Sunday, December 7, 2025
Home Blog Page 24

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव काळात DJ वर निर्बंध; नियम तोडल्यास होईल कारवाई

Ganeshotsav 2025 DJ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025। हिंदू धर्मियांचा महत्वाचा असलेला गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २७ ऑगस्टला अगदी थाटामाटात गणपती बाप्पाचे स्वागत होईल. गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या घरांमध्ये लगबग सुरु आहे. महाराष्ट्राचा विचार करायचं झाल्यास, शहरी भागात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईत मोठ्या धूमधडक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील कसबा गणपती,दगडूशेठ गणपती,खजिना गणपत, केशरीवाडा गणपती तर मुंबईतील लालबाग गणपती मंडळ, दादर गणपती मंडळ,गिरगाव गणपती मंडळ या प्रमुख मंडळाकडे गणपतीचे आगमन झाले आहे. यानिमित्ताने पोलीस प्रशासन देखील सज्ज्य झाले आहे. याच दरम्यान, मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर उलट आहे. मुंबईत गणेशोत्सवात काळात डीजे वाजवण्यावर उच्य न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही कुठे डिजे वाजवल्याचे आढळून आलं तर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहे उच्य न्यायालयाची नियमावली? Ganeshotsav 2025

उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत कडक नियम लागू केले आहेत.त्यामध्ये रात्री 10 वाजल्यानंतर 50 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी पातळी ओलांडता येणार नाही . सकाळी 6 वाजेपूर्वी डीजे वाजवणे हे बेकायदेशीर कृत्य समजले जाईल. जर कोणी हा नियम तोडला तर त्यांच्यावर पोलिस किंवा स्थानिक प्रशासन त्वरित कारवाई करू शकते. कोणाकडून उल्लंघन झाल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. किंवा उपकरणे जप्तीचा इशारा देण्यात आला येईल. डीजे वापरण्यापूर्वी स्थानिक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. ध्वनी मर्यादा हि (दिवसा 55 डेसिबल, रात्री 45 डेसिबल) असेल.

नियम तोडणाऱ्यांना आर्थिक दंड किती असेल?

जर कोणत्या मंडळाने ध्वनी प्रदूषणाचा नियम जर मोडला तर ध्वनी प्रदूषण नियम, 2000 या कायदा अंतर्गत, रात्री 10 वाजेनंतर डीजे वाजवल्यास दंड आकारला जाऊ शकतो. रक्कम मात्र उल्लंघनाच्या स्वरूपावर अवलंबून असते, परंतु सामान्यतः दंड हा हजारों रुपयांपासून सुरू होतो. किंवा मुंबई पोलिसांना डीजे उपकरणे, जसे की साउंड सिस्टम, मिक्सर, आणि लाऊडस्पीकर जप्त करण्याचा अधिकार आहे. अशा घटना गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) सणांदरम्यान वारंवार घडतात.जर पोलिसांनी कायदेशीर प्रकरण नोंदणी करून कार्यवाही केली तर भारतीय दंड संहिता (BNS) किंवा पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. यामुळे तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच गणेश मंडळांवर कारवाई देखील कारवाई होऊ शकते… गणेशोत्सवासारख्या उत्सवांमध्ये डीजे जर बंदीचं उल्लंघन झाल्यास गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते, ज्यात मंडपाचा परवाना रद्द होणे किंवा मंडपावरील इतर निर्बंधांचा समावेश आहे

Ganesh puja 2025 : गणपतीची पूजा करताना कधीही करू नका ‘या’ चुका

Ganesh puja 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh puja 2025 । येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव सुरु होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. काही जणांच्या घरात दीड दिवसाचा गणपती असतो, काही लोक ५ दिवसासाठी गणपती आपल्या घरी आणतात तर काही जणांच्या घरी १० दिवस बाप्पा विराजमान होत असतात. या काळात गणरायासाठी खास अशी आरास केली जाते. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ आरती म्हंटली आहे. आणि गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवला जातो. परंतु हे सगळं करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. खास करून गणपती बाप्पाच्या पूजेवेळी काही चुका टाळाव्या.

कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या ? Ganesh puja 2025

अशुद्ध वस्तूंचा वापर-

गणपतीच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू स्वच्छ आणि पवित्र असल्या पाहिजे. अस्वच्छ किंवा अपवित्र वस्तूंचा वापर करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे स्वच्छता हि तुम्हाला सर्वात आधी पाळावी लागेल.

तुळशीची पाने –

शास्त्रांनुसार, गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी बाप्पाला तुळशीची पाने वाहिली जातात. पण त्यानंतरची नऊ दिवस गणरायाला तुळशी पाने वाहू नयेत असे मानले जाते. इतर दिवशी फक्त दुर्वा वाहावी.

नकारात्मक ऊर्जा टाळा –

गणपतीच्या पूजेला बसल्यानंतर नकारात्मक विचार करणे टाळावे. सकारात्मक विचाराने आणि आनंदी मनाने गणपतीची पूजा करावी. Ganesh puja 2025

तुटलेला तांदूळ वापरू नये –

गणरायाच्या पूजेवेळी अक्षता अर्पण करताना कधीही तुटलेला तांदूळ वापरू नये… असा तांदूळ वापरणे अशुभ मानले जाते. म्हणून पूजेवेळी नेहमी अखंड तांदूळ वापरा.

ताजी फुले वापरा –

श्रीगणेशाच्या पूजेसाठी नेहमी स्वच्छ आणि ताजी फुले वापरावीत. शिळ्या फुलांचा वापर चुकूनही करू नये.

मांसाहार करू नका –

गणेशोत्सवाच्या काळात चुकूनही मांसाहार करू नये.. मांसाहार करून पूजेला बसने सर्वात मोठं पाप मानलं जाते.

गणरायाच्या आधी जेवू नये –

आपल्या घरात गणपती असताना कधीही त्याला नैवेद्य दाखवायच्या आत स्वतः जेवण करू नये….. आधी गणरायाला नैवेद्य दाखवावा आणि नंतरच तुम्ही भोजन करा.

नैवेद्य योग्य असावा –

गणपतीला मोदक, लाडू आणि फळे यांचा नैवेद्य दाखवावा. इतर कोणत्याही वस्तूंचा नैवेद्य दाखवणे योग्य मानले जात नाही.

न्यूयॉर्क येथील 43 व्या ‘इंडिया डे परेड’साठी, बॉलिवूड कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून निवड

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna

न्यूयॉर्क, ११ ऑगस्ट २०२५ – बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे ४३ व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून सहभागी होणार आहेत. “जागतिक स्तरावरील अस्वस्थ कालखंडात, ‘सर्वे भवंतु सुखिनः’ हा सर्वांसाठी सुखनैव जगण्याचा संदेश देणाऱ्या थीम अंतर्गत ही परेड १७ ऑगस्ट रोजी मॅडिसन अव्हेन्यूवर होणार आहे,’’ असे ‘एफआयए’चे अध्यक्ष सौरिन परिख यांनी सांगितले.

फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA-NY-NJ-CT-NE) ने अलीकडेच न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासात ४३ व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’चे वेळापत्रक जाहीर केले. या वेळी भारतीय राजदूत बिनया एस. प्रधान यांनी ‘एफआयए’च्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले, ‘‘अर्धशतकापासून फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने अमेरिकेत भारताच्या प्रतिमेला उंचावण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. १९८१ मध्ये अत्यंत लहान प्रमाणात सुरू झालेली ही परेड आज जगातील सर्वात मोठी इंडिया डे सेलिब्रेशन परेड म्हणून माध्यमांतून गौरवली जाते.’’

१९७० मध्ये स्थापन झालेली एफआयए ही एक प्रमुख स्वयंसेवी संस्था असून, भारतीय संस्कृतीचा प्रचार, नागरी सहभाग आणि भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी, ती न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडसारखे भव्य कार्यक्रम आयोजित करत असते. या प्रतिष्ठित आणि देशभक्तीपर कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या सहा भाषांमध्ये विशेष संदेश देत लोकांना या कार्यक्रमाचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या संपूर्ण उत्सवासाठी ‘क्रिकमॅक्स कनेक्ट’ हे प्रमुख प्रायोजक असून, पुढील दशकात अमेरिकेत क्रिकेटला फुटबॉलइतकेच लोकप्रिय करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प त्यांनी घेतला आहे.

शुक्रवार, १५ ऑगस्टपासून या परेड निमित्त कार्यक्रम सुरू होईल, ज्यात एम्पायर स्टेट बिल्डिंगवर प्रकाशयोजनेच्या माध्यमातून तिरंगा झळकवण्यात येईल. शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेअरवर भारतीय ध्वजवंदन समारंभ होईल आणि त्यानंतर पहिल्यांदाच इथे क्रिकेट सामना आयोजित केला जाईल. रविवारी, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मॅडिसन अव्हेन्यूवर ‘इंडिया डे परेड’ सुरू होईल. न्यूयॉर्कमधील इस्कॉन आयोजित विक्रमी रथयात्रा या परेडदरम्यान मॅनहॅटनमध्ये भव्यतेने झळकणार आहे. परेडनंतर सिप्रियानी वॉल स्ट्रीट येथे ‘इंडिपेन्डन्स ग्रँड गाला’ आयोजित करण्यात आला आहे.

‘एफआयए’चे चेअरमन अंकुर वैद्य यांनी या कार्यक्रमाच्या सामुदायिक भावनेवर भर देत सांगितले, ‘‘परेडच्या व्यवस्थापनाची सर्व कामे स्वयंसेवकांकडून केली जातात. परेडनंतर आम्ही काही महत्त्वपूर्ण नवीन भागीदारी प्रकल्पांची माहितीही जाहीर करणार आहोत.’’ सौरिन परिख यांनी नमूद केले की, ”ही परेड ‘पैसे द्या आणि सहभागी व्हा’ अशा प्रकारची नसून, ‘अभिमानाने सहभागी होण्याची आहे,’ जी सर्वसमावेशकतेकडे एक क्रांतिकारक पाऊल टाकणारी असेल.”

Police Bharti 2025 : पोलीस दलात 14,000 जागांची मेगाभरती; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Police Bharti 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Police Bharti 2025 । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पोलीस भरती संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मंजुरी दिली आहे. आज पार पडललेया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर 14,000 रिक्त पदांची चर्चा मागील अनेक दिवसापासून सुरु होती. अखेर आज या जम्बो भरतीला मंजुरी देण्यात आल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील फडणवीस सरकारने सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तस बघितलं तर पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती (Police Bharti 2025) होणे खूप गरजेचं होत. मागील अनेक दिवसापासून तरुण वर्ग या भरतीसाठी तयारी करत आहे. मैदानी चाचणी असो वा लेखी परीक्षा…. या भरतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा तरुणांच्या मेहनतीचे आणि कष्टाचे या भरतीमुळे चीज होणार आहे. सरकणे या पोलीस भरतीला मंजुरी दिल्यानंतर आता लवकरच या भरतीसंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या निवडणुकांच्या अगोदरची ही भरती प्रक्रिया पार पडेल अशीही चर्चा आहे. कारण महापालिका निवडणुकीवेळी गृहखात्यावर मोठा ताण असणार आहे. या पोलीस भरती अंतर्गत सदर उमेदवारांची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल. तसेच पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले? Police Bharti 2025

१) महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिस भरती करण्यास मंजुरी

२) राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ … सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करणे

३) सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding निधी देणे

४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करणे तसेच शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ

Nagpur Liquor Factory : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारण्यात येणार दारूची सर्वात मोठी फॅक्टरी

Nagpur Liquor Factory

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Liquor Factory महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यात सतत नवनवीन प्रकल्प आणण्यावर भर देत असते. औद्योगिक प्रकल्प, इलेकट्रॉनिक प्रोजेक्ट, माहिती तंत्रज्ञान प्रोजेक्ट किंवा संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातील काही शहरात तर आहेच, परंतु आता राज्यातील एका बड्या शहरात आशिया खंडातील सर्वात मोठी दारूची फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. हे शहर म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नसून राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेले नागपूर आहे.

मद्य निर्मिती क्षेत्रातील आघाडीची फ्रेंच कंपनी पर्नोड रिकार्ड इंडिया ही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आशिया खंडातील सर्वात मोठा माल्ट स्पिरिट डिस्टिलरी व मॅच्युरेशन प्लांट (Nagpur Liquor Factory) उभारणार आहे .खरे तर गेल्या वर्षी सीएम फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा सामंजस्य करार झाला होता.आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, राज्य उत्पादन शुक्ल विभागत तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

1800 कोटी रुपयांचा प्रकल्प – Nagpur Liquor Factory

हा दारू प्रकल्प तब्बल 1800 कोटी रुपयांचा आहे. नागपूरमध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दररोज ६० हजार लिटर माल्ट स्पिरिटची निर्मिती होणार आहे. यातून वर्षाला १३ लाख दशलक्ष लिटर उत्पादन क्षमतेचा टप्पा गाठला जाईल. नागपूर मधील या सर्वात मोठ्या मद्य प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे स्पिरीट तयार करण्यासाठी कच्चामाल म्हणून जव लागणार आहे. दरवर्षी सुमारे 50 हजार टन जव या प्रकल्पासाठी लागेल. विशेष म्हणजे हा कच्चामाल स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार आहे.

एकीकडे मागच्या काही महिन्यात नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या एमडी तस्करीच्या विरोधात भाजपचे नेते सातत्याने विधानसभेत आवाज उठवत आहेत. विदर्भाला उडता पंजाब होऊ देऊ नका अशी मागणी केली जात आहे. असं असतानाही आशिया खंडातील सर्वात मोठी दारूचे उत्पादन करणारी फॅक्टरी याच नागपुरात उभारण्यात येणार असल्याने विरोधकांना भाजप विरोधी आयते कोलीत सापडलं आहे. या दारू फॅक्टरी मुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

42 फुटांचा गणपती!! मुंबईतील ‘ही’ मूर्ती ठरणार आकर्षणाचं केंद्र

Ganeshotsav Celebration 2025 mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे एक वेगळीच मज्जा…. मुंबईत गणेश मंडळाची संख्या मोठी आहे आणि भक्तांचीही… चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश, लालबागचा राजा, परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हि मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ आहेत. दरवर्षी लाखो भाविक या मंडळांना भेट देतात आणि गणरायाचे आशीर्वाद घेतात. मात्र दुसरीकडेही असाही एक गणपती आहे जो यावर्षी सर्वांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरू शकतो. होय आम्ही बोलतोय दक्षिण मुंबई स्थित खेतवाडीच्या ११ व्या गल्लीच्या गणपती मूर्तीबाबत…. या गणेश मंडळाने यंदा स्वानंद अवतारात गणेश मूर्ती बनवली असून तिची उंची तब्बल ४२ फूट आहे. मंडळाचे अध्यक्ष हेमंत दीक्षित यांनीच स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

‘खेतवाडीचा लंबोदरा’ ची स्थापना हि १९६२ मध्ये झाली असून यंदा खेतवाडीच्या लंबोदराचे ६४ वे वर्ष साजरे होत आहे. काल मंडळाने गणेशाच्या मूर्तीचे अनावरण केले, ज्यामुळे ती भाविक आणि पर्यटकांच्या प्रचंड गर्दीसाठी एक प्रमुख आकर्षण बनली. यंदा ४२ फूट उंचीची स्वानंद अवतारात गणेशमूर्ती बसवली जाणार आहे. या अवताराबद्दल बोलताना मंडळाचे अध्यक्ष हेमंत दीक्षित म्हणाले कि, या वर्षीचा अवतार आमच्या थीमशी जुळतो. ही मूर्ती मूळ ‘स्वानंद गणपती’ स्वरूपात असेल. मूर्तीच्या खाली एक ‘याली’ आहे.” याली हा सिंहाचे शरीर, हत्तीचे डोके आणि घोड्याचे किंवा सिंहाचे पाय असलेला एक पौराणिक प्राणी आहे. भगवान गणेशाला सिंहासन म्हणून यालीवर बसवलेले दाखवले जाऊ शकते.

‘खेतवाडीचा लंबोदराची निर्मिती हि यंदा गिरगावचे मुर्तिकार सुनील वराडकर यांनी केली आहे.गेल्या वर्षी, खेतवाडी ११ व्या गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ४७ फूट उंचीची मूर्ती बसवली होती.तर २०२३ मध्ये, इंद्रदेव अवतारात ‘मुंबईचा महाराजा’ यांची ४५ फूट उंचीची मूर्ती सादर करण्यात आली. तर यंदा ४२ फुटाची मूर्तीची प्रतिष्ठान केली जात आहे. यंदा मूर्तीची उंची कमी केली आहे.त्याचे कारण विशेष असे काही नाही असे स्पष्टीकरण मंडळाचे अध्यक्ष दीक्षित यांनी सांगितले.

Ganeshotsav Celebration 2025 : भक्तांनो, गणरायाच्या आगमनापूर्वी करा ‘ही’ महत्वाची कामे

Ganeshotsav Celebration 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav Celebration 2025 । गणेशोत्सव म्हणजे हिंदूंचा सर्वात मोठा सण… गणेशोत्सवाला सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणली जाते. गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषणात लाडक्या बाप्पाचे घरात स्वागत केलं जाते. गणरायासाठी खास अशी आरास केली जाते आणि त्यात बाप्पा विराजमान होतात. तब्बल १० दिवस चालणाऱ्या या गणशोत्सवाला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ आरती म्हंटली जाते. आणि बाप्पासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. एकूणच काय तर गणेशोत्सवाला सर्वांच्याच घरातील वातावरण अगदी फुललेलं असते.. गणरायाच्या सेवेत भक्तिमय झालेलं असते. यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव आहे. गणरायाला घरी आणण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील, ज्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर खुश होईल. चला तर मग जाणून घेऊयात.

घर स्वच्छ करा

गणपती बाप्पा घरात यायच्या आधी तुमचं घर चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. कोणतीही घाण किंवा धूळ घरात राहणार नाही याची काळजी घ्या. खास करून ज्याठिकाणी बाप्पा विराजमान होणार आहेत ती संपूर्ण खोली व्यवस्थित साद करा.. घर स्वच्छ असेल तरच घरात सकारात्मक वातावरण पाहायला मिळते.

पूजेचे साहित्य गोळा करा

गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी, बाजारातून पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य जसे कि पूजा चौकी, नारळ, कापूर, अगरबत्ती, कलश इत्यादी सर्व वस्तू आणून ठेवा. Ganeshotsav Celebration 2025

सजावटीच्या वस्तू-

गणपती बाप्पाला घरी आणण्यापूर्वी आरास आणि सजावटीच्या सर्व वस्तू आणून ठेवाव्या. रंगीबेरंगी लायटिंग, रांगोळी, दिवे, फुले अशा वस्तू घरी असाव्या… आणि या वस्तूंच्या मदतीने आकर्षक अशी सजावट करावी जे पाहून गणपती बाप्पा प्रसन्न होईल.

फराळाची तयारी करा

गणरायासाठी खास अशा फराळाची तयारी आधीच करा… त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवा… कारण बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच फराळ तयार केला तर त्याची चव आणखी वाढेल.

यंदा गणेशोत्सवाचा शुभ मुहूर्त कधी? Ganeshotsav Celebration 2025

दरम्यान, यंदाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. तुम्ही २७ ऑगस्टला सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ या दरम्यान गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. म्हणजेच काय तर यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल. गणपतीच्या स्वागतासाठी भक्तांकडून जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजन गावी जाण्याचा प्लॅन आखत आहेत.

8 वर्षांपासून हजारो गणेश मूर्ती बनवणारा अवलिया; पुणेकरांसाठी ठरतोय चर्चेचा विषय

Ganesh Murti pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सन म्हणजे गणपती उत्सव होय.. हिंदू धर्मियांच्या प्रत्येकाच्या घराघरात साजरा होणारा गणपती उत्सव हा यंदा २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे.त्यामुळे सगळीकडे गणरायाच्या आगमनाची लगबग चालू आहे. गणेशोत्सव म्हंटल कि आपल्याकडे शहरात,गावांत किवा अगदी गल्लीबोळात सार्वजनिक गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा केली जाते.त्यासाठी अनेक ठिकाणी गणपती मंडळाची स्थापना केली जाते.. त्यासाठी सुंदर गणपतीच्या मुर्त्यादेखील बनविल्या जातात. राज्यात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर गणेशाच्या मूर्त्या बनतात. असाच एक अवलिया पुण्यातील कात्रज या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून गणेशाची मूर्ती बनवत आहे. सुमित जाधव असं सदर मुर्तीकाराचे नाव असून त्यांनी आजवर हजारो गणेशमूर्ती बनवल्या आहेत.

गेल्या आठ वर्षाचा अनुभव यंदाही पणाला लावून सुमित जाधव यांनी गणेश भक्तांसाठी आकर्षक गणपतीमूर्ती बनविल्या आहेत.. जाधव दाम्पत्य हे पुण्यातील कात्रज येथे वास्तव्यास असून, सुमित जाधव यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. तर या कामासाठी त्यांची पत्नी पूनम यांचीही त्यांना मदत होते. त्यांचेही कला विषयात शिक्षण झाले आहे. सुमित जाधव यांच्या ‘दुर्वा आर्ट्स’च्या माध्यमातून दरवर्षी हजारो सुंदर व सुबक गणेशमूर्ती बनविण्याचे काम करतात. याशिवाय जुन्या मूर्तींना रंगरंगोटी करून सुशोभीकरणाचं काम देखील त्यांच्या मूर्तीशाळेमध्ये केलं जातं.

जाधव यांच्या आवडीमुळे त्यांच्या मूर्तीशाळेमध्ये आजवर हजारो गणपतीच्या वेगवेगळ्या आकर्षक मूर्ती तयार झाल्या आहेत.तसेच पर्यावरणाची काळजी म्हणून त्यांनी शाडू मातीच्या मुर्त्या सुद्धा बनविल्या जातात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची विटंबना होते, म्हणून जाधव यांनी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच नागरिकांची हि पर्यावरणपूरक मुर्त्यांना मागणी असते.

Rahul Gandhi Arrested : राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात!! दिल्लीत मोठ्या घडामोडी

Rahul Gandhi Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rahul Gandhi Arrested । बनावट मतदार यादीच्या मुद्द्यावरून विरोधी बाकावरील इंडिया आघाडीने आज दिल्लीत मोर्चाचे काढला. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाला विरोधी पक्षातील ३०० पेक्षा जास्त खासदार उपस्थिती होते. या सर्व खासदारांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर अगदी दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीच्या बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं.

खरं तर दिल्ली पोलिसांनी या मोर्चाचे परवानगी दिली नव्हती. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरेकेड लावली होती. मात्र विरोधी पक्ष काहीही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. “सेव्ह व्होट” नावाचे बॅनर हातात धरून खासदारांनी निषेध व्यक्त केला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट बॅरिकेडवरुन उडी मारून दुसऱ्या बाजुला पोहोचले. पोलिसांनी त्यांना आणि इतर खासदारांना पुढे जाण्यापासून रोखले, त्यानंतर ते रस्त्यावरच धरणे आंदोलनावर बसले. सर्वच खासदारांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.

ही लढाई संविधान वाचवण्यासाठी – Rahul Gandhi Arrested-

मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींचा आक्रमकपणा थांबला नाही. पोलीस गाडीच्या खिडकीमधून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. सत्य हे आहे की ते काही बोलू शत नाहीत. सत्य संपूर्ण देशासमोर आहे. हा राजकीय संघर्ष नाही. ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे. हा संघर्ष एक व्यक्ती एक मत या धोरणासाठी आहे. आम्हाला पारदर्शक आणि संपूर्ण मतदारयादी हवी आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राहूल गांधींना पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यांना गंभीर उत्तरे मिळाली पाहिजेत. , निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही याची खात्री करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे असं शशी थरूर यांनी म्हंटल.

Ganesh Puja 2025 : कोणत्याही पूजेपुर्वी गणपतीला पहिला मान का मिळतो? यामागची कथा पहाच

Ganesh Puja 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh Puja 2025 | गणेशोत्सवाची धामधूम आता ऐन रंगात आली आहे. लंबोदर गणेश सिद्धीबुद्धीचा दाता, गणांचा स्वामी म्हणून गणपती आहे. हत्तीचे मस्तक आणि उंदीर हे वाहन असलेला गणेश बुद्धीमान समजला जातो. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यापूर्वी अथवा कोणत्याही देवाची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजा (Ganesh Puja) केली जाते. आरती म्हणताना सुद्धा आधी गणपतीची म्हंटली जाते आणि मग बाकी देवांची आरती म्हंटली जाते. पण असं का करतात? कोणत्याही पूजेपुर्वी गणपतीला पहिला मान का दिला जातो? तर यामागे काही कारणे आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे असे म्हणतात, की पार्वतीमाता स्नान करत असताना पहार्‍यावर तिने गणेशाला बसविले होते. शंकर महादेव आल्यानंतरही गणेशाने त्यांना आत सोडले नाही तेव्हा रागावून त्यांनी त्याचे शिर धडावेगळे केले. मुलाची ही स्थिती पाहून पार्वती भयंकर संतापली तेव्हा तिला शांत करण्यासाठी शंकरांनी हत्तीचे डोके तोडून ते गणेशाला लावले. तरीही पार्वतीचा राग गेला नाही. तेव्हा शंकराने तिची समजूत काढताना पार्वतीला तुझ्या मुलाला कुणीही कुरूप म्हणणार नाहीत आणि सर्वप्रथम त्याचीच पूजा केली जाईल (Ganesh Puja 2025) असा वर दिला.

दुसर्‍या कथेनुसार, सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावर वाद सुरू झाला. सर्व देव विष्णुंकडे गेले तेव्हा विष्णु त्यांना घेऊन महादेवांकडे गेले. तेव्हा अशी तोड निघाली की सर्व देवतांनी विश्व परिक्रमेला जावे व ज्याची प्रदक्षिणा सर्वप्रथम पूर्ण होईल त्याला अग्रपूजेचा मान दिला जाईल. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून निघाल्या तेव्हा गणेशाने बुद्धीचातुर्याने पार्वती व शंकर यांनाच प्रदक्षिणा घातली. माता म्हणजे पृथ्वी व पिता म्हणजे आकाश.त्यामुळे मातापित्यांना घातलेली प्रदक्षिणा म्हणजेच विश्व परिक्रमा. अशा तर्हेने ही स्पर्धा गणेशाने जिंकली व त्यामुळे त्याला अग्रपूजेचा मान मिळाला असं म्हंटल जाते.

यंदाचा शुभ मुहूर्त काय ? Ganesh Puja 2025

दरम्यान, यंदाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. तुम्ही २७ ऑगस्टला सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ या दरम्यान गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. म्हणजेच काय तर यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल. गणपतीच्या स्वागतासाठी भक्तांकडून जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजन गावी जाण्याचा प्लॅन आखत आहेत.