Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3723

ऑलम्पिक पट्टू प्रविण जाधव आणि शेजाऱ्यांचा जागेचा वाद मिटला : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा | ऑलम्पिक पट्टू प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे. त्याबाबत सातारा पोलिस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली आहे. आता या दोन्ही कुटुंबातील वाद मिटला असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

टोकियो ऑलम्पिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणा-या प्रविण जाधवला घराचे  बांधकाम करण्यावरुन शेजा-यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. चार गुंठे जागेवरुन सुरु झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहचला आहे. “प्रांताधिका-यांनी घर बांधायला जागा दिली असताना त्यात समाधानाने रहाता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचे. त्यामुळे केवळ गावच नव्हे तर जिल्हा सोडून जाण्याचा पवित्रा कुटुंबाने घेतला होता.

फलटणपासून साधारण १६ किलो मिटर अंतरावर असलेले सरडे हे प्रविणचे गाव आहे. सरडे गावात प्रविणचे वडील आजही मजुरी करतात. जागतिक ऑलम्पिक स्पर्धेमधील ‘आर्चरी’ (तिरंदाजी) या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे गावचा प्रविण जाधव याची निवड झाली होती. घरी आई-वडील, चुलती व चुलतभाऊ असे चार जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये रहाते. स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले आहे. त्याठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणा-या एका कुटुंबाचा विरोध आहे. या विरोधातून दोन दिवसापूर्वी दोन्ही कुटु्ंबात वाद झाला होता. मात्र सातारा पोलिस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली त्यांनी वाद मिटविल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

काय होते प्रकरण ?

“फलटणच्या प्रांताधिका-यांनी आम्हांला घर बांधणीसाठी जागा मोजून दिली आहे. शेती महामंडळाच्या 84 गुंठे शिल्लक क्षेत्रातील जागा आम्हांला मोजून देण्यात आली आहे. तरी शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत होते.” प्रवीण जाधव च्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने दोन खोल्याचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली होती. प्रवीण जाधवसारख्या ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंच्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर ही निंदनीय बाब होती.

सत्यजित मजुमदारने रचला इतिहास, Times Square च्या बिलबोर्डवर दिसणारा पहिला भारतीय कंटेंट क्रिएटर बनला

कोलकाता न्यूयॉर्कचे आयकॉनिक टाइम्स स्क्वेअर नेहमीच चर्चेत असते कारण हे ठिकाण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील सर्व पर्यटन स्थळांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे. त्याच वेळी, कोलकाता येथील सत्यजित मजुमदार (Satyajit Majumder) न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर दिसणारा पहिला भारतीय कंटेंट क्रिएटर बनला आहे. हे प्रतिष्ठित स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय इंफ्लुएंसर आहेत.

याबद्दल सत्यजीत मजुमदार म्हणाला, “माझ्या आवडत्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर माझा फोटो पाहण्यासाठी मध्यरात्री उठणे ही खरोखरच खरी भावना आहे. टाइम्स स्क्वेअरच्या डिजिटल डिस्प्लेवर स्वतःला पाहण्याची माझी नेहमीच इच्छा होती आणि आज माझी इच्छा प्रत्यक्षात आली आहे. या प्रतिष्ठित जागेत पहिला भारतीय कंटेंट क्रिएटर म्हणून माझी उपस्थिती चिन्हांकित करणे माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. ”

सत्यजीत मजुमदार हा PureVPN च्या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून टाइम्स स्क्वेअरच्या (Times Square) बिलबोर्डवर दिसून आला. सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत त्याने आपल्या समर्थकांना प्रेम आणि सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामागचा उद्देश हा होता की, सध्याच्या काळात आपल्या प्रियजनांना मेसेज देऊन हे सांगायचे होते कि, विभक्त होण्याच्या या परिस्थितीतही तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्यांची काळजी घेता आणि नेहमी त्यांच्यासोबत आहात.

अलीकडेच, त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना तो म्हणाला, “मी कधीच विचार केला नव्हता की, एक दिवस तो टाइम्स स्क्वेअरच्या डिजिटल बिलबोर्डवर दिसेल. आपली स्वप्ने पूर्ण करताना आपल्या अनेक शंका, संघर्ष आणि चिंता दूर होतात. आता मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, काहीही अशक्य नाही. मला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल PureVPN चे अनेक आभार. जागतिक प्लॅटफॉर्मवर इतक्या मोठ्या मोहिमेचा भाग असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. ”

अयोध्येतील राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी होणार खुले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे करोडो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. या करोडो भाविकांना आता राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. डिसेंबर 2023 हे राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.

सध्या आयोध्येत मोठ्या वेगाने राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले होते. या भूमिपूजनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोध्येत विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. सध्या ट्रस्टकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रसिद्ध असलेल्या भव्य राम मंदिर 2023 पर्यंत बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे डिसेंबर 2023 पासून जगभरातल्या रामभक्तांना आपल्या लाडक्या रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.

Gold Price : सोने-चांदी महागले, आजच्या नवीन किमती पहा

gold Stolen
gold Stolen

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 4 ऑगस्ट 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत तीव्र कल दिसून आला. यामुळे आज पुन्हा सोने 47 हजार झाले. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या सराफा सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 10,869 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 66,160 रुपये प्रति किलोवर बंद झाली. चांदीच्या किमतीत कोणताही मोठा बदल झालेला नसताना आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्यात तीव्र कल दिसून आला.

सोन्याची नवीन किंमत
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव 123 रुपयांनी वाढला. यामुळे, मौल्यवान पिवळा धातू प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आज 46,992 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,815 डॉलर प्रति औंस झाली आहे.

चांदीची नवीन किंमत
आज चांदीच्या किंमतीत वाढ झाली. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीचे भाव 766 रुपयांनी वाढून 66,926 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किंमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही आणि तो 25.71 डॉलर प्रति औंसवर पोहोचला.

सोन्याचे भाव का कमी झाले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,”डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय बाजारात सोन्याचे भाव वाढले. त्याचवेळी, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये स्पॉट प्राइसमध्ये वाढ झाल्यामुळे, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले.”

आता कांस्यपदकाची आशा; पुरुषांपाठोपाठ महिला हॉकी संघाचाही सेमी फायनलमध्ये पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत आणि अर्जेंटीना यांच्यात आज सेमी फायनल मॅच झाली आणि हि मॅच अतिशय चुरशीची लढत होती असे म्हणायला हरकत नाही. भारताने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटात दमदार गोल करत आघाडी केली होती. त्यानंतर अर्जेंटीनाने एक गोल केला आणि मग सामना अधिकच रंगला. ही आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि विजय साकारला. या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दमदार कामगिरी केली. पण प्रत्येक दिवस आपला नसतो म्हणत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र या पराभवानंतरही भारतीय संघाला कांस्यपदक पटकावण्याची संधी नक्कीच आहे. त्यामुळे होप फॉर बेस्ट.

या सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या सुरवातीला गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. यावेळी भारताची कर्णधार राणी रामपालने पेनेल्टी कॉर्नर घेतला होता. त्यावर गुरजित कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. भारताचा गोल झाल्यावर अर्जेंटीनाने पूर्ण ताकदीनिशी भारतावर जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताने अर्जेंटीनाला चांगलेच थोपवून धरले होते आणि पहिल्या सत्रात १-०ने आघाडी कायम ठेवली होती.

तर, सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटीनाला वरचढ होण्याची संधी मिळाली. या सामन्याच्या १७ व्या मिनिटाला अर्जेंटीनाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर २१व्या मिनिटाला भारताला पुन्हा एक गोल करण्याची संधी मिळाली होती. पण यावेळी भारताला हि संधी मिळविता आली नाही. पण सामन्याचे २७ वे मिनिट अत्यंत उत्सुकता ताणणारे ठरले. कारण या एका मिनिटात पंचांनी ३ पेनेल्टी कॉर्नर दिले होते. यामध्ये भारताला २ तर अर्जेंटीनाला १ कॉर्नर मिळाला होता. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी आपल्या बाजूने चांगली लढत दिली. त्यामुळे सामन्याच्या मध्यापर्यंत हा सामना १-१ असाच बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या सत्रात काय घडेल याची उत्सुकता फार होती. अखेर, तिसऱ्या सत्रात अर्जेंटीनाने ३६ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ४०व्या मिनिटाला भारताच्या नेहाला ग्रीन कार्ड मिळाले व ती सामन्यातून २ मिनिटांसाठी बाहेर गेली.

चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं आघाडी घेण्यासाठी अर्जेन्टिनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सामना संपण्यास शेवटचा १० मिनिटांचा कालावधी असताना भारताला बरोबरीचा गोल करण्यासाठी पेनल्टी कॉर्नर मिळाला असतानाही अर्जेंटिनाच्या गोली मारियानं हा डाव हाणून पाडला. पुढे अर्जेंटिना सुरु लढतीवर ताबा ठेऊन सावध खेळ खेळात होती आणि भारताला खेळावर नियंत्रण देत नव्हती. परिणामी भारतीय संघाला हार पत्करावी लागली

सरकारने सांगितले,”लस उत्पादकांना खाजगी रुग्णालयांसाठी 25% कोटा ठेवणे आवश्यक नाही”

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सध्याच्या लसीकरणाच्या पद्धतीत मोठे बदल केले आहेत. सरकारने लस उत्पादकांना सांगितले आहे की,” त्यांना खाजगी रुग्णालयांसाठी 25% स्टॉक ठेवण्याची गरज नाही.” यावेळी असेही म्हटले गेले आहे की, उत्पादक खाजगी क्षेत्र खरेदी करू शकेल तितक्याच लस विकू शकतील आणि उर्वरित स्टॉक त्यांनी सरकारला द्यावा.” खाजगी क्षेत्रातील कमकुवत प्रतिसादामुळे सरकार 25% हिस्सा कमी करण्याचा विचार करत आहे. खाजगी रुग्णालये वाटप केलेल्या 25% लस खरेदी करण्यास असमर्थ आहेत, ज्यामुळे लसीकरणाच्या गतीवर परिणाम होत आहे.

मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेला तोंडी सांगितले की,” लसीच्या निर्मात्यांना खाजगी कोट्यातून 25% लस देणे आवश्यक नाही.” ते म्हणाले,”आम्ही एका महिन्यात असे पाहिले की, 25% लस खाजगी क्षेत्रात वापरल्या जात नाहीत. फक्त 7-9% लसच वापरल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही ठरवले आहे की, ज्या लस खाजगी रुग्णालयांमध्ये वापरल्या जात नाहीत, त्या सरकारी कोट्यात दिल्या जाव्यात.” सरकारने कंपन्यांना असेही सांगितले आहे की,” खाजगी कोट्यात 25% लस देणे आवश्यक नाही. खाजगी रुग्णालयांना ते विकत घेण्याइतपतच लसी द्याव्यात आणि उर्वरित सरकारला पुरवाव्यात.”

राज्यसभेचे खासदार सुशील मोदीच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता की,” सरकार खाजगी रुग्णालयांसाठी 25% लस कोटा कमी करण्याचा विचार करत आहे कारण ते तो कोटा वापरण्यास सक्षम नाहीत. तर उर्वरित कोटा राज्य सरकारांना देता येईल का ?.”

त्याच वेळी, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर अनुक्रमे 780 आणि 1410 रुपयांना उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत खाजगी रुग्णालयात पोहोचणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. 21 जूनपासून, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, खाजगी रुग्णालये प्रति डोस 150 रुपये आकारत आहेत. त्यांच्या निराशेचे हेही एक मोठे कारण आहे.

देशात तयार होणाऱ्या लसीचा 25% स्टॉक खाजगी क्षेत्र घेऊ शकत नाही, ज्याअंतर्गत त्यांना अनुक्रमे 205 आणि 215 रुपये केंद्राने कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिन साठी दिल्या जाणाऱ्या किंमतीपेक्षा जास्त किमतीत खरेदी करावे लागतील. अनेक मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला सांगितले आहे की,”75 टक्के कोटा वाढवावा, कारण राज्यांमध्ये लोकांना लसीकरण करण्याची अधिक क्षमता आहे, परंतु त्यांना फक्त मर्यादितच डोस मिळत आहेत. तर, खाजगी रुग्णालये त्यांचा 25 टक्के कोटा घेण्यास सक्षम नाहीत, ज्यामुळे लसीकरण कार्यक्रमाला गती मिळत नाही.”

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक पदक निश्चित; पैलवान रवी कुमार फायनलमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केलयामुळे तो सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारताचे ऑलिम्पिकमधील रौप्य पदक निश्चित झाले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रवी कुमार दहिया याचा सामना कझाकिस्तानच्या नूरिसलामसोबत होता. यादरम्यान दोघांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. दोघामध्ये 6-6 मिनिटांमध्ये दोन राऊंड झाले. पहिल्या राऊंडमध्ये लीड बनवण्याच्या प्रयत्नात रवीकुमार नूरिसलामच्या डावपेचात अडकला. त्याचा परिणाम म्हणून रवीकुमार 7 पॉईंट्सने पिछाडीवर गेला. मात्र, मागे न हटता रवीकुमार दहीया याने शेवटच्या 50 सेकंदांमध्ये नूरिसलामचा चितपट केले आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली.

रवीकुमार दहीया याने फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे त्याने आपले रौप्य पदकही निश्चित केले आहे. आता फायनलमध्ये रवीकुमारकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. सुशीलकुमारनंतर कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवणारा रवीकुमार दुसरा भारतीय आहे.

LIC च्या ‘या’ योजनेत तुम्हाला मिळेल 1 कोटी रुपयांचा लाभ, त्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत लाभ मिळू शकेल. LIC सर्व लोकांना लक्षात ठेवून पॉलिसी तयार करते. LIC ची अशीच एक पॉलिसी जीवन शिरोमणि (Jeevan Shiromani) आहे. जी प्रोटेक्शनसह सेव्हिंग्ज देखील देते. LIC ची ही योजना नॉन-लिंक केलेली योजना आहे. यामध्ये किमान 1 कोटी रुपयांची सम एश्योर्ड गॅरेंटी आहे. सम एश्योर्ड म्हणजे विमा कंपनीकडून ग्राहकाला मिळणारी विम्याची रक्कम. आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी LIC कडे अनेक चांगल्या पॉलिसी आहेत.

संपूर्ण योजना जाणून घ्या
LIC ची Jeevan Shiromani(टेबल नंबर 847), LIC ने 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू केलेली एक नवीन मनी बॅक योजना आहे. ही एक नॉन-लिंक, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही बाजाराशी जोडलेली नफा असलेली योजना आहे. ही योजना विशेषतः HNI (High Net Worth Individuals) साठी बनवली गेली आहे. ही योजना गंभीर आजारांना देखील कव्हर करते आणि तेथे 3 पर्यायी रायडर्स देखील उपलब्ध आहेत.

आर्थिक सहाय्य मिळवा
जीवन शिरोमणी योजना पॉलिसीच्या कालावधी दरम्यान अचानक मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकांचे अस्तित्व टिकून राहिल्यास निश्चित कालावधी दरम्यान पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, मुदतपूर्तीवर एकरकमी रक्कम देखील दिली जाते.

हे सर्व्हायव्हल बेनिफिट आहेत
सर्व्हायव्हल बेनिफिट अर्थात पॉलिसीधारकांच्या अस्तित्वावर निश्चित पेआउट केले जाते, जे खालीलप्रमाणे आहे-
>> 14 वर्षांच्या पॉलिसीच्या 10 व्या आणि 12 व्या वर्षी सम एश्योर्ड 30-30 टक्के.
>> 16 वर्षांच्या पॉलिसीच्या 12 व्या आणि 14 व्या वर्षी सम एश्योर्ड 35-35 टक्के.
>> 18 वर्षांच्या पॉलिसीच्या 14 व्या आणि 16 व्या वर्षी सम एश्योर्ड 40-40 टक्के.
>> 20 वर्षांच्या पॉलिसीच्या 16 व्या आणि 18 व्या वर्षी सम एश्योर्ड 45-45 टक्के.

तुम्हाला किती कर्ज मिळेल ?
पॉलिसी टर्म दरम्यान, ग्राहक LIC च्या अटी आणि नियमांच्या अधीन राहून पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर आधारित कर्ज घेऊ शकतो. वेळोवेळी ठरवलेल्या व्याजदराने पॉलिसी कर्ज उपलब्ध होईल.

नियम आणि अटी
> किमान विमा रक्कम – 1 कोटी रुपये
> जास्तीत जास्त विमा रक्कम: कोणतीही मर्यादा नाही (मूलभूत विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.)
> पॉलिसी टर्म: 14, 16, 18 आणि 20 वर्षे
> जोपर्यंत प्रीमियम भरावा लागेल: 4 वर्षे
> एंट्रीसाठी किमान वय: 18 वर्षे
> एंट्रीसाठी जास्तीत जास्त वय: 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे; 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे; 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे; 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे.

आघाडी सरकार घोटाळेबाज “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार हल्लाबोल केला जात आहे. धुळे येथे भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा शब्दात शेलार यांनी निशाणा साधला आहे.

भाजपची धुळे या ठिकाणी संघटनात्मक बैठक आज पार पडली. यावेळी बैठकीस भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेलार म्हणाले, “धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यावधींच्या अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस पणे सुरु आहेत.”

आघाडी सरकारवर टीका करताना आमदार शेलार यांनी म्हंटले आहे की, या आघाडी सरकारची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक आएएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत, तर सतत बदल्या करुन अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात आले आहे. तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी स्थिती राज्यात आघाडी सरकारची पहायला मिळते आहे.

Stock Market : सेन्सेक्स मध्ये 546 अंकांची उडी तर निफ्टी 16 हजारांच्या पुढे बंद

मुंबई । मंगळवारी विक्रम केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी जोरदार सुरुवात केली. ट्रेडिंग संपल्यावर सेन्सेक्स 546.41 अंकांनी किंवा 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 54,369.77 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 128.05 अंक किंवा 0.79 टक्के मजबूत झाला आणि 16,258.80 च्या पातळीवर बंद झाला.

त्याच वेळी, मंगळवारी एका ट्रेडिंग दिवसापूर्वी, भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर बंद झाले. निफ्टीने पहिल्यांदाच 16 हजारांचा टप्पा पार केला होता. त्याच वेळी, सेन्सेक्स 53,800 च्या पुढे बंद होण्यात यशस्वी झाला. 21 मे नंतर 3 जुलै रोजी निफ्टीमध्ये सर्वात मोठी रॅली दिसून आली आणि ती प्रथमच 16000 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाली.

SBI Q1 Result : भारतीय स्टेट बँकेच्या नफ्यात 55% वाढ
त्याच वेळी, देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर जून 2021 च्या तिमाहीत तिच्या नफ्यात 55.25 टक्के वाढ नोंदवली आहे. या दरम्यान त्यांनी 6,505 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला 4,189.34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत बँकेने तज्ञांच्या अंदाजापेक्षा 6,374.5 कोटी रुपयांचा जास्त नफा कमावला आहे.

Devyani International ने अँकर गुंतवणूकदारांकडून 825 कोटी रुपये गोळा केले
Devyani International ने IPO पूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 825 कोटी रुपये जमा केले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने 41 अँकर गुंतवणूकदारांना 90 रुपये प्रति शेअर दराने 9.16 कोटी इक्विटी शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, एकूण 825 कोटी रुपयांसाठी. Devyani International ही देशातील सर्वात मोठी चेन क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट चालवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे जी KFC, Pizza Hut आणि Taco Bell सारखी ब्रँड चालवते.