Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3765

अभिनेत्री दीपाली सय्यदचा पूरग्रस्तांना दिलासा; तब्बल 10 कोटींची केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे अनेक भागात महापुर आला तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी देखील झाली. दरम्यान, महाराष्ट्रावर मोठं संकट आले असताना मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना तब्बल १० कोटींची मदत करत दिलासा दिला आहे. दीपाली सय्यद यांनी कोल्हापूर येथील भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली त्यावेळी हि मदत जाहीर केली

एकीकडे बॉलिवूड कलाकारांवर टीका होत असताना दिपाली यांनी जाहीर केलेली मदत ही बड्या अभिनेत्यांना, अभिनेत्रींना मोठी चपराकच म्हणावी लागेल. दीपाली सय्यद म्हणाल्या, लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. हे सगळं भयंकर आहे.

दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं.देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण भारत अशीच लढत असेल- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशीच लढाई असेल अस वक्तव्य त्यांनी केलं.

2024 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, असा सवाल ममता यांना पत्रकारांनी केला. यावर, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. आता विरोधकांना एकत्र येणं गरजेचं आहे अस म्हणत पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, असं उत्तर ममता बॅनर्जी यांनी दिलं.

देशातील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जर येत्या काळात राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. खेला होबेचा नाद आता संपूर्ण देशात घुमणार आहे. आतापर्यंत अच्छे दिनची वाट खूप पाहिली आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असंही त्या म्हणाल्या.

महापूराच्या तडाख्याने मालदनची शाळेचा काही भाग गेला वाहून, लाखों रूपयांचे नुकसान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार केलेला असून नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नदीकाठावरील मालदन गावातील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील इमारत पूर्ण पाण्याखाली जावून सर्व दप्तर, संगणक, किचन शेड, बाकडी, पुस्तके, क्रीडा व इतर साहित्य वाहून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसामुळे मालदनची शाळेचा काही भाग वाहून गेलेला आहे.

मालदन येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल वांग नदीच्या काठावर आहे. वांग नदीला आजपर्यंत अनेकवेळा पुर आला असून हायस्कूलच्या मैदानावरही पाणी आले होते. पण इमारतीला कधीही धोका झाला नव्हता, पण यंदा 3 दिवस रात्रंदिवस पाऊस झाल्याने वांग नदीला मोठा पूर आला. त्यामुळे नदीच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलची इमारत पूर्ण पाण्याखाली गेली.

या शाळेतील सर्व कागदपत्रे, किर्द, खतावणी भिजून खराब झाली आहे. तर संगणक रुमधील चौदा संगणक पाण्यात जावून मोठे नुकसान झाले आहे. मुख्य इमारतीला लागूनच किचनच्या दोन खोल्या होत्या. त्या पुराच्या पाण्याने भुईसपाट होवून धान्यासह इतर साहित्य वाहून गेले. कपाटांचेही मोठे नुकसान झाले आहे. शाळेच्या ग्रंथालयातील ३ हजार ६०० पुस्तके भिजून खराब झाली असून काही वाहून गेली आहेत. याबरोबरच क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा साहित्य, नकाशे व साठ बेंचेस वाहून गेले आहेत. शाळेच्या सर्व खोल्यात गाळ साचला असून शाळेचे मोेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संस्थेचे माजी सहसचिव एस. के. कुंभार, माजी सहसचिव आर. के. भोसले यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी सरपंच भीमराव गायकवाड, माजी सरपंच आबासाहेब काळे, जोतिराज काळे, प्रशांत जंगाणी, प्रमोद ताईगडे, हवालदार तानाजी माने, मुख्याध्यापक एस. पी. तोडसम, एच. के. कुंभार, एस. जे. वाघ, सचिन पाटील, एस. व्ही. पाटील, एच. बी. आतर उपस्थित होते.

निवडणूक तिरंगी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 जागांसाठी 53 जण रिंगणात

Election

दहिवडी | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले असून 17 जागांसाठी 53 जण रिंगणात उतरले आहेत. आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर अनिल देसाई गट व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अशी आघाडी झाली आहे.

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये 17 उमेदवार निवडून द्यावयाचे असून सर्वसाधारण सोसायटी मतदार संघातून 7 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव मधील 2 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास प्रवर्गातून 1 जागेसाठी 3 अर्ज दाखल आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती मधून 1 जागेसाठी 3 अर्ज दाखल आहेत. अशा पद्धतीने सोसायटी मतदार संघातील 11 जागेसाठी उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील 2 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा असून त्यासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील 1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदार संघातील 2 जागांसाठी 6 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

बाजार समितीच्या 17 जागांसाठी एकूण 53 उमेदवार रिंगणात असून यापैकी 2 उमेदवार अपक्ष आहेत. गुरुवार दि. 29 रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच 8 ऑगस्ट रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे.

कांदाटी खोऱ्यातील 30 पेक्षा अधिक गावे आठ दिवसानंतरही संपर्कहीनच

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. आज आठ दिवस उलटून गेले तरी शिवसागर जलाशयापलीकडे असणारी कांदाटी खोऱ्यातील 30 पेक्षा अधिक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत.

कांदाटी खोरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सातारा जिल्ह्यात आहे. या परिसरातील सोनाडी, दरे, पिंपरी, आकल्पे, लामज, निवळी, वाघावळे, उचाट, मेटसिंदी, पर्वत, शिंदी, कांदाट, कांदाट बन, आरव, मोरणी, सालोशी, कुसापूर, आडोशी, माडोशी, रवदी, शेल्टी, तांबी, उत्तेश्वर, आकल्पे मुरा, लामज मुरा, पिंपरी मुरा, अहिरमुरा या प्रत्येक गावामध्ये नुकसानकारक पाऊस पडला. दरडी कोसळून रस्ते, भातशेती गाडली गेली आहे.

ओढ्याकाठी असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या भातशेतात पाणी शिरून भात खाचरे गाडली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रस्त्यावरच वीसपेक्षा अधिक ठिकाणी दरडी पडल्या आहेत. गुरुवार, दि. २२ रोजी लामज मुरा येथील संदीप गंगाराम ढेबे हे जनावरे लामज व वाघावळे गावांमध्ये असणाऱ्या माकड दरा या गावच्या डोंगरामध्ये दिवसा गुरे चारत होते. सायंकाळी चारच्या सुमारास या डोंगरात प्रचंड मोठी दरड कोसळली. संपूर्ण डोंगर कोसळला. या डोंगरात त्यांची सत्तर जनावरे गाई, म्हैशी गाडल्या गेल्या. संदीप ढेबे थोडक्यात बचावले आहेत. ते गंभीर जखमी आहेत. दीड हजार फूट डोंगरातून ते पायथ्याशी असणाऱ्या वाघावळे गावात दरडीबरोबर आले. त्यांना गावकऱ्यांनी मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी डोली करून रात्रभर डोंगरातून चालत तापोळा येथे दवाखान्यात हलविले. त्यांना बोलता येत नाही. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे.

त्या दरडीने वाघावळे गावाची अर्धी भातशेती गाडली आहे, तेव्हापासून वीज बंद आहे. फोन बंद आहेत. रस्ते बंद आहेत. कोणाचा कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या गावात काय घडले कोणाला काहीही कळत नाही. स्थानिक लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. आस्मानी संकट उभे ठाकले आहे.

जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

Jayant Patil NCP
Jayant Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची बुधवारी प्रकृतीअचानक बिघडली . त्यांना तत्काळ उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मंत्री पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले. त्यांना अस्वस्थ वातू लागल्याने त्यांच्या सहकार्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, सतेज पाटील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार सध्या मंत्री पाटील यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री जयंत पाटील हे देखील होते. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केलेली आहे. यानंतर, मंत्री पाटील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते.

दरडी कोसळून उद्ध्वस्त झालेली कुटुंबातील मुलांचाही सरकारने वेगळा विचार करावा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झालेले मोरगिरी-आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील बाधितांची आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी आज भेट घेतली. “पूर्वी नैसर्गिक आपत्ती सारखी अशी संकटे 5 ते 10 वर्षानंतर येत असत. मात्र गेल्या दोन वर्षात ही संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे धोका वाढलेला आहे, परंतु राज्यातील सरकार पुनर्वसनासाठी सकारात्मक आहे. आम्हीही पाठपुरावा नक्कीच करू असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला तर राज्य सरकारनेही दरडी कोसळून उद्ध्वस्त झालेली कुटुंबातील जी मुले राहिली आहेत. त्यांच्या भविष्याचा वेगळा विचार करावा, अशी विनंती केली.

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झालेले मोरगिरी-आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील बाधितांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमार गोरे, भारत पाटील, कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/206109574796473/

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोयना प्रकल्प ग्रस्तांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे सध्या आपल्यावरती मोठं संकट आलंय याची आम्हाला जाणीव आहे. सरकारची पुनर्वसन करण्याची मानसिकता आहे आणि ते लवकरात लवकर करून घेऊ पुढील काळात अशी आपत्ती येऊ नये यासाठी ही उपाययोजना करू.

राज्य सरकारने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करावे – देवेंद्र फडणवीस

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तालुक्यातील आंबेघर व मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त लोकांना तोकडी मदत न करता कायमस्वरूपी मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूराच्या संकटाची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस व दरेकर यांनी आंबेघर दुर्घटनेतील नुकसानग्रस्त लोकांसमवेत शाळेतच जेवण केले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी फडणवीस म्हणाले कि, आज याठिकाणी हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल. सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावी, अशी सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना केली. या नागरिकांना इतर मदत, विविध माध्यमातून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असले पाहिजे. यासाठी घरे आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर, आता लस घेतलेल्या लोकांनाही घालावे लागणार मास्क

वॉशिंग्टन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने पुन्हा कहर सुरू केला आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट वेगाने लोकांना बळी पाडत आहे. एका दिवसात 60 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत, जास्त जोखमीच्या ठिकाणी लसी घेतलेल्या लोकांना पुन्हा मास्क घालणे बंधनकारक केले गेले आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) चे संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत मास्क वर घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितले. या दरम्यान त्यांनी सांगितले की,” ही लस प्रभावी आहे, परंतु कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएन्ट मुळे पुढील संसर्गाचा धोका वाढला आहे.”

अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत कोरोनाची 61,581 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. मागील काही दिवसांत जगातील कोणत्याही देशात संक्रमित होण्याची ही सर्वात मोठी संख्या आहे.

मेच्या सुरुवातीलाच CDC ने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे मास्क घालणे बंधनकारक नसल्याची घोषणा केली. तथापि, सार्वजनिक वाहतूक वापरताना किंवा रूग्णालयात जाताना लोकांनी मास्क वापरावे असे आवाहन CDC ने केले.

आतापर्यंत जगात 19.60 कोटी प्रकरणे
आतापर्यंत जगातील 19.60 कोटीहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 41.93 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 17.76 कोटी लोकांनी कोरोनाला पराभूत केले आहे. सध्या 1.41 कोटी लोकांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 1.40 कोटी लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत तर 85,932 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानात टॅक्स वसूल करण्यास केली सुरवात, येण्याजाण्यावर द्यावा लागतो आहे इतका शुल्क

काबूल । अफगाणिस्तानातील अनेक भाग ताब्यात घेतल्यानंतर तालिबान आता लोकांकडून टॅक्स वसूल करीत आहे. स्पिन बोल्डक (Spin Bodlak) ताब्यात घेणार्‍या तालिबान्यांनी मंगळवारी नवीन टॅक्स लावला. तालिबानी लढाऊ सैनिकांनी टोल प्लाझासारखे चेकपॉईंट्स उभारले आहेत आणि ते येण्याजाणाऱ्यांकडून टॅक्स वसूल करत आहेत.

हे अशा वेळी सुरु झाले आहे जेव्हा दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या निलंबना नंतर पाकिस्तानने एक दिवस आधीच व्यापारा साठी आपली सीमा पुन्हा उघडली. अफगाणिस्तानच्या जॉइंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (PAJCCI) उपाध्यक्ष इम्रान खान कक्कर यांनी पाकिस्तानी वेबसाइट डॉनला सांगितले की, “तालिबानने 20 पानांचे एक टॅक्स डॉक्युमेंट्स जारी केले असून पाकिस्तानमध्ये देण्यात येणार्‍या विविध वस्तूंवरील टॅक्सचा देखील उल्लेख केला गेला आहे.”

त्यात म्हटले आहे की, तालिबानी अधिकाऱ्यांना टॅक्स कसा मिळतो आणि प्रत्येक आयात-निर्यातीवर त्यांनीच ठरवले आहे. 90 टक्के क्षेत्र ताब्यात घेतल्याचा दावा करणाऱ्या तालिबानचा रक्तरंजित खेळ अजूनही सुरूच आहे. यापूर्वी तालिबानी दहशतवाद्यांनी गझनीत 43 लोकांचा बळी घेतला होता.

भीषण तालिबानी हल्ल्याच्या भीतीने, हजारो नागरिकं आपली घरे सोडून काबूल येथे गेले आहेत, जे सध्या सरकारी सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. तालिबानचा धोका लक्षात घेता अफगाण सरकारने अनेक भागात नाईट कर्फ्यू लावला आहे.