवान गणेशाला (Lord Ganesha) २१ दुर्वा अर्पण करा.

२) गुळाचे मोदक- Ganeshotsav 2025

गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याला गुळाचे मोदक अर्पण करा. तुम्ही घरी सुद्धा गुळाचे मोदक बनवू शकता. भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात. यामागे एक पौराणिक कथा आहे. एकदा, देवी पार्वतीला एका दिव्य मोदकाचं (अमृत-सिद्ध) प्राप्ती झाली, ज्यामध्ये सर्व ज्ञान आणि शक्ती सामावलेली होती. तिने तो मोदक गणपतीला खाण्यासाठी दिला. गणपतीने तो मोदक खाल्ला आणि त्याला खूप आनंद झाला. तेव्हापासून गणरायाला मोदक आवडतात. त्यामुळे मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात. आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात.

३) सिंदूर

जर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसन्न करायचे असेल, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी (Ganeshotsav 2025) पूजा करताना भगवान गणेशाला सिंदूर नक्कीच अर्पण करा. गणपतीला शेंदूर लावण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत. धार्मिक दृष्ट्या, शेंदूर हे शुभ आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते, तर वैज्ञानिक दृष्ट्या, शेंदूरामध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत ज्यामुळे मूर्तीचे संरक्षण होते. इच्छित फळ मिळविण्यासाठी, गणपतीला सिंदूर अर्पण करताना, बाप्पासमोर तुमची इच्छा व्यक्त करा.