Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3764

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलबाबत सामान्यांना मोठा दिलासा, आपल्या शहराचे नवीन दर त्वरित जाणून घ्या

नवी दिल्ली पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गुरुवारी सलग 12 व्या दिवशी दिलासा मिळाला आहे. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये तेलाचे दर समान आहेत. राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आणि डिझेलची किंमत 89.87 रुपये आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर $ 74 च्या आसपास धावत आहेत.

मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल 42 दिवसांत सुमारे 11.52 रुपयांनी महाग झाले आहे. मे ते जुलै या कालावधीत अधून मधून इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.

एप्रिलनंतर पेट्रोलच्या किंमतीत 39 पट आणि डिझेलच्या किंमतीत 36 पट वाढ झाली

यावर्षी एप्रिलपासून पेट्रोलचे दर 39 वेळा वाढले आहेत. त्याच वेळी, डिझेलचे दर 36 पट वाढले आहेत. यामुळे देशातील सर्व राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने लोकसभेत ही माहिती दिली आहे. यादरम्यान पेट्रोलचे दर एकदा आणि डिझेल दोन वेळा कमी करण्यात आले.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर आहे.

>> बेंगलुरु मधील पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर आहे.

>> लखनऊ – पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लिटर आहे.
>> पाटणा – पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.51 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये तर डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये तर डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर आहे.
>> गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

आता शहरात आजारी मुलांची सरसकट होणार कोरोना चाचणी

corona

 

औरंगाबाद | आजघडीला कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली असली तरी, लवकरच तीसरी लाट धडकणार असल्याचा दावा तज्ञांकडून केला जात आहे. शिवाय या लाटेत मोठ्या प्रमाणावर लहान मुले संक्रमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्वच खासगी रुग्णालयात ताप असलेल्या मुलांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने हॉस्पिटल्सना तशा सुचेना देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना कोरोना चाचणी किट देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मनपाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. याबाबत शासनस्तरावरून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. त्यात प्रत्येक कोवीड सेंटरमध्ये १५ टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत. मनपाने गरवारे समुहाच्या मदतीने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर सुरू केले आहेत. लवकरच हे सेंटर कार्यान्वित होतील, असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट कधी येऊ शकते. शिवाय सध्या सर्दी, ताप, खोकला आदी आजारांची शहरात साथ सुरू आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दररोज असे अनेक लहान मुले उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे आजारी असलेल्या सर्व मुलांच्या कोरोना चाचण्या तिथेच करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल्सना कोरोना चाचणी किट उपलब्ध करून दिल्या जातील, असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी सांगितले.

१२५ खाटांचे स्वतंत्र कोवीड सेंटर –
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मनपाने गरवारे समुहाच्या मदतीने १२५ खाटांचे स्वतंत्र कोवीड सेंटर उभारले आहे. शिवाय एमजीएममध्ये १०० बेडचे कोवीड सेंटर उभारले जाणार आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये देखील बालकांसाठी ५० बेड ठेवले जाणार आहेत. तिसरी लाट आलीच तर शहरात सर्वांसाठी एकूण ७७३३ बेड उपलब्ध आहेत, असे डॉ. पडळकर यांनी सांगितले.

पैशाच्या वादातून तरुणाला चाकूने भोसकले

Crime

औरंगाबाद | मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून, दोघांनी तरुणावर चाकूने वार केल्याची घटना दौलताबाद मधील राजवाडा भागात घडली आहे. यामध्ये अजय शामलाल गायकवाड, वय-19 (रा. अशोक नगर शहा बाजार, राजवाडा) हा जखमी झाला आहे.

दोन महिन्यापूर्वी राजू खरात (रा. शहाबाजार अशोक नगर) यांच्या घरातील फरशी बसविण्याचे काम अजय त्याच्या वडिलांनी घेतले होते. या कामाचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी खरात सोबत अजय व त्याच्या वडिलांचा वाद झाला. त्याच्याशी अधिक वाद नको म्हणून, अजय हा काही दिवसापूर्वी दौलताबाद येथील राजवाडा भागात राहणाऱ्या आत्याकडे गेला होता.

11 जुलै रोजी दौलताबाद बस स्टँड वरून आत्याच्या घराकडे पायी जात असताना, दुचाकीवर आलेल्या खरात व त्याच्या साथीदाराने अजयचे दोन्ही हात धरून ठेवत चाकूने वार केला. यामध्ये अजय गंभीर झाला असून तसेच तेथून पळ काढताना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राठोड हे करत आहे.

राऊत म्हणतात उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावं; अमोल कोल्हेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्धव ठाकरे यांनी देशाचे नेतृत्व करावे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारले आता त्यांनी देखील राऊतांना पाठिंबा दिला आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आपल्याला अभिमानच असेल अस अमोल कोल्हे यांनी म्हंटल.

अमोल कोल्हे म्हणाले, कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल. पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे देखील महत्त्वाचे आहे असे कोल्हे यांनी म्हंटल.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते –

उद्धव ठाकरेंकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल. राष्ट्रालाही उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे एक दिवस देशाला नेतृत्व देतील . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असे राऊत म्हणाले.

शहरातील ‘या’ सात ठिकाणी होणार गॅस शवदाहिनी

manpa

औरंगाबाद | पर्यावरणाचची वाढती हानी लक्षात घेऊन औरंगाबाद मनपा प्रशासनाने आता शहरात आणखी सात ठिकाणी गॅस शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या शवदाहिनी आणि मोबाईल टेस्टींग लॅब व्हॅन खरेदी करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव मनपाच्या वतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा मृत्यूदर वाढला होता. याकाळात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मृतदेहाच्या रांगा लागत होत्या. याशिवाय बहुतांश वेळा अंत्यसंस्कारासाठी लाकडे मिळणेही कठीण झाले होते. तसेच यामुळे पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे शहरात विद्यूत व गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. यातुनच शहरातील कैलासनगर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेतला. सद्यस्थितीला ही शवदाहिनी उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. यानंतर मनपाने शहरातील सिडको एन ६, पुष्पनगरी व सिडको एन ११ येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. परंतु आता पर्यावरणाचा विचार करून शहरात सात ठिकाणी गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव मनपाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.

कुठे होणार गॅस शवदाहिनी –
पुष्पनगरी, सिडको एन ११, मुकुंदवाडी, भावसिंगपुरा, कैलासनगर (अतिरिक्त), सातारा परिसर याठिकाणी गॅस शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. एका गॅस शवदाहिनीसाठी एक कोटी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

राज्यातील निर्बंध शिथिलताबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारकडून राज्यातील निर्बंधांमध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविण्याबाबत विचारही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे की, “राज्यात १ ऑगस्टपासून निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली.”

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारतर्फे राज्यात कडक स्वरूपाचे निर्बंध घातले गेले होते. सध्या कोरोनात घेत होताना दिसत असल्याने राज्य सरकारने निर्बंधात शिथिलता देण्याबाबत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. यानंतर. आज आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळातील चर्चेबाबत माहिती दिली आहे. डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे की, १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील निर्बंधात अधिक वाढ करायची की शिथिलता द्यायची? यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे

टोपे पुढे म्हणाले की, अजूनही धोका तळलेला नाही. दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. मात्र, तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येई नाही. या लाटेशी दोन हात करण्यासाठी राहय सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असून लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी केली आहे. सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अजूनही जास्तच आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्बंध शिथील केले जाणार नाही.

कोरोना रूग्ण आढळल्याने जिल्ह्यातील 30 शाळा बंद

School will started

औरंगाबाद | जिल्हयात तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी काही गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद असलेल्या दिसून येत आहे. 15 जुलैला कोरना मुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र काही गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने 605 शाळांपैकी तीस शाळांचे वर्ग बंद करावे लागले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षण विषय समिती सभापती अविनाश गलांडे यांनी बुधवारी शाळांची उपस्थिती, बालविवाह, शिक्षक समायोजन, वादळ वाऱ्याने झालेल्या नुकसान संबंधीचा आढावा घेतला. बैठकीला शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सदस्य पुष्पा काळे, शिल्पा कापसे, रेणुका जाधव, बबन कंधारे, बळीराम भुमरे प्रभाकर पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कोरोना नसलेल्या महानगरपालिका नगरपंचायत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु शासनाने काढलेल्या आदेशानुसार केवळ सरपंच व ग्रामसेवकांना शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद आहेत. जेथे कोरोनाचे रुग्ण नाही त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जोतिबा डोंगरावर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे सहकार, पणन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दख्खनचा राजा ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगर’ वाडी रत्नागिरी येथील गरजूंना धान्य, मास्क, व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. गेली दोन वर्ष झाली कोरोनाच संकट प्रत्येकावर आहे. कोरोनाला अळा घालण्यासाठी जो लाॅकडाऊन करण्यात आला, त्यामुळे सर्वांचे अर्थचक्र बिघडले आहे. मोठ्या उद्योगांना, व्यापारी वर्गाला तर फटका बसलाच पण सर्वात जास्त नुकसान व हाल हे हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांचे झाले आहे. त्यात देवस्थानं ही कोविड च्या नियमावली मुळे पूर्ण बंद आहेत.

अखंड महाराष्ट्राच कुलदैवत श्री क्षेत्र जोतिबा (श्री केदारनाथ) वाडी रत्नागिरी या देवस्थानाला दर्शनासाठी अनेक राज्यातून भाविक येतात. या देवस्थानाच्या भोवती अनेक स्थानिक लोक, ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. यातील प्रामुख्याने लोकांचा उदरनिर्वाह हा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर आहे. दोन वर्षी यात्रा, खेटे झाली नाही मंदिर बंद असल्यामुळे भाविक दर्शनास येऊ शकत नाहीत.

आता दुसर संकट डोक्यावर आल ते म्हणजे अतिवृष्टी मुळे नद्यांना आलेले पूर व कोसळलेल्या दरडी यामुळे ठीकठिकाणी नुकसान झाले आहे. या सर्वांचा परिणाम हा जास्त करुन देवस्थानच्या निगडीत व्यवसायाला व लोकांना पडला या सर्व गोष्टी लक्षात घेऊन “श्री. क्षेत्र जोतिबा डोंगरावरील गरजूंना सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तू, धान्य, व मास्क चे वाटप निखिल दादा शिंदे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कराड द.अध्यक्ष सागर देसाई, श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक- महादेव दिंडे, मानसिंग यादव, रोहीत कांबळे, सागर इंगोले, करण यादव, विक्रम नलवडे, भरत पाटिल, गणेश मिटले, देवराज बनकर, भैरव लादे, अथर्व साळुंखे, महेश गायकवाड, विक्रम सातपुते, अमित ताटे, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.

बाधित वाढले : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 71 रूग्ण वाढले, पाॅझिटीव्ह रेट 8.41 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 1 हजार 71 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 756 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 12 हजार 732 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 8.41 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 195 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 17 हजार 304 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 3 हजार 924 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 229 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 46 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

काल रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी बाधितांच्यात वाढ झालेली आहे. पाॅझिटीव्ह रेटही वाढलेला असून परिस्थिती सुधारत असताना चिंताजनक वाढ झाली आहे. जिल्ह्यात प्रशासन पाऊस, पूर आणि कोरोना या तिन्ही संकटांशी सामना करत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी केव्हा होणार हा प्रश्न प्रशासनापुढे उभा आहे.

खळबळजनक माहिती : सातारा जिल्ह्यातील 49 धोकादायक गांवाचे पुनर्वसन रखडले, अद्याप उपयायोजना नाही

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांतील देवरूखवाडी, पाटण तालुक्यांतील आंबेघर, ढोकावळे, मिरगाव व कोयना विभातील मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. निसर्गाच्या या कोपावर रामबाण उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडल असल्याची खळबळजनक माहीती सन 2015 चे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिॲालिजकल प्रोग्रॅमिॅग बोर्ड व जिॲालॅाजिकल डायरेक्टर नागपूर यांना सातारा जिल्ह्यातील धोखादायक 49 गावाबद्दल कळवून देखील आजपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली असल्याचे समोर आले आहे.

अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली तालुक्यात भूस्खलन व दरडी कोसळून खूप मोठे न भरुन येणारी मनुष्यहानी व वित्तहानी सातारा जिल्ह्यात झालेली आहे. मात्र एकीकडे प्रशासन ढीगाऱ्याखालून मृत्युचे शवबाहेर काढत असताना पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावू असा दिखावा करत आहे. सातारा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या खळबळजनक माहितीने जिल्ह्यातील भूस्खलना बाबतीत पुनर्वसन व योग्य ती खबरदारी घेतली असती तर नक्कीच जीवीतहानीच प्रमाण रोखतां आले असते.

तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मा. मेबर सेक्रेटरी जिॲालॅजी नागपुर यांना पुनर्वसन व उपाययोजनाची अमंलबजावणी करिता सूचना केलेल्या होत्या. माळीण गावावर अतिवृष्टीमुळे डोगरांचा भाग कोसल्यामुळे गाव नष्ट होण्याची घटना घडली होती. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील 49 गावाची यादी तसेच 49 गावाचे सर्वेक्षण करणेबाबत तसेच 49 गावापैकी सर्वात जास्त व तात्काळ धोका उद्भवण्याची शक्यता असणाऱ्या व तात्काळ पुनर्रवसन करणे आवश्यक असणाऱ्या गावाची क्रमवारी निश्चित करुन व तात्काळ पुर्नवसन करुन देण्याबाबत अहवाल वरीष्ठ वैज्ञानिक भूजल सातारा याच्यामार्फत सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त धोका असणाऱ्या गावाची क्रमवारी निश्चित करुन व सदरचा भूस्खलनाचा धोका कमी करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनेची गाव निहाय उपाययोजना मेबर सेक्रेटरी डायरेक्टर ॲाफ जिॲालॅाजी नागपूर याच्याकडे पत्राद्वारे केली होती.

मात्र सातारा जिल्ह्यातील भुस्खलना विरोधात उपाययोजना न झाल्यामुळे जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांतील 37 लोकांचा जीव गमवावा लागला आहे. आता मेल्यावर पुर्नवसन करणार म्हणून मत्री सांगत आहेत. प्रशासन मृतांना आर्थिक मदतीच्या घोषणा करत आहेत. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या अहवालाला मेबर सेक्रेटरी डायरेक्टर ॲाफ जिॲालॅाजी नागपूर यांनी उपाययोजनाची अमंलबजावणी केली असती तर निश्चितच सातारा जिल्ह्यातील भूस्खलनावर होणारी जीवीतहानी रोकता आली असती. सातारा जिल्ह्यातच प्रशासन मुघल राज्य कागदी राज्य म्हणुन ओळखले जाते अगदी त्याच प्रमाणे फक्त कागदोपत्री पत्रव्यवहार करुन फाडली. ठीकठाक ठेवण्यात यशस्वी झाल मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचवण्यात प्रशासन भूतकाळातल्या चुका न सुधारल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीव गमवावा लागला असल्याचे अधोरेखीत रास्त नाकारतां येत नाही.