Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3721

औरंगाबाद : प्रोझोन मॉल परिसर वगळता आज लसीकरण बंद

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्यामुळे काही काळ लसीकरण बंद करण्यात येते. त्यामुळे जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा नागरिकांची प्रचंड प्रमाणात आरोग्य केंद्रावर गर्दी बघायला मिळते.

मंगळवारी महापालिकेला 7 हजार 500 लस देण्यात आले होते. यानंतर बुधवारी शहरात 39 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून मंगळवारी या लसी देण्यात आल्या होत्या.

बुधवारी दिवसभरात 6 हजार 702 लसी संपल्या होत्या. महापालिकेकडे आता फक्त 800 डोस शिल्लक असून गुरुवारी सर्व लसीकरण केंद्रे बंद असणार आहे त्याचबरोबर फक्त प्रोझोन मॉल परिसरात लसीकरण मोहीम सुरू राहील अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या मुबलक लसीच्या साठ्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नसून बुधवारी नागरिकांना नऊ ते दहा या वेळेमध्ये कुपन देऊन दहा वाजता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

देशातील लोकशाही मोडून काढली आहे का?; पेगसिस, शेतकरी प्रश्नावरून राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेगसिस, शेतकरी प्रश्नाबाबत विरोधकांकडून चर्चा करण्याची मागणी केली जात असताना मोदी सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पेगसीस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले कि, ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राण दिले त्या सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे. केंद्र सरकारने देशातील लोकशाही मोडून काढली आहे का?

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे सरकार सतेत आल्यापासून जाणवत आहे. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. मात्र, त्यावरही चर्चा करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. पेगाससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. आम्हाला खात्री आहे कि आमची भूमिका न्यालयात मंडळी जाईल. हेरगिरीच्या जे कांड झालेले आहे ती जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार नाही का?

शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तोही राष्ट्रीय मुद्दा आहे. याप्रश्नी चर्चा होणे गरजेची आहे. 125 कोटींचा देश आहे. यात लोकशाही, स्वातन्त्रासाठी अनेकांनी आपले प्राण दिले आहेत. मात्र, यादेशात लोकशाहीबाबत बोलण्यास तयार नाही. लोकशाहीवर चर्चा करायची झाल्यास आम्ही सांगू तीच लोकशाही हे सरकारचे धोरण असल्याची टीका राऊतांनी यावेळी केली.

पाचवी ते दहावीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12 ऑगस्टला

Exam

औरंगाबाद | पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 9 ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते मात्र आता पुन्हा ही परीक्षा 12 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून मिळत आहे.

या परीक्षेसाठी आधी जारी करण्यात आलेले प्रवेश पत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. दरवर्षी पूर्व उच्च माध्यमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या रविवारी घेण्यात येते. परंतु धोरणामुळे या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीला ही परीक्षा फेब्रुवारी ऐवजी 15 एप्रिल घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.

त्यानंतर 13 मी 21 जून अशा तारखा बदलत गेल्या. 8 ऑगस्ट ही तारीख निश्चित करून परीक्षा परिषदेकडून सर्व नियोजन करण्यात आले होते. पुन्हा तारीख बदलून नऊ ऑगस्ट करण्यात आली. आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलेजा दराडे यांनी पत्र जारी केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण 2 हजार 516 विद्यार्थी बसले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका!! ‘हे’ 15 दिवस धोक्याचे म्हणत मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच या महिन्यात अनेक सण वगैरे असल्याने मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे.

पत्रात म्हंटल आहे की, 19 ऑगस्टपासून 15 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस धोक्याचे आहेत. हे 15 दिवस अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवसात कडक निर्बंध लागू करण्याचे  आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. या कालावधी मध्ये सण, उत्सव लक्षात घेता जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळामध्ये गर्दी जमा होणार नाही. याची दक्षता राज्यांना घ्यावी लागणार आहे.

कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे. राज्यांनी स्थानिक स्तरांवर आवश्यक तेवढे निर्बंध लागू करावे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होणार नाही. एक छोटीशी चूक देखील संसर्ग पसरण्याचे मोठे कारण ठरू शकणार आहे असे केंद्राने म्हंटल आहे.

शहरात 15 जणांना झाला दुसऱ्यांदा कोरोना; अद्याप तिसऱ्यांदा बाधा नाही

Corona

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यातच कोणाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात पुन्हा पंधरा जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या पंधरा जणांपैकी कोणाला दोन तर कोणाला नऊ महिन्यात पुन्हा कोरोनाने ग्रासले आहे.

महापालिकेकडून दुसऱ्यांदा कोरोना बाधित होणाऱ्यांची नोंद घेण्यात आली.यावेळी ही बाधितांची संख्या पंधरा वर गेल्याचे समोर आले. किमान दोन महिने अंतरानंतर पुन्हा रुग्ण आला तर तो दुसऱ्यांदा बाधित म्हणता येईल. तिसऱ्यांदा कोणाला कोरोना झाल्याचे अजूनही निदर्शनास आले नाही. असे मनपा, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले.

12 ऑगस्ट रोजी 49 व्या वर्षीय व्यक्तीचा तोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. परंतु त्यांना 19 मे 2021 रोजी कोरोना होऊन गेला होता. त्याचबरोबर दुसऱ्यांदा कोरोना होणारे ते एकटेच नसून पंधरा जणांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी मदत होते. परंतु याला अपवाद म्हणजे काहींना या अँटीबॉडीज निरुपयोगी ठरतात आणि त्यांना पुन्हा कोरोना होतो. सध्या पंधरा रुग्ण जरी कोरोनाग्रस्त आढळले असले तरी खासगी रुग्णालयात या बाधितांचा आकडा जास्त असू शकतो.

देशाला हॉकी संघाचा अभिमान; ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून शाबासकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. तब्बल 41 वर्षांनंतर हॉकी मध्ये भारताला पदक मिळाल्याने आजचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक होता. दरम्यान या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

भारताचा ऐतिहासिक विजय-

दरम्यान, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ १-३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने ५-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस ५-४  अशा फरकाने विजय मिळवसा भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा उचलला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची धमक महाविकास आघाडी मध्ये नाही; दरेकरांचा आरोप

darekar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तरीही आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला नाही. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नसेल, तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळून काय फायदा असा सवाल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाही. ज्यावेळी राज्यांना अधिकार हवा होता त्यावेळी ते मागणी करत होते. आता केंद्र सरकारनं निर्णय घेतला तर त्यावरही टीका केली जात आहे. खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची धमक महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले-

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. मात्र, राज्यांना केवळ अधिकार देऊन फायदा नाही. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नसेल, तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळून काय फायदा आहे असा सवाल करत आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे,” असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

गंगापूर तहसील कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘सरप्राइज भेट’

Collecter

औरंगाबाद | जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सकाळी अचानक व अनपेक्षितरित्या गंगापूर तहसील कार्यालयास भेट दिली. यावेळी भेटी दरम्यान वेळेवर उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद घेण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी परिसर स्वच्छ करणे, झाडांची निगा राखणे, खिडक्यांना पडदे लावणे, दस्तऐवज व्यवस्थतीत ठेवणे व सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. यापुढेही अनपेक्षितरित्या पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कमीत कमी तीन झाडे लावली व ती जगवलीच पाहिजे असे म्हणत वृक्षरोपण व संवर्धन वर त्यांनी भरदेण्याचे आवाहन केले.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ठाकूर यांना महिलांसाठी सुलभ शौचालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, तहसीलदार सारिका शिंदे यांची उपस्थिती होती.

भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करत कांस्यपदक पटकावले; 41 वर्षानंतर हॉकीत पदक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कांस्यपदकाच्या लढतीत आज भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला. 1980 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतलेल्या या संघाला पदकाची प्रतीक्षा संपली. जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळविले. सुरूवातीला भारतीय संघ दुसऱ्या मिनिटाला मागे पडला. जर्मनीच्या तैमूर ओराजने जर्मनीसाठी पहिला गोल करत संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाच्या डिफेन्समध्ये चूक झाली

15 व्या मिनिटाला श्रीजेश समोर येऊन जर्मन खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न करत होता पण जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. एक एक करून जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आले. मात्र, भारताने त्यांना 2-0 अशी आघाडी करण्याची संधी दिली नाही. भारताने दूसरे क्वार्टरच्या शुरुवातीलाच गोल केला. सिमरनजीतला सर्कलच्या आतच बॉल मिळाला. त्याने बॉलला टर्न करत गोल केला आणि भारतीय संघाला जर्मनीशी बरोबरी करुन दिली.

26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, हरमनप्रीत सिंगचा ड्रॅग-फ्लिक जर्मन गोलरक्षकाने रोखलं पण हार्दिक सिंगने पुन्हा रिबाउंडवर गोल केला. यानंतर, संघाला 28 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ची बरोबरी करुन दिली.

पहिला पूर्वार्ध संपला आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीकडून सलग दोन गोल केल्यानंतरही भारतीय संघ दबावाखाली आला नाही आणि दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केल्यामुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली. भारतीय हॉकीसाठी पुढील 30 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत

टीम इंडियाचं हॉकीमध्ये जर्मनीवर वर्चस्व असलेलं पाहायला मिळतंय. भारताने 5-3 अशी आघाडी घेतली आहे. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले आहेत. भारताने 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले. यानंतर सिमरनजीत सिंगने 34 व्या मिनिटाला गोल केला. या गोलसह भारताने जर्मनीवर 2 गोलची आघाडी घेतली आहे.

जर्मनीने चौथा गोल करत सामन्यात रंगत आणली होती. शेवटचे सहा सेकंद राहिले असताना जर्मनीला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र त्याचा फायदा भारतीय संघाने मिळवून न दिल्यामुळे जर्मनीची संधी वाया गेली. भारताने 41 वर्षानंतर हॉकी मध्ये पदक पटकावले.

अबब ! कोट्यवधींचा दंड भरूनही औरंगाबादकर चालवतात बेशिस्त ‘वाहने’

buses

औरंगाबाद/ नवनीत तापडिया | मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात वाहतूकिची समस्या काही नवीन नाही. शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचे तीन तेरा वाजत आहे. याला आपण वाहतूक शाखा, प्रशासनाला जबाबदार धरत असू तरी औरंगाबाद शहरातील सुशिक्षित नागरिक देखील तेवढेच जबाबदार आहेत. बेशिस्त वाहतुकीला आला बसावा यासाठी औरंगाबाद वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील बेशिस्त वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम मोडल्यावर दंड आकारून कारवाई करत असतात. मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन लागू केले आहे. या लाकडाऊनच्या काळात देखील औरंगाबाद शहरात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेने कारवाई करत जानेवारी २०२० पासून जुलै २०२१ पर्यंत एकूण ५ लाख १८ हजार ५२९ प्रकरणात तब्बल १९ कोटी ३२ लाख ६ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर दंड भरून देखील औरंगाबादकर मात्र बेशिस्त वाहने चालवत आहेत ही मात्र खेदजनक गोष्ट आहे.

आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. शहर झपाट्याने वाढल्यामुळे साहजिकच शहरातील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याच्या घटना शहरात अनेक महत्वाच्या रस्त्यांवर, चौकात दरदिवशी घडतच असतात. याला वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता बिनधास्तपणे वाहन चालवणारे देखील याला हातभार लावत आहेत. या बेशिस्त वाहतुकीला आला घालण्यासाठी औरंगाबाद वाहतूक शाखेच्या वतीने त्यांच्या हद्दीत अनेक बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याच अनुषंगाने २०२० या वर्षात औरंगाबाद वाहतूक शाखेने तब्बल ३ लाख ३ हजार १९८ प्रकरणांमध्ये तब्बल १० कोटी ७५ लाख ८४ हजार १०० रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केले आहे. तोच जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत सात महिन्यात तब्बल २ लाख १५ हजार ३३१ प्रकरणांमध्ये तब्बल ८ कोटी ५६ लाख २२ हजार ८५० रुपये वसूल केले आहेत. असे एकूण जानेवारी २०२० पासून ते जुलै २०२१ पर्यंत ५ लाख १८ हजार चलनांमध्ये तब्बल १९ कोटी ३२ लाख ६ हजार ९५० रुपयांची भर शासनाच्या तिजोरीत औरंगाबादच्या सुशिक्षित नागरिकांनी बेशिस्त वाहने चालवून भरले आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरून देखील औरंगाबादकर बेशिस्त चालवत आहेत. परिणामी औरंगाबाद वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे. याविषयी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले कि, शहरातील नागरिकांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन केले तर आम्हला कारवाई कर्णाचे काही काम नाही. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. तसेच वाहतुकीचे नियम मोडल्यास त्यावर कारवाई आम्ही करतच आहोत आणि पुढेही करत राहणार असेही त्यांनी सांगितले.

• वाहतूक शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता –
औरंगाबाद शहराची लोकसंख्या साधारण १५ लाखाच्या आसपास आहे. शहरात वाहने देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या लाखो वाहनांना शिस्त लावण्यासाठी शहरात ५२ सिग्नल आहेत. परंतु यातील बहुतांश सिग्नल बंद अवस्थेत असल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करावी ;लागत आहे. यासाठी वाहतूक पोलिसानांचा मोठा ताफा असणे आवश्यक आहे. परंतु १६ लाख औरंगाबाद करांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी केवळ ३०० पोलीस कर्मचारी सध्या औरंगाबाद वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. शहराची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी किमान ६०० वाहतूक पोलिसांची गरज आहे. परंतु सध्या आपल्या शहरातील वाहतूक सुरळीत करण्याची मदार केवळ ३०० कर्मचाऱ्यांवर आहे. यामुळेदेखील कुठेतरी बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना वाव मिळत असल्याचे दिसत आहे.