Monday, December 8, 2025
Home Blog Page 25

देशाचे माजी उपराष्ट्रपती नजरकैदेत? त्या पत्राने खळबळ

sanjay raut jaydeep dhankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर देशात खळबळ उडाली. धनखड यांनी अचानक राजीनामा कसा काय दिला? यामागचं राजकारण काय आहे? यावरून विरोधकांनी रान उठवल होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यात आणखी भर घातली आहे. जगदीप धनखड नेमके (Jaydeep Dhankar) कुठे आहेत ? त्यांची प्रकृती कशी आहे? असा सवाल करत संजय राऊत यांनी यासंदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहीले आहे. त्यांच्या या पत्रातील मुद्द्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संजय राऊतांच्या पत्रात?

राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित एका विशिष्ट कारणासाठी मी हे पत्र लिहित आहे. २१ जुलै रोजी संसदेचे अधिवेशन सुरू झाले. सकाळी ११ वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केले. अधिवेशनादरम्यान, ते सामान्य दिसले आणि नेहमीच्या पद्धतीने अधिवेशनाचे संचालन केले. त्यांच्यात आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावरून असे दिसून येते की त्यावेळी अध्यक्षांची प्रकृती ठीक होती. परंतु, त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर, उपराष्ट्रपतींनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करण्यात आली. हे सर्वांसाठी धक्कादायक होते.

परंतु त्यापेक्षाही धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे २१ जुलैपासून आजपर्यंत, आमच्या उपराष्ट्रपतींच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या ते कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? या बाबींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही, हा गंभीर चिंतेचा विषय आहे.

आपल्या उपराष्ट्रपतींना नेमके काय झाले आहे? ते कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? ते सुरक्षित आहेत? या प्रश्नांची सत्यता जाणून घेणे देशाला पात्र आहे.
दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की श्री धनखर यांना त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नसल्याचे वृत्त आहे. खरं तर राज्यसभेतील काही सहकारी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पसची रिट याचिका दाखल करण्याचा विचारही करत आहेत कारण आम्हाला जयदीप धनखड कुठे आहेत आणि ते सुरक्षित आणि निरोगी आहेत की नाही याबद्दल खरोखरच काळजी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यापूर्वी मी तुमच्याकडून ही माहिती घेणे शहाणपणाचे मानले. मला आशा आहे की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल आणि श्री धनखड यांच्या सध्याच्या ठावठिकाणा आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल खरी माहिती द्याल असं पत्र संजय राऊतांनी अमित शहांना लिहिले आहे.

Air India Freedom Sale : 1279 रुपयांत विमान प्रवास; Air India ची खास ऑफर

Air India Freedom Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Freedom Sale। मित्रानो, विमानातून प्रवास करण्याची इच्छा तर प्रत्येकाची असते, परंतु विमानाचे तिकीट महाग असल्याने अनेक मध्यमवर्गीय लोकांचे विमानातून सफर करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण देशातील आघाडीची विमान कंपनी एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. १५ ऑगस्टला भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन असून यानिमित्ताने स्वस्तात मस्त आणि अतिशय कमी पैशात विमान प्रवासाची संधी एअर इंडिया घेऊन आली आहे. हि ऑफर नेमकी आहे तरी काय? तुम्ही किती रुपयांत विमानातून उड्डाण करू शकता? आणि कोणत्या कालावधीत तुम्हाला हि सदर करता येणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात.

१५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावं लागेल- Air India Freedom Sale

तर भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने ‘फ्रीडम सेल’ची (Air India Freedom Sale) घोषणा केली. या सेलअंतर्गत, ५० लाख प्रवाशांना देशांतगर्त आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन्ही उड्डाणे करता येणार आहे. देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर सुरुवातीची किंमत आहे १,२७९ रुपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ४,२७९ रुपये मोजावे लागतील. एअर इंडियाने एका निवेदनात म्हंटल आहे कि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १५ ऑगस्टपर्यंत बुकिंग करावं लागेल. तर या बुकिंगच्या माध्यमातुन १९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रवास करता येणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि आणि मोबाइल अँपवर जाऊन तुम्हाला बुकिंग करावं लागेल.

१९ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान ओणम, दुर्गा पूजा, दिवाळी आणि ख्रिसमस यांसारखे प्रमुख भारतीय सण आहेत. त्यामुळे या काळात लांबच्या प्रवाशांना त्यांच्या घरी जाताना एअर इंडियाच्या या ऑफरचा (Air India Freedom Sale) नक्कीच फायदा होऊ शकतो . मात्र ही ऑफर फक्त पूर्णपणे बुक केलेल्या आणि रद्द न करता येणाऱ्या बुकिंगवर लागू आहे. तिकीट रद्द केल्यास, सवलतीची रक्कम परत केली जाणार नाही आणि फ्रीडम सेल ऑफर अंतर्गत बुकिंग वैध राहणार नाही. ही ऑफर मर्यादित जागांसाठी आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहे याचीही नोंद प्रवाशांनी घेणं गरजेचं आहे.

शेतकऱ्यांसाठी सर्व संघटनांनी एकत्र यावं, बच्चू कडू यांचं आवाहन

Bachhu Kadu shetkari hakka parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जमाफी हा विषय हा एका संघटनेचा, जातीचा किंवा धर्माचा नसून हा विषय संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्जमाफीसाठी आम्ही सगळ्या संघटनांनी आपापसातले मतभेद बाजूला सारून एक समान कार्यक्रम आखून शेतकऱ्यांसाठी एकत्र आले पाहिजे. कारण शेतकऱ्यांची चळवळ ही संपली नाही पाहिजे. जर चळवळ संपली तर या शेतकऱ्याना वाली कोण राहणार नाही अशी भूमिका मांडली प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी मांडली आहे.

पुण्यात आयोजित केलेल्या शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी आपापसातले मतभेद बाजूला सारून सर्व शेतकरी संघटनेला एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शेतकरी नेते अजित नवले, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, राष्ट्रीय समाज पार्टीचे सचिन पाटील हे परिषदेला उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले की, धर्माच्या आणि जातीच्या प्रश्नावर कधी दोन गट पडत नाहीत. पण शेतकरी प्रश्नावर मात्र संघटनेत दोन गट पडतात , त्यामुळे आपलं वाटोळ झालेला आहे. शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेने आपासातील मतभेद बाजूला सारून किमान समान कार्यक्रम आखून शेतकरी कर्जमाफीसाठी एकत्र आलं पाहिजे, कारण जाती पतीच्या लढाईला फार फार कष्ट घ्यावे लागत नाही.. पण आपल्या हक्काच्या लढाई ला मात्र फार कष्ट घ्यावे लागतात.. आपण शेतकरी म्हणून कधी एकत्र येत नाहीत म्हणून आपली कोणीही येऊन लुबाडणूक करून जाते..

शेतकऱ्यांनी यापुढे अधिक मोठ्या संख्येने एकत्र आले पाहिजे. जर आपण एकत्र आलो तर बजेटमध्ये आपल्याला पन्नास टक्के वाटा दिला जाईल. पण शेतकऱ्यांना सरकारने धर्माच्या आणि जातीच्या झेंडाखाली बांधले आहे. ही जाती धर्माची जोखड फेकून द्यावी लागेल आणि आपल्याला परत एकदा आपल्या हक्कासाठी सरकारच्या विरोधात बंड पुकारावे लागेल असं आवाहन शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडूंनी केल आहे.

Government Schemes For Women : महिलांसाठी सरकारची नवी योजना!! 100 टक्के अनुदान मिळणार

Government Schemes For Women

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Government Schemes For Women । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच पैशासाठी इतर कोणावरही अवलंबत्व कमी करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. काही योजनांच्या माध्यमातून थेट पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तर काही योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी महिलांना प्रोत्साहित केलं जाते, त्यासाठी काही प्रमाणात अनुदानही दिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी १०० टक्के अनुदान सरकार कडून मिळत आहे. राणी दुर्गावती योजना असं या योजनेचं नाव असून फक्त आदिवासी समाजातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…..

तर मित्रानो, आदिवासी समाजातील महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार यामध्ये सक्षम करणे हाच या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी स्त्रीसन्मान व स्त्रीशक्तीच्या प्रतिक असलेल्या राणी दुर्गावती यांचे नाव या योजनेसाठी देण्यात आलं आहे. यापूर्वी आदिवासी महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प योजनांतर्गत असलेल्या योजनांमध्ये १५ टक्के हिस्सा हा महिलांना उचलावा लागतो. आता मात्र संपूर्ण १०० टक्के अनुदान सरकार देणार आहे. म्हणजेच काय तर आदिवासी महिलांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.राणी दुर्गावती योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असून माहिती केंद्राच्या माध्यमातून याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. Government Schemes For Women

कोणकोणत्या व्यवसायांना मिळणार १०० टक्के अनुदान – Government Schemes For Women

वयक्तिक व्यवसाय –

राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिलांना शिलाई मशीन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी वाटप, फुलहार , मत्स्यजाळे, कृषी पंप, चहा स्टॉल, कपडे विक्री किट, , ब्युटी पार्लर, भाजीपाला स्टॉल, खेळणी साहित्य, पत्रावळी बनविण्याचे यंत्र यासाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

सामूहिक व्यवसाय –

यामध्ये , बेकरी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थांची विक्री, मसाला कांडप यंत्र, दूध संकलन केंद्र, , शुद्ध पेयजल युनिट, मंडप साहित्य यासाठीही राणी दुर्गावती योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदान मिळत आहे.

कोण करू शकते अर्ज ?

राणी दुर्गावती योजनेचा (Rani Durgavati Yojana) लाभ अनुसूचित जमातीतील पात्र महिलांना दिला जातो. त्यामुळे फक्त महिलाच यासाठी अर्ज करू शकतात. पुरुषांसाठी हि योजना नाही.

किती अनुदान मिळणार –

व्यक्तिगत योजनांसाठी- 50,000 रुपयांपर्यंत
सामूहिक योजनांसाठी- 7,50,000 रुपयांपर्यंत

असा करा अर्ज –

1) सर्वात आधी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क करा
२) आवश्यक कागदपत्रे गोळा करा आणि अर्ज सादर करा
3) यानंतर प्रशिक्षण घ्या आणि योजना निवडा
4) अनुदान मिळवून व्यवसाय सुरू करा

Vande Bharat Halt At Shegaon : शेगावला थांबणार ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस; प्रवाशांना मोठा फायदा

Vande Bharat Halt At Shegaon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Halt At Shegaon । नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसला आता शेगाव मध्येही थांबा मिळणार आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. खरं बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेगावला थांबा मिळण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं असून शेगावकरांना मोठा फायदा होणार आहे. तसेच गजानन महाराजांच्या मठाला भेट देणाऱ्या भक्तांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव- Vande Bharat Halt At Shegaon

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढवण्यासाठी रेल्वे विभाग येत्या १० ऑगस्ट पासून नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन चालवणार आहे. २ दिवसापूर्वी या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक आणि संभाव्य थांब्याची यादीही समोर आली होती. त्यामध्ये अजनी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड या स्थानकांचा समावेश होता. मात्र शेगावचं नाव यामध्ये नव्हते. यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती आणि शेगावला या नागपूर – पुणे वंदे भारतचा थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या मागणीला यश आलं. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर रेल्वे विभागाने एक परिपत्रक जारी करत शेगावला थांबा (Vande Bharat Halt At Shegaon) मिळाल्याचे जाहीर केलं. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध संत गजानन महाराज संस्थानला जाणाऱ्या भक्तांचे काम सोप्प झालं आहे. देशभरातून भाविक विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे येतात.

कस असेल ट्रेनचं वेळापत्रक –

ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावेल… दर सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून…..

यापूर्वी पुण्याहून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला ये जा करण्यासाठी तब्बल १३-१४ तास लागायचे. मात्र आता वंदे भारत ट्रेनमुळे (Nagpur Pune Vande Bharat Express) हाच प्रवास १२ तासांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ २ तासांनी वाचणार आहे. सुरुवातीला हि स्लिपर ट्रेन नसेल, त्यामुळे प्रवाशांना बसून प्रवास करावा लागेल.

Ganeshotsav 2025 : 26 ऑगस्ट कि 27 ? गणरायाचे आगमन कधी? पहा शुभ मुहूर्त

Ganeshotsav 2025 Shubh Muhurt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025 । हिंदू धर्मात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाचे साजरा केला जातो. दरवर्षी गणरायाच्या स्वागतासाठी भक्त आतुरटनेते वाट बघत असतात. यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून सर्वांच्याच घरी गणरायाच्या आगमनाची लगबग आहे. गणपतीच्या स्वागतासाठी घरात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशी सजावट केली जात आहे. गणपतीसाठी खास पदार्थ बनवले जात आहेत. 10 दिवस गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. दहा दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने संपतो. परंतु यंदा गणेशोत्सव २६ ऑगस्टला आहे कि २७ ऑगस्टला यावरून भक्त गोंधळले आहेत. आज आम्ही तुम्हाला यंदाच्या गणेशोत्सवाची तारीख आणि खास मुहूर्त याबाबत तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

कधी आहे शुभ मुहूर्त- Ganeshotsav 2025

तर मित्रानो, धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता. म्हणून, ही तारीख भगवान गणेशाला समर्पित मानली जाते. यंदाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. तुम्ही २७ ऑगस्टला सकाळी ११:१२ ते दुपारी १:४४ या दरम्यान गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. म्हणजेच काय तर यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल.

दरम्यान, गणरायाच्या आगमनावेळी भक्त गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया या जयघोषात गणपती बाप्पाचे स्वागत करतात. त्याची आकर्षक अशी आराम केली जाते. गणरायाला फुले अर्पण केली जातात. आरासाला लायटिंग केली जाते. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या काळात (Ganeshotsav 2025) सकासकाळी लवकर उठून अंघोळ करून गणपतीची आरती केली जाते. धार्मिक स्तोत्रे गायली जातात. गणरायाला दुर्वा वाहिल्या जातात. त्याच्यासाठी खास असे नवनवीन गोड़ पदार्थ बनवले जातात.

3 New Municipalities In Pune : पुण्यात 3 नव्या महापालिका होणार!! अजित पवारांची मोठी घोषणा

3 New Municipalities In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 3 New Municipalities In Pune । उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकण आणि उरुळी देवाची – फुरसुंगी – मांजरी अशा ३ नव्या महापालिका होणार आहे अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. आज सकासकाळी अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. या पाहणीवेळी त्यांनी नव्या महापालिका निर्मितीबाबत माहिती दिली.

खरं तर मागच्या काही वर्षांपासून पुणेकरांना मोठ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हिंजवडी, चाकण हे आयटी आणि ऑटो हब तर या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत. यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची माहिती (3 New Municipalities In Pune) अजित पवार यांनी केली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मी हे करणारच- 3 New Municipalities In Pune

अजित पवार म्हणाले, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठीही मी निधी सुद्धा देतोय. त्यानंतर आपण पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग बनवू. तसेच आपल्याला पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या (3 New Municipalities In Pune) लागणार आहेत. एक म्हणजे चाकण, दुसरी हिंजवडी येथे आणि तिसरी महापालिका , मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात करावी लागणार आहे. कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मी हे करणारच आहे असं अजित पवार यांनी म्हंटल.

SBI Recruitment 2025 : SBI मध्ये 6589 पदांसाठी मेगाभरती!! असा करा अर्ज

SBI Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन SBI Recruitment 2025 । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तब्बल 6589 हजार पदासाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. ज्युनियर असोसिएट क्लार्क पदासाठी हि भरती असेल. या जॉबसाठी इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत sbi.co.in या वेबसाईडवरून अर्ज करावा लागेल.परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 ऑगस्ट आहे.त्यामुळे उमेदवारांनी वेळेवरती अर्ज करावा लागेल. एसबीआय मधील या भरतीसाठी पात्रता काय आहे? निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

एकूण पदे – 6589

पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट क्लार्क

वयोमर्यादा

या पदांसाठी २० ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराची जन्मतारीख २ एप्रिल १९९७ ते १ एप्रिल २००५ दरम्यान असावी. तथापि, नियमांनुसार, काही राखीव श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट आहे. SBI Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता –

सदर उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराची प्राथमिक परीक्षा आणि अंतिम परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांनी निवड ही केली जाईल.

निवड प्रक्रिया –

निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यात पार पडली. पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल. इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता आणि तार्किक क्षमता यावर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एक तासाची असेल. मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. तर, या परीक्षेत 190 प्रश्न असतील. वित्तीय जागरुकता, जनरल इंग्रजी,क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, रिझनिंग एबिलिटी यावर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल. स्थानिक भाषा चाचणी परीक्षा 50 गुणांची असेल.

अर्ज कसा करावा ? SBI Recruitment 2025

उमेदवारांनी बँकेच्या या sbi.co.in जाऊन अर्ज व्यवस्थित भरावा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीचा अर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मगच अर्ज करावा. एकदा अर्ज केल्यास परत अर्जाची रक्कम मिळणार नाही.त्यामुळे अर्ज भरताना माहिती हि व्यवस्थित भरावी.

Donald Trump Property In India : मुंबई पुण्यात डोनाल्ड ट्रम्पची प्रचंड संपत्ती; किंमत जाणून थक्क व्हाल

Donald Trump Property In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Donald Trump Property In India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरु केले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशाची चांगलीच पंचाईत झाली आहे. टॅरिफ वॉरचा फटका भारताला देखील बसला आहे. भारतावर तब्बल ५० टक्के आयात शुल्क लावत ट्रम्प यांनी भारतीयांचा रोष अंगावर घेतला आहे.
मीच कसा शहाणा हे देखील दाखवण्याचा प्रयत्न ट्रम्प करताना दिसत आहेत. एका बाजूला भारतीय अर्थव्यवस्था मृत म्हणणारे, भारताला सतत धमक्या देणारे आणि भारतीयांचा राग अंगावर घेणाऱ्या याच ट्रम्प यांची भारतात प्रचंड संपत्ती आहे. याचाच अर्थ एकीकडे भारताला नावे ठेवायची आणि बाजूला भारतात पसरलेल्या उद्योगातून कोट्यवधींची कमाई करायची अशी दुपट्टी भूमिका ट्रम्प घेत असल्याचे दिसत आहे.

भारतात सर्वात आधी पुण्यामध्ये ट्रम्प यांनी बांधकाम क्षेत्रात गुतंवणूक केली .२०१२ साली पुण्यातील पंचशील रिअल्टी या कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारीतून ट्रम्प टॉवरची उभारणी केली. २३ मजली २ टॉवर असलेले ट्रम्प टॉवर हे २०१५ मध्ये हे तयार झाले. या प्रकल्पाचा खर्च अदाजे ३०० कोटी रूपये इतका आहे. तर, मुंबई वरळीमध्ये, लोढा ग्रुप आणि ट्रम्प यांच्या भागीदारीतून २०१३ मध्ये ७६ मजली टॉवरचे काम सुरु झाले आणि २०२१ मध्ये पूर्ण झाले. हा प्रकल्प खर्च ३,००० कोटी रूपये इतका आहे. तर कोलकाता ३८ मजली निवासी टॉवर, ईएम बायपासवर, त्रिबेका, उनिमार्क आणि आरडीबी ग्रुप सोबत भागीदारी करून ट्रम्प टॉवर्स उभा केले आहे. हा प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.प्रकल्पाचा खर्च हा अंदाजे ४०० कोटी रुपये आहे.Donald Trump Property In India

दिल्लीतही ट्रम्प टॉवर- Donald Trump Property In India

देशाच्या राजधानीत सुद्धा ट्रम्प टॉवर्स उभारले गेले आहे. दिल्ली एनसीआर, गुरुग्राम मध्ये त्रिबेका आणि एम३एम ग्रुपने सेक्टर ६५ मध्ये दोन ४७ मजली टॉवर उभा केले जात असून, २०२६ हा प्रकल्प पूर्ण होईल होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प खर्च रु. १,९०० कोटी रूपये इतका आहे. म्हणजेच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात बांधकाम क्षेत्रातून कोट्यवधी पैसा कमावला आहे.

अगदी अलीकडे नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामध्ये आपली गुंतवणूक आणखी वाढवली. भारतातील भागिदारी ट्रायबेका डेव्हलपर्ससह गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बेंगळुरूमध्ये किमान सहा प्रकल्पांची घोषणा केली. तब्बल ८० लाख चौरस फुटांचा रिअल इस्टेट विकास होणार आहे. या प्रकल्पातून ट्रम्प यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

Trump Tariff On India : ट्रम्प टॅरिफचा भारताला दणका!! कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार?

Trump Tariff On India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात सध्या टॅरिफ युद्ध चालू केले आहे. जगभरातील अनेक देशांमधील वस्तूंना मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या संकटात आल्या आहेत. नुकतंच त्यांनी भारताला 25% टॅरिफ अतिरिक्त कर लावून पुन्हा दणका दिला आहे.अमेरिकेने हा निर्णय घेताना म्हटलं आहे की, भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून याआधी अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर 50 % झाला आहे. भारतासाठी हो मोठी चिंतेची बाब आहे. ट्रम्प यांच्या या दणक्यामुळे भारतातील कृषी क्षेत्राला आणि जनेरिक औषध क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. आता ऑर्गेनिक केमिकल्सवर ५४% पर्यंत, कार्पेटवर ५२.९%, विणलेल्या कपड्यांवर ६३.९%, दागिने आणि हिऱ्यांवर ५२.१% आणि यंत्रसामग्रीवर ५१.३% शुल्क आकारलं जाईल.

कृषी क्षेत्रातील व्यापाराला सर्वाधिक फटका – Trump Tariff On India

आपला भारत हा देश कृषिप्रधान देश आहे. भारतातून अमेरिकेला प्रामुख्याने साखर, प्रक्रिया केलेलं खाद्य, तूप, बटर, दूध पावडर तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी या वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होते. कृषी क्षेत्रातील वस्तू पुरवठा करणारा अमेरिकेचा मोठा निर्यातदार म्हणून भारत ओळखला जातो. त्यामुळे भारताच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा होत आला आहे.पण आता अमेरिकेने टॅरिफ लावल्याने (Trump Tariff On India) भारताला याचा जबर फटका बसणार आहे. याशिवाय, भारत हा अमेरिकेत 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो. टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होईल. मोठ्या प्रमाणात रोजगारावर परिणाम या निर्णयाने होणार आहे.

कोळंबीच्याही किमतीवर परिणाम होणार

भारत जगातला आठवा मोठा कृषी उत्पादनं निर्यात करणारा देश आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेतून आलेल्या कृषी उत्पादनांवर सरकारी 37.7 टक्के टॅरिफ लावतो.

कापड उधोग अडचणीत येणार

भारतातून अमेरिकत मोठ्या प्रमाणत कापडांची निर्यात होते. भारत हा कापडाच्या बाबतीत अमेरिकेचा तिसरा मोठा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. अमेरिकेत दरवर्षी 4.93 अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे आयात केले जातात. त्यामुळे या व्यापारालाही टॅरिफचा तडाखा (Trump Tariff On India) बसणार आहे.देशात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो.जर भारतातील कापड उधोगावर संकट आल तर त्याचा थेट परिणाम हा देशातील शेतकऱ्यावर होईल. कापसाच्या बाजारातील भाव पडतील अशी भीती या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

टॅरिफचे अमेरिकेवर काय परिणाम होणार?

टॅरिफमुळे अमेरिकेचा मोठा फायदा होत असल्याचा बोलले जात आहे. अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिकांच्या नोकऱ्या वाचतील. तसेच, कर महसूल आणि आर्थिक वाढही होईल असे बोलले जात आहे. टॅरिफमुळे विदेशी कंपन्या अमेरिकेमध्ये उत्पादन सुरू करतील आणि त्यामुळे अमेरिकन सरकारचं उत्पन्न वाढेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धोरण का राबवत आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक राष्ट्रवाद म्हणजेच अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग असून, यामुळं अमेरिकेत देशांतर्गत उद्योगाला फायदा मिळू शकतो. मात्र, हा जागतिक व्यापार आणि पर्यावरण संतुलनासाठी धोक्याचं संकेत ठरु शकतात.