Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3720

‘ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन’; राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्य सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात आता राज्य सरकारवर राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या 36 वसतिगृहाच्या मुद्यांवरून निशाणा साधला आहे. तर महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असल्याची टीका केली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, 2018 मध्ये ओबीसींसाठी 36 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतची तशी घोषणा ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी केली होती. राज्य सरकारकडून सध्या ओबीसी समाजाची फसवणूक केली जात आहे. हे सरकार ओबीसींच्या बाबतीत नुसते आश्वासन देण्याचे काम करीत आहे

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तायवाडे म्हणाले कि, सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत ओबीसी समाजाच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. या दोन वर्षात ओबीसी समाजा बांधवांना राज्य सरकारकडून काहीही देण्यात आलेले नाही. येत्या एक महिन्यात जर ओबीसींचे वसतीगृह उभे न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने यावेळी देण्यात आला.

वयाच्या 51 व्या वर्षीही शेन वॉर्नला बनवायची आहे नवीन गर्लफ्रेंड, मित्राने जगासमोर पितळ केले उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न अनेकदा वादात सापडतो. क्रिकेटचा सर्वोत्तम लेग स्पिनर म्हणून ओळखल्याशिवाय, वॉर्न अनेकदा सर्व चुकीच्या कारणांमुळेही चर्चेत असतो. महिलांसोबत असो किंवा बीबीएल गेम्स दरम्यान मार्लन सॅम्युअल्स सोबत असो, हा अनुभवी क्रिकेटपटू अनेकदा कोणत्या ना कोणत्या प्रकारे चर्चेत असतो. वॉर्नच्या अशा वागण्यामुळे आणि इतर खेळाडूंशी वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे ऑस्ट्रेलियन संघातील त्याच्या सहकाऱ्यांपैकी बरेचजणांचे त्याच्याशी कधीच जमले नाही.

आता त्याच्या एका मित्राने शेन वॉर्नबद्दल नवीन खुलासा केला आहे
दिग्गज लेग स्पिनर नेहमीच त्याच्या सर्व पार्ट्यांमध्ये महिलांनी घेरलेला असतो याबद्दल अनेक रिपोर्ट देखील समोर आले आहेत. विशेषतः या वस्तुस्थितीमुळे त्याला ‘लेडीज मॅन’ म्हणूनही ओळखले जात होते. ट्रिपल एम सिडनी रेडिओ होस्ट लॉरेन्स मुनी, वॉर्नच्या पार्ट्यांमध्ये नियमितपणे जात असत. त्याने अलीकडेच शेन वॉर्नच्या पार्ट्या कशा असायच्या याबद्दल सांगितले. यासह, त्याने खुलासा केला की, शेन वॉर्न अजूनही वयाच्या 51 व्या वर्षी टिंडरवर आहे.

डेलीमेल यूकेच्या रिपोर्ट नुसार, मूनीने सांगितले की, वॉर्न 51 वर्षांच्या वयातही टिंडरचा वापर करत आहे. तो म्हणाला की,”वॉर्नी संपूर्ण वेळ फोनवर असायचा आणि मग तो म्हणायचा – मी जात आहे. “लॉरेन्सने 2018 मध्ये फिरकीच्या दिग्गजासह एका रात्रीची आठवण सांगितली,”त्याचे आयुष्य टिंडर, बिअर, डार्ट्स, जुगार आणि क्रिकेट आहे. त्या पाच गोष्टी, एवढेच,” .

या रेडिओ होस्टने पुढे स्पष्ट केले की,”ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर नेहमी महिलांच्या संपर्कात येण्यासाठी सर्व पार्ट्याना लवकर कसा सोडतो. तो फक्त ड्रिंक्स घेण्यासाठीच पार्ट्यांमध्ये येतो. शेन वॉर्न सहसा त्याच्या सहकाऱ्यांसोबतच ड्रिंक्स करायचा आणि नंतर तो मुलींसोबत गायब व्हायचा. सेलिब्रिटींसोबतच्या प्रसिद्ध संबंधांमुळे त्याची प्रतिष्ठा अशीच होती.”

लॉरेन्स मूनी पुढे म्हणाले, “पण क्रिकेट खेळल्यानंतर, डार्ट आणि काही बिअर आणि जुगार खेळल्यानंतर, शेन वॉर्नला पुढील गोष्ट ही करायची असायची त्याला एकटे झोपायचे नसायचे. “शेन वॉर्ननऑस्ट्रेलियासाठी 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 708 कसोटी आणि 293 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. 1000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा शेन वॉर्न जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे.

तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटक्या शैलीत शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. तब्बल 41 वर्षांनंतर हॉकी मध्ये भारताला पदक मिळाल्याने आजचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक होता. दरम्यान या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केले.

जयंत पाटील यांनी देखील आपल्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया अशा शब्दात जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

भारताचा ऐतिहासिक विजय-

दरम्यान, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ १-३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने ५-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस ५-४  अशा फरकाने विजय मिळवसा भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा उचलला.

मराठा विद्यार्थ्यांना ‘सारथी’ तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

Sarathi

परभणी | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राजपत्रित) गट-ब पदासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

त्या संबंधीची जाहिरात सारखी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सारखीच व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. मराठा समाजातील अनेक होतकरू तसेच हुशार विद्यार्थी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे राज्य सेवेत आपले भवितव्य घडवू शकत नाहीत.

त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य सेवा क्षेत्रात सक्षम उच्च शिक्षित अधिकारी घडविण्याकरिता, सारथी मार्फत एमपीएससी गट ब ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://sarthi-maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असेही कळविण्यात आले आहे.

तारूख येथे जुन्या कपाटाची किंमत जास्त सांगितल्याने एकास मारहाण

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तारूख येथे भांड्याच्या जुन्या कपाटाची जास्त किंमत सांगीतल्याच्या रागातून एकाला मारहाण करण्यात आली. सदरची घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जखमी विक्रमसिंह धनाजी कुऱ्हाडे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारूख येथील जयसिंग सवादकर यांचे भांड्याचे जुने कपाट विकायचे होते. लहू शिरतोडे हा ते कपाट विकत घेण्यासाठी आला होता. त्यावेळी सवादकर यांनी विक्रमसिंह यांना बोलाऊन कपाट किती रूपयांना विकावे, अशी विचारणा केली. विक्रमसिंह यांनी कपाटाची दीड हजार रुपये किंमत सांगितली.

त्यामुळे चिडून जाऊन शिरतोडे याने विक्रमसिंह यांना डोक्यात लाकूड मारून जखमी केले. याबाबतची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. विक्रमसिंह कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून लहू शंकर शिरतोडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Gold Price : सोन्या-चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण, आजचे दर तपासा

नवी दिल्ली । गुरुवारी सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 5 ऑगस्ट रोजी 09.30 वाजता ऑक्टोबरचे सोने 0.09 टक्क्यांनी घसरून 47,847 रुपयांवर आले. गुरुवारी चांदीमध्ये मोठी घसरण झाली. 5 ऑगस्ट रोजी चांदीचा वायदा 0.19 टक्क्यांनी घसरून 67,471 रुपयांवर आला.

आंतरराष्ट्रीय बाजारातही गुरुवारी सोन्याच्या किंमती घसरल्या. स्पॉट गोल्ड 0.110 घसरून 1,810.50 डॉलर प्रति औंस, 0110 GMT ने कमी झाले. यूएस सोन्याचा वायदा 0.1% घसरून 1,812.40 डॉलरवर आला. बुधवारी सुमारे तीन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर चांदी 0.1% घसरून 25.33 डॉलर प्रति औंस झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सोने 8,200 रुपयांनी स्वस्त होत आहे.

आपल्या शहराचा दर जाणून घ्या
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 10 रुपयांनी कमी होऊन 46,950 रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत 400 रुपयांच्या वाढीसह चांदी 68,000 रुपये प्रति किलोवर विकली जात होती. नवी दिल्लीमध्ये किंमत प्रति 10 ग्रॅम 47,040 रुपये आहे. वेबसाइटनुसार, पिवळा धातू मुंबईसाठी 46,950 रुपयांना विकली जात आहे, तर चेन्नईमध्ये ती 45,330 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 रुपयांनी कमी होऊन 47,950 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.

सोने 90,000 रुपयांची पातळी ओलांडू शकते
कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरणाच्या गतीमध्ये वाढ झाल्यामुळे, जगभरात सोन्याच्या किंमतींमध्ये चढ -उतार सुरू आहेत. दरम्यान, 25 कोटी क्वाड्रिगा इग्निओ फंड हाताळणारे डिएगो पॅरिला म्हणतात की,” पुढील 3-5 वर्षात सोन्याचे भाव दुप्पट होतील. या दरम्यान, सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत 3000 ते 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून डिएगोचा अंदाज समजून घेतला तर पुढील 5 वर्षात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 90,000 रुपयांची पातळी ओलांडू शकतात.”

दिल्लीतील भेटीमध्ये शरद पवारांनी दिले अमित शहांना पुणे भेटीचे निमंत्रण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याबाबत राज्यात मात्र, अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, या भेटीदरम्यान खुद्द शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचे निमंत्रण दिले असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अमित शाह सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत भाजपच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा झाली. मात्र, शाह यांची भेट सहकार मुद्द्यावर घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यानंतर पवारांनी साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शाह यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.

अमित शाह यांच्याशी ज्यावेळी भेटीदरम्यान पवारांनी चरचा केली त्यावेळी शाह यांनी आपण पुणे येथील दौरा सप्टेंबर महिन्यात करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण पवारांनी शाह यांना दिले आहे.

मायलेकींना मारहाण प्रकरणी कालेतील तिघांवर गुन्हा दाखल

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

घरासमोर ठेवलेली जळणाची लाकडे काढायला सांगितल्याच्या कारणावरून तिघांनी मायलेकीला मारहाण केली. तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल जंगम, सुनंदा जंगम, बापू जंगम (रा. काले, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरासमोरील रिकाम्या जागेत जंगम यांनी जळणाची लाकडे ठेवली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पिडीत युवतीच्या आईने राहुलला ती लाकडे तेथून काढण्यास सांगीतले.

जळणाची लाकडे काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन राहुल, त्याची आई सुनंदा व वडील बापू जंगम या तिघांनी युवतीसह तिच्या आईला मारहाण केली. तसेच त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली आहे. हवालदार ज्ञानेश्वर राजे तपास करीत आहेत.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढलेले नाहीत, तुमच्या शहराची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली नवी दिल्ली । सलग 18 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यामुळे त्याच्या किमती आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल 110 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेले आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.84 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलसाठी तुम्हाला 89.87 रुपये प्रति लिटर खर्च करावा लागेल.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

चीनमधील कमकुवत आर्थिक वाढ, कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि ओपेक+ उत्पादन वाढीच्या चिंतांमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसून येतो. आता असे मानले जात आहे की येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. सध्या देशभरात अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे विकले जात आहे.

MCX वर, ऑगस्टसाठी कच्च्या तेलाची डिलिव्हरी 73 रुपये किंवा 1.32 टक्क्यांनी कमी होऊन 5,444 रुपये प्रति बॅरलवर 6,313 लॉटसह झाली. सप्टेंबर डिलिव्हरी 69 किंवा 1.26 टक्क्यांनी घसरून 5,415 रुपये प्रति बॅरल झाली आहे. मे महिन्यापासून तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 42 दिवसांत पेट्रोल 11.52 रुपयांनी महाग झाले आहे. याशिवाय सोमवार, 12 जुलै रोजी डिझेलच्या किंमतीत किंचित मंदी आली. त्याचवेळी 15 जुलै रोजी डिझेलच्या किमतीत वाढ झाली.

 

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर आहे.

>> बेंगलुरु मधील पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर आहे.

>> लखनऊ – पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लिटर आहे.
>> पाटणा – पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.51 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये तर डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये तर डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर आहे.
>> गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

पाॅझिटीव्ह रेट वाढला : सातारा जिल्ह्यात नवे 993 रूग्ण वाढले, कराड तालुक्यात कोरोना कमी होईना

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 993 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 599 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 707 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 9.27 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 504 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 22 हजार 558 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 8 हजार 937 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 377 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 28 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये पाॅझिटीव्ह रेट मंगळवारपेक्षा दुप्पट झालेला आहे. गेल्या दोन दिवसात बांधितांच्या मृत्यूची संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. तर कराड तालुका हाॅटस्पाॅट असून रूग्णसंख्या वाढताना दिसते. जिल्ह्यात मृत्यूचे आकडे येत आहेत, त्यामध्ये कराड तालुकाच आघाडीवर आहे.