Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3725

गावकऱ्यांनो काळजी करू नका; तुमचे लवकरच पुनर्वसन करू – शंभूराज देसाई

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाबळेश्वर तालुक्यातील एरंडेल या गावावर असलेला कडा सुटल्याने येथील ग्रामस्थांची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना दिलासाही दिला. एरंडल गावाच्या पुर्नवसनाचा प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करून चार कि. मी. मध्येच गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एरंडल ग्रामस्थांना दिले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एरंडल गावास दिलेल्या भेटीवेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ हे उपस्थित होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात हाहाकार माजला होता. अनेक गावांवर दरडी कोसळण्याचा धोका उद्भवल्याने अशा गावातील ग्रामस्थांचे स्थालांतर करण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे एरंडल गावावर कडा कोसळला तर कडयाखाली गाव गाडले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भितीच्या सावटाखाली गावकरी आपला एक एक दिवस काढत आहेत. अशा गावाला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली.

यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला व त्यांना धीर दिला. ग्रामस्थांची चर्चा करताना गावाने गेली पंधरा वर्षा पुर्वीच पुर्नवसनाचा प्रस्ताव शासनास सादर केला असल्याची माहिती दिली. त्यावेळी भुतज्ञांनी गावाला भेट देवुन पाहणी करून गावाचे पुर्नवसन करणे आवश्यक असल्याचा अहवाल सादर केला होता. पतंगराव कदम हे त्यावेळी वनमंत्री होते. डोंगर माथ्यावर एरंडल गावाच्या पुर्नवनासाठी वन विभागाच्या एका भुखंडाची निवड देखिल करण्यात आली होती. परंतु पुढे हा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकल्याने आज अखेर या गावाचे पुर्नवसन झाले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी मंत्री देसाई यांना दिली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे उपस्थित होते. महाबळेश्वर शिवसेना शाखेच्या वतीने पुरग्रस्त एरंडल ग्रामस्थांना अन्नधान्याचे किट व पाचगणी शहर शिवसेना शाखेच्या वतीने भाजीपाला याचे वाटप करण्यात आले.

सेक्स वर्कर म्हणून काम करून रोज कमवत असे 88 हजार रुपये, आता सांगितले Escort Life चे धक्कादायक सत्य

नवी दिल्ली । प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक आव्हाने येतात. काही लोकं त्यापुढे गुडघे टेकतात, तर काही लोकं त्या आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. अशाच एका मुलीने तिच्या आयुष्यातील अडचणींना तोंड दिले आणि आज तिने आपले आधीचे आयुष्य सोडून नवीन जीवनाकडे यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. Maeve Moon नावाची मुलगी सेक्स वर्कर म्हणून काम करायची, पण एक वेळ अशी आली की, तिने तिचे आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला आणि आज ती इतरांना जागरूक करते.

जेव्हा Maeve 4 वर्षांची होती, तेव्हा एका तरुणीने तिचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केले. त्या घटनेनंतर, Maeve ला असे वाटू लागले की, तिचे शरीर फक्त संभोगाची एक वस्तू आहे ज्याद्वारे ती पैसे कमावू शकते. इंग्लंडमधील बर्नली येथील रहिवासी Maeve जेव्हा 16 वर्षांची झाली, तेव्हा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून एका वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला भेटली, ज्याने तिला डेटच्या बहाण्याने ड्रग्स देऊन फसवले आणि तिच्यावर बलात्कार केला. लैंगिक अत्याचाराच्या या दोन घटनांनी स्वतःबद्दल Maeve चा दृष्टिकोन बदलला. तिला असे वाटू लागले की, देह विक्री करणे ‘हा’ पैसा कमावण्याचा योग्य मार्ग आहे. त्यानंतर ती सेक्स वर्कर म्हणून काम करू लागली.

sex worker life

वयाच्या 18 व्या वर्षी, अशी एक वेळ आली होती कि, जेव्हा ती दिवसाला 88 हजार रुपयांपर्यंत कमाई करायची. पूर्वी ती शुगर बेबी (Sugar Baby) सारखे काम करायची, ज्यामध्ये ती वयोवृद्ध पुरुषांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असे आणि नंतर सेक्सच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेत असे. हळूहळू तिला वाटू लागले की, शुगर बेबीसारखे वागताना तिला रिलेशनशिपपणे अडकावे लागते, म्हणून तिने एस्कॉर्ट (Escort) म्हणून काम करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तिने इंग्लंडमधील अनेक वेश्यागृहांमध्ये (Brothel) काम केले आणि भरपूर पैसे कमावले. त्यातच तिला चरस आणि गांजाच्या नशेचे व्यसनही लागले. लेन्स लाईव्ह वेबसाइटशी बोलताना ती म्हणाली- “माझे ग्राहक टिंडरद्वारे मला भेटायला येत असत. त्यांनी मला फक्त वीड जरी दिले तरीही मी त्यांना काहीही करू देत असे. ”

Maeve ला बऱ्याच काळापासून सेक्स इंडस्ट्री सोडायची होती. पण ती त्यामध्ये वाईटरित्या अडकली होती. तिला ड्रग्जचे व्यसनही लागले होते आणि शिवाय लंडनमध्ये तिचा जो फ्लॅट होता त्याचे भाडेही द्यावे लागत होते. 2019 मध्ये तिने आपले आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. तिला वाटले की,’असे कधीही होऊ शकत नाही की, ती तिच्या गरजेनुसार पैसे कमवू शकेल.’ यानंतर ती काही दिवस सुट्टीसाठी गेली जिथे तिला समजले की, आता तिचे आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. आता Maeve मुलींना समजावून सांगते की,’पैसे काढून टाकले तर तुम्ही सेक्स वर्कर म्हणून काम कराल का?’ ती म्हणते की,” केवळ पैशांचा आधार घेणे चुकीचे आहे. आता एक इंस्ट्रक्टर म्हणून, ती अशा लोकांना मदत करते ज्यांनी लैंगिक अत्याचार आणि आघात (Trauma) सहन केले आहेत. Maeve ला आता वैज्ञानिक व्हायचे आहे आणि इतरांना बरे होण्यास मदत करायची आहे.

त्यांच्या दौऱ्यामुळे तुमच्या पोटात दुखण्याचं काही कारणच नाही; दरेकरांचा मलिकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पेटला आहे. यावरून काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे. “महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!, असे म्हणत दरेकर यांनी मालिकांना टोला लगावला आहे.

काल महाविकास आघाडीने राज्यपालांच्या दौऱ्यावर आक्षेप घेत राज्यपालांकडून सत्तेची 2 केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे असे म्हंटले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांवर अनेक आरोपही केले. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही ! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक जी त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या ! नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील, असा खोचक टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे आता पण त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असेल पण त्यांना कळलं पाहिजे कि ते मुख्यमंत्री नाहीत, असाही टोला  लगावला होता.

सरकारी विमा कंपन्या खाजगी बनवल्याबद्दल कर्मचारी संतापले, केला देशव्यापी संप

नवी दिल्ली । बँकांच्या खाजगीकरणानंतर सरकार विमा कंपन्यांना खाजगी बनवण्याचे काम करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारी विमा कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा (PSGI) कंपन्यांचे कर्मचारी बुधवारी एक दिवसीय देशव्यापी संपावर आहेत.

PSGI (public sector general insurance) कंपन्यांच्या युनायटेड फ्रंट ऑफ कामगार युनियनची सोमवारी बैठक झाली आणि या कंपन्यांचे खासगीकरण (insurance company privatisation) करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा निर्णय घेतला.

कामगार संपावर
अखिल भारतीय जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस के गोविंदन म्हणाले की,”लोकसभेत जनरल इन्शुरन्स बिझनेस (राष्ट्रीयीकरण) सुधारणा विधेयक, 2021 मंजूर होण्याविरोधात युनियनने एक दिवसाचा संप पुकारला आहे.” ते म्हणाले की,”PSGI च्या चारही कंपन्यांचे कर्मचारी दिवसभराच्या संपात भाग घेत आहेत.”

पेगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या सततच्या निषेधादरम्यान लोकसभेने सोमवारी चर्चेशिवाय हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक बुधवारी राज्यसभेत चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी येणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकार विमा कंपनीत 51 टक्क्यांपेक्षा कमी भागभांडवल ठेवू शकते, म्हणजेच त्याचे खाजगीकरण होऊ शकते.

AIIEA ने काय म्हटले?
ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन (AIIEA) ने म्हटले आहे की,”या उपाययोजनांमुळे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील चारही सामान्य विमा कंपन्या आणि पुनर्विमा कंपनी GICAR चे खाजगीकरण करू शकेल.” AIIEA ने म्हटले आहे की, “हे खासगीकरण नाही असा अर्थमंत्र्यांचा युक्तिवाद आहे, परंतु अधिक खाजगी सहभागाच्या दिशेने टाकलेले पाऊल हास्यास्पद आहे.” AIIEA ने पाच जागा व्यापल्या आहेत.

सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू; रोहित्रावरील तार तुटल्याने घडली घटना

SHOCK

औरंगाबाद | रोहित्रावरील विद्युत तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सात गाईंचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. शहरापासून काही अंतरावर असलेल्या गेवराई ब्रूक बाँड येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गेवराई येथील पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे. या रोहित्रा वरील विद्युत तार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तुटली होती. याच दरम्यान शेतातून येणारी गाईची झुंड या परिसरात येतात. विजेचा धक्का लागल्याने एका पाठोपाठ एक अशा सात गाई मृत्युमुखी पडल्या. अचानक घडलेल्या घटनेमुळे गोंधळलेल्या शेतकऱ्यांनी इतर जनावरांना बाजूला हाक आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व विद्युत् पुरवठा बंद केला. यानंतर मूर्त काहींना बाजूला काढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

या घटनेत प्रकाश राठोड, कृष्णा पवार, संजय राठोड, दिलीप मुळे, संतोष माळवदे, अमोल केदार आदी सहा शेतकऱ्यांच्या सात गाईंचा मृत्यू झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी काळे यांनी गाईंचा पंचनामा केला या प्रकरणी अहवालानंतरच घटनेस कारणीभूत कोण आहे याची माहिती समोर येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अवलंबून असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

PM Jan Dhan अकाऊंटची खात्यांची झाली तिप्पट, सरकार देते 2.30 लाखांचा थेट लाभ

नवी दिल्ली । सामान्य जनतेला केंद्र सरकारची पीएम जन धन योजना (PM Jan Dhan Yojana) आवडली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यन्त उघडलेल्या खात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे. वित्तीय सेवा विभागाने (DFS) ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले गेले आहे की,”पीएम जन धन योजनेच्या खात्यांमध्ये (Jan-Dhan Account) तीन पटीने वाढ झाली आहे. या खात्यांची संख्या मार्च 2015 मध्ये 14.72 कोटी वरून 21 जुलै 2021 पर्यंत 42.76 कोटी खात्यांमध्ये वाढली आहे.”

वित्तीय सेवा विभागाने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की,”PMJDY खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेने सुरुवातीपासून अनेक पटीने वाढ केली आहे (मार्च 15 मध्ये 15,670 कोटी रुपयांपासून ते 21 मार्चपर्यंत 145,551 कोटी रुपये). आर्थिक समावेशन कार्यक्रमाच्या यशाचा हा एक मोठा पुरावा आहे.”

2.30 लाखांचा लाभ मिळवा
जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा सर्वसाधारण विमा खातेदारांना दिला जातो. जन धन खातेदाराचा अपघात झाल्यास त्याला 30,000 रुपये दिले जातात. खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. या संदर्भात, जन धन खातेधारकाला 2.30 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात.

याशिवाय, ग्राहकांना किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करण्याची गरज नाही. या खात्यात, सरकारी ग्राहकांना 10000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. यासह, बचत खात्याइतके व्याजाचा लाभ देखील उपलब्ध आहे. मोबाईल बँकिंगचा लाभही दिला जातो. याशिवाय, पैसे काढण्यासाठी आणि खरेदीसाठी रुपे कार्ड उपलब्ध आहे.

आपण खाते कसे उघडू शकतो?
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिक खाते उघडले जाते. पण, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे जन धन खाते एका खाजगी बँकेतही उघडू शकता. तुमच्याकडे इतर कोणतेही बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जनधन खाते उघडू शकतो.

कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असेल?
जन धन खाते उघडण्यासाठी, KYC अंतर्गत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते. या डॉक्युमेंटचा वापर करून जन धन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड लागेल.

ITR Filing : CBDT ने Income Tax Return इलेक्ट्रॉनिक फायलिंगची मुदत वाढवली, शेवटची तारीख जाणून घ्या

नवी दिल्ली । सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने इन्कम टॅक्स रिटर्नच्या इलेक्ट्रॉनिक फायलिंगची मुदत वाढवली आहे. या संदर्भात CBDT ने मंगळवारी एक परिपत्रक जारी केले. इन्कम टॅक्स फॉर्मची इलेक्ट्रॉनिक फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी पाहता, इन्कम टॅक्स एक्ट, 1961 अंतर्गत काही फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

याचे कारण इन्कम टॅक्स पोर्टल http://incometax.gov.in वर करदात्यांना येत असलेल्या अडचणी आहेत. CBDT ने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की,”करदाते आता 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म 15CC भरू शकतात.”

पूर्वी 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे फॉर्म भरताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी पाहता CBDT ने कर भरण्याच्या तारखा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. CBDT ने यापूर्वी निर्णय घेतला होता की, करदाता 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अधिकृत डीलर्सकडे फॉर्म 15CA/15CB मॅन्युअल स्वरूपात सबमिट करू शकतात.

CBDT ने पुढे सांगितले की,” आता ही तारीख 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून, आता करदाते हे मॅन्युअल स्वरूपात अधिकृत डीलर्सकडे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सबमिट करू शकतात. इन्कम टॅक्स एक्ट, 1961 नुसार, फॉर्म 15CA आणि 15CB इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावा लागतो.”

सध्या करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर फॉर्म 15 सीबीसह फॉर्म 15 CB मधील चार्टर्ड अकाउंटंट सर्टिफिकेट अपलोड करावे लागते, त्यानंतर त्याची कॉपी अधिकृत डीलरकडे जमा करावी लागते. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक एक मधील इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट, जे 30 जून, 2021 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक होते, ते 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे.

फॉर्म II SWF देखील 31 जुलै 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला
या व्यतिरिक्त, CBDT ने इतर काही फॉर्म भरण्यासाठी ई-फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही इतर फॉर्म भरण्याची मुदत वाढवली आहे. फॉर्म II SWF देखील 31 जुलै 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

इन्कम टॅक्सच्या नवीन पोर्टलवर येणाऱ्या समस्यांमुळे करदात्याचा त्रास वाढला आहे. नवीन पोर्टलवर टॅक्स भरताना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत होत्या. त्यामुळे ITR भरण्यास विलंब होत आहे.

आश्रम शाळेतील शिपायाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Suside
Suside

औरंगाबाद | आश्रम शाळेत राहणाऱ्या एका शिपायाने खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हट्टी, ता. सिल्लोड येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. मच्छिंद्रनाथ देवराव थोरात (वय-58, रा वैजापूर) असे शिपायाचे नाव आहे.

शिपायाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मच्छिंद्रनाथ थोरात हे आश्रम शाळेत कामासाठी शिपाई या पदावर कार्यरत होते थोरात व त्यांचे सहकारी दररोज सकाळी सोबत चहा पिण्यासाठी जात. मात्र मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे थोरात यांच्या सहकाऱ्यांनी चहासाठी त्यांना आवाज दिला.

आवाज देऊनही प्रतिसाद न आल्यामुळे हकार्‍यांनी त्यांच्या खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा थोरात यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची अजिंठा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भारताची बॉक्सिंगमध्ये कास्य पदकाची कमाई; लवलीनाचा सेमीफायनलमध्ये पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आजचा अत्यंत महत्वाचा दिवस ठरला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली. लवलीना आणि सुरमेनेली यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला. मात्र, टर्कीच्या बॉक्सरने उत्तम पंचेसच्या मदतीने दुसरा राउंडही जिंकल्याने लवलिनाचा पराभव झाला. तर तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करन्यायासाठी महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेन हि गेली आहे. दरम्यान, आज सेमीफायनल सामना चांगलाच रंगला. सामन्यात दोन्ही बॉक्सरनी उत्तम खेळ दाखवला. पण टर्कीच्या सुरमेनेलीने आपल्या कार्यकर्तृत्व शैलीने खेळ दाखवत सुरुवातीपासून सामन्यावर दबदबा कायम ठेवला. तसेच तिने अचूक पद्धतीने लवलीनाला पंच दिले. अचूक टार्गेट गाठत तिने अधिक गुण मिळवले. त्यामुळे तिन्ही राउंडमध्ये तिने 5-0 ने सामना आपल्या नावे केला.

भारताच्या वतीने पहिल्यांदाच 23 वर्षीय लवलीनाने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे. तिने आतपर्यत 14 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सेमीफायनल जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या टर्कीच्या बुसानाजचा हा 26 वा विजय होता तिने केवळ 6 सामने गमावले आहेत.

Zomato Food Delivery: Zomato ग्राहकांना देणार अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी, त्याचा फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या

नवी दिल्ली । अलीकडेच, स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड झालेल्या फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने एक लिमिटेड एडिशन प्लॅन सुरू केला आहे ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड फ्री डिलिव्हरीचा पर्याय दिला जात आहे. Zomato चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी युझर्सना Zomato Pro Plus मेंबरशिप इनेबल करण्याचे आवाहन केले. दीपिंदर म्हणाले, “ही सुविधा युझर्सना मोठा लाभ देणार आहे. चला तर मग Zomato च्या या खास ऑफरबद्दल जाणून घेऊयात…

Zomato चे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी ट्विट केले की,” त्यांच्याकडे 1.8मिलियन Zomato Pro सदस्य आहेत. आमचे ग्राहक अनलिमिटेड फ्री डिलिव्हरीची मागणी करत आहेत (अमेझॉन प्राइम सारखे काहीतरी). तर… काही तासांत, आम्ही निवडक ग्राहकांसाठी आमचे लिमिटेड एडिशन प्रो प्लस मेंबरशिप लाँच करणार आहोत.

अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी कशी मिळवायची ते जाणून घ्या
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आपल्या काही खास युझर्ससाठी झोमॅटो प्रो प्लस मेंबरशिप लाँच करणार आहे. Zomato Pro Plus ची मेंबरशिप भाग्यवान युझर्सना Invitation द्वारे पाठवली जाईल, ज्यासाठी युझर्सना App उघडावे लागेल आणि ते पात्र आहेत की नाही ते तपासावे लागेल.

देशातील 41 शहरांमध्ये सेवा सुरू झाली
Zomato एडिशन ब्लॅक क्रेडिट कार्ड धारकांना आपोआप झोमॅटो प्रो प्लसमध्ये अपग्रेड केले जाईल. रेग्युलर युझर्सना Zomato App मधून प्रो प्लस अपग्रेड खरेदी करावे लागेल. Zomato Pro Plus मेंबरशिप भारतातील 41 शहरांमध्ये उपलब्ध असेल जिथे Zomato त्याची प्रो मेंबरशिप देते.

Zomato Pro काय आहे आणि किती सूट आहे जाणून घ्या
Zomato Pro हे एक सबस्क्रिप्शन पॅकेज आहे जे 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले. हे आपल्या ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये फूड आणि डिलिव्हरीवर सवलत देते. या महिन्याच्या सुरुवातीला, Zomato Gold ला Zomato Pro मध्ये अपग्रेड केले गेले जे डिलिव्हरी तसेच फूड मध्ये सवलत देते. Zomato Pro युझर्सना अतिरिक्त सूटसह फूडवर 40 टक्के सूट मिळते. हे ऑर्डरची 20 टक्के फास्ट डिलिव्हरी तसेच इतर ऑफर्समध्ये अतिरिक्त सवलत देते.

आत्तापर्यंत, Zomato चे 1.8 मिलियन Zomato Pro सदस्य आहेत. Zomato Pro मेंबरशिप सध्या 3 महिन्यांसाठी 200 रुपये आणि वार्षिक मेंबरशिपसाठी 750 रुपये आहे. तसेच, Zomato Pro च्या वापरावर कोणतीही डेली, विकली किंवा मंथली लिमिट नाही.