Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3722

भाजपाच्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना लाच प्रकरण भोवले, पदावरून हटविले

वाई | लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर भारतीय जनता पक्षातून निवडूण आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्रधिकरणाच्या सदस्य होण्यास त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

यासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. डॉ. प्रतिभा शिंदे या सन 2016 पासून नगराध्यक्षपदावर कार्यरत आहेत. शहरातील शौचालयाच्या बांधकामांचे देयक काढण्याच्या मोबदल्यात 14 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती त्यांचे पतीमार्फत स्वीकारल्यामुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती यांच्याविरुद्ध 1 जून 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी पालिकेतील 16 नगरसेवकांनी त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती. त्याची सुनावणी 20 ऑगस्ट 2020 आणि 30 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1665 चे कलम 53 (अ) आणि 55 (ब) नुसार वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आल्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढला आहे. त्याची प्रत नगराध्यक्षा डॉ. शिंदे व जिल्हाधिकारी सातारा यांना पाठविली आहे.

IND vs ENG: इंग्लंडच्या कर्णधाराने भारताविरूद्ध रचला इतिहास!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना कर्णधार जो रूट याने इतिहास रचला आहे. या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरला आहे. या पाचही गोलंदाजांचा नेटाने सामना करत जो रूटने आपली खेळी केली आहे. भारतात झालेल्या कसोटी मालिकेत जो रूटने भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. तशीच सुरुवात त्याने आजच्या सामन्यात केली होती.

रूट ठरला इंग्लंडचं ‘रनमशिन’
जो रूटने आजच्या खेळीदरम्यान इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या अलिस्टर कूकला मागे टाकले आहे. जो रूटच्या १५ हजार ७३९ धावा झाल्या आहेत. कूकने आपल्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५७ सामने खेळले आणि त्यात त्याने एकूण १५ हजार ७३७ धावा केल्या आहेत. रूटने मात्र आपल्या २९०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कूकला मागे टाकत इतिहास रचला आहे. तो इंग्लंडच्या क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

जो रूटने १५ हजार ३९३ धावांचा टप्पा पार करत सर्वकालीन फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये २९ वा क्रमांक तर सध्या सक्रिय असलेल्या क्रिकेटर्समध्ये आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत विराट कोहली २२ हजार ८७५ धावांसह अव्वल तर न्यूझीलंडचा रॉस टेलर १८ हजार ५४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

संतापजनक! चटणी चांगली न बनवल्यानं पत्नीला अमानुष मारहाण; महिलेचा जागीच मृत्यू

murder
murder

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या आरोपी पतीने केवळ चटणी चांगली न बनवल्यामुळे आपल्या पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या दतिया या ठिकाणी घडली आहे.

आनंद गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं सामोसे आणि कचोरीचं एक दुकान होतं. दुकानात लागणारी चटणी आनंद गुप्ताची पत्नी घरीच बनवत असते. नेहमीप्रमाणं पत्नीनं रविवारी दुकानात लागणारी चटणी बनवली. यानंतर आनंदनं ही चटणी चाखून पाहिली. मात्र, चटणी चांगली झाली नसल्याचं सांगत आनंद यानं आपल्या पत्नीला मारहाण केली. यानंतर आनंदच्या आईने मध्ये पडून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राग अनावर झालेल्या आनंदने कोणाचेच न ऐकता आपल्या पत्नीला मारहाण करतच राहिला. या मारहाणीमध्येच या महिलेचा मृत्यू झाला.

यानंतर आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी आनंद गुप्ता यानं घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आनंद फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

तोट्यात चालत असूनही स्मार्ट शहर बस शहरवासियांच्या सेवेत

city bus
city bus

औरंगाबाद |कोरोना महामारीमुळे मागील अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आले होते. यादरम्यान शाळा महाविद्यालय, बाजार, मार्केट, मॉल, रेल्वे, बस सर्व बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर हळूहळू कोरोनाचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. यामुळे शहरात शहर बससेवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना निर्बंधांमुळे सध्या 51 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेस शहरात आणि आसपासच्या भागात 18 मार्गांवर सेवा देत असून ज्या मार्गांवर जास्त प्रवासी मिळतात, त्या मार्गांवर बसेसच्या जास्त फेऱ्या होतात. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत मनपने 100 बसेस विकत घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 51 बसेस सध्या मार्गांवर आहेत. तोच उर्वरित 49 बसेस तशाच उभ्या आहेत. आता या 49 बसेस कधी सुरु होतील सांगता येत नाही.

आतापर्यंत शहरात कोरोना निर्बंधांमुळे दुपारी चार वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात येत होती. परंतु आता नियम शिथिल करून 8 वाजेच्या नंतर संचारबंदी लावन्यात आलेली आहे. दरम्यान या संचारबंदीचा फटका शहरबसेसला बसत आहे. दुपारी चार वाजेनंतर ग्राहक मिळत नसल्यामुळे ज्या ठिकाणी ग्राहक दिसेल त्या ठिकाणी बसेस थांबवल्या जातात होत्या परिणामी शहर बससेवेला नुकसान सहन करावे लागले होते.शहरात दररोज या शहरबसेस 8 ते 10 हजार किलोमीटर फिरतात. या बसेसला एक किलोमीटर जाण्यासाठी साधारण 20 रुपये खर्च येतो. परंतु सध्या शहरबसेसला फक्त 16 ते 17 रुपये प्रति किमी कमाई होत आहे.

सध्या खालील मार्गावर सुरू आहे शहर बस –
शहागंज – रेल्वे स्टेशन
सिडको – रेल्वे स्टेशन
सिडको – रांजणगाव
मध्यवर्ती बस स्थानक – करमाड
औरंगपुरा – बजाजनगर
औरंगपुरा – वाळूज
औरंगपुरा – रांजणगाव
सिडको – वाळूज
औरंगपुरा – हिंदुस्थान आवास
नक्षत्रवाडी – हर्सुल सावंगी
आदी मार्गांवर शहरबससेवा सुरू आहे.

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा हा गैरसमज – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले कि, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे,” असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती दिल्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेत राज्यांना मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अधिकारासंदर्भात माहिती दिली. यावेळी चव्हाण म्हंटल आहे की, “पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नसेल, तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळून काय फायदा आहे.

अगोदर सरकारने कायदा करून 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवावी आणि त्यानंतर राज्यांना अधिकार द्यावेत, अशी राज्यांची मागणी होती. मात्र केंद्र सरकारने आरक्षणावरील मर्यादा न उठवताच, हे अधिकार राज्यांना बहाल केले आहेत. त्यामुळे याला काहीच अर्थ नसून त्याचा मराठा किंवा इतर समाजाच्या आरक्षणासाठी काहीही उपयोग होणार नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, भंडाऱ्यामधील घटना

Rape

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचासह अन्य विविध कलमान्वये व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक केलेल्या नराधमाचे नाव मधुकर हरी रंगारी असे आहे.

या घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन मुली शिलाईला दिलेले कपडे आणण्यासाठी जात होत्या. या वेळी आरोपी मधुकर रंगारी याने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून नेऊन दार बंद केले. यावेळी दोन्ही मुलींनी आरडाओरड केली असता आरोपीने त्यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण केली. तसेच त्याने दोन्ही मुलींवर अत्याचार केला. मुलींच्या ओरडण्याचे आवाज येतात घराशेजारील लोकांनी खिडकीतून डोकावून पहिले असता मधुकर हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असल्याच्या स्थितीत आढळून आला.

या घटनेची माहिती पीडित मुलींच्या पालकांना समजताच त्यांनी तातडीने लाखांदूर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्हा दखल केला. दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींचे आरोग्य तपासणी अहवालावरून लाखांदूर पोलिसांनी मधुकर रंगारी विरोधात विविध कलमांसह पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करत आहेत.

तब्बल 1 कोटींचे दान : पतीची शेवटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून देणगी

Vithal rukhmini

पंढरपूर | दक्षिण काशी, गोरगरिबांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला पंढरीचा विठूरायाच्या चरणी एका महिला भक्ताने तब्बल 1 कोटी रुपये दान केले आहेत. मुंबईतील या भक्त असणाऱ्या महिलेच्या पतीचे काही दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले असून पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दान दिले आहे. विठ्ठलभक्त पतीच्या निधनानंतर पत्नीने 1 कोटीची देणगी देत इच्छा पूर्ण केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दीड वर्षपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या विठूरायच मंदिरही बंद आहे. यामुळे भाविक दर्शनासाठी येत नाहीत. त्यामुळे देणगीच्या रक्कमेत घट झालेली आहे. अशावेळी एका भाविकाने आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी तब्बल 1 कोटीची देणगी दिली. या देणगीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

मुंबईतील एका विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबाने विम्याची आलेली रक्कम आणि स्वताः जवळील पैसे या भक्ताच्या कुटुंबीयांनी विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले. इतकी मोठी रक्कम दान देऊन ही या भाविकांने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली आहे.

केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण संदर्भात महत्वाचे विधेयक मंजूर -संभाजीराजे छत्रपती

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य आणि केंद्रात मराठा आरक्षणावरुन सातत्याने टोलवाटोलवी सुरु आहे. अशा परिस्थिती आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबतचा महत्वाचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला. याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

102 व्या घटनादुरुस्तीनंतर म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेनंतर एसईबीसीचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार केवळ केंद्राला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. याबाबत दि. 5 मे रोजी हा निकाल आला, त्यानंतर एका आठवड्यातच केंद्राने या मुद्द्यावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळल्यामुळे आता संसदेच्या माध्यमातूनच हा अधिकार पुन्हा राज्य सरकारला बहाल करण्याचा पर्याय होता.

केंद्राच्या या दुरुस्ती विधेयकात पन्नास टक्के मर्यादेचाही उल्लेख असावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली होती. याच मुद्द्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती.

सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या,’कंडोम’च्या मदतीने पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

murder
murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील भिंड येथील पोलिसांना बलात्कार आणि हत्या प्रकरणाची उकल करण्यात यश आले आहे. या पोलिसांनी कंडोमच्या मदतीने आरोपींना शोधून काढून त्यांना अटक केली आहे. कैमोखरी गावातील एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह एका पोत्यात घालून खड्ड्यात फेकून देण्यात आला होता. 17 जून रोजी या महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अज्ञात लोकांविरुद्ध हत्या व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र मृत महिलेची ओळख पटली नसल्याने आरोपींपर्यंत कसे पोहोचावे हा सवाल पोलिसांपुढे होता. ज्या ठिकाणी या महिलेचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी एक कंडोम आढळून आला होता.

यानंतर पोलिसांनी या कंडोम’च्या मदतीने पुढील तपास सुरु केला. यानंतर त्या कंडोमच्या बॅचवरून ते सरकारी रुग्णालयातून परिवार नियोजनासाठी वाटण्यात आल्याचे समोर आले.अधिक चौकशीनंतर पोलिसांना महिलेची ओळख पटवण्यात यश आले. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. तसेच या महिलेच्या नातेवाईकांनी श्याम नावाच्या एका तरुणावर हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी श्यामला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी त्याचे साथीदार अंकित आणि विक्की यांनाही अटक केली. तसेच या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली आहे.

राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? शेलार यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चीत असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अदानी यांच्या नावाने फलक लावण्यात आला होता. तो शिवसैनिकांनी तोडफोड करीत काढून टाकला. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? असा सवाल शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज धुळे जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. यावेळी शेलार यांनी मुंबईच्या विमानतळाच्या नावाबाबत मत व्यक्त केले. यावेळी शेलार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे नाव कुणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपच्या काळातच देण्यात आलेले आहे. त्याचा ठरावही राज्य सरकारने पारीत केलेला आहे.

यावेळी शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याही नावाचा उल्लेख करीत निशाणा साधला. मलिक हे अदानीचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी हिंमत असेल तर ठराव रद्द करावा, असे आव्हानच यावेळी शेलार यांनी राज्य सरकारला दिले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या आव्हानाला महाविकास आघाडी सरकारकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहावे लागणार आहे.