Monday, December 8, 2025
Home Blog Page 3767

दादा.. डोंगर कडा अख्ख्या गावाला गिळणार हाय… आम्हाला इथ रहायच नाय; धावलीतील ग्रामस्थांची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दादा.. डोंगर..कडा अख्ख्या गावाला गिळणार… आम्हाला नाय इथ रहायच..आम्हाला सुरक्षित ठिकाणी आसरा द्या.. नायतर माळीण सारखं ढिगाऱ्याखालून आम्हाला काढण्याची यळ तुम्हावर येवू देवू नका?, असा प्रश्न महाबळेश्वर तालुक्यातील धावली येथील बाबुराव पार्टे या वयोवृद्ध आजोबांशी गावकऱ्यांनी राज्यसरकारला केला आहे. मुसळधार पावसामुळे धावली गावावर भूस्खलनामुळे दरडी कोसळण्याच्या धोका आहे. त्यामुळे अजूनही येथील सर्व ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. मायबाप शासनाने आमच्या गावचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, महाबळेश्वर तालुक्यातील धावली गावामध्ये दरड कोसळण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. गावच्या वरच्या बाजूला सुमारे ५०० फूट उंच डोंगरकडा आहे आणि त्याच्या वरती तीव्र उतार असलेला सुमारे २५० फूट उंच डोंगरकडा आहे. या दोन्ही डोंगरकडयाच्या मधल्या भागात भूस्खलन होत आहे. यामुळे प्रचंड प्रमाणावर दरड आणि माती खाली वसलेल्या धावली गावाच्या वरच्या बाजूने कोसळत आहे.

दोन्ही डोंगरकडाच्या मधील भागात भूस्खलन होत असल्यामुळे वरच्या डोंगरकड्याच्या खालील दगड मातीचा भराव कमी होत आहे. त्यामुळे वरील डोंगरकडा कोणत्याक्षणी निसटून धावली गावावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे कडे गावासाठी अत्यंत धोकादायक बनले झालेले आहेत. धावली गावाला डोंगरकाठावरील जावली तालुक्यातील डांगरेघर ग्रामपंचायत आहे. परंतु ६० घरे मात्र महाबळेश्वर तालुक्यात आहेत. त्यामुळे विचित्र अवस्थेत अडकलेल्या धावलीकरांच्या मदतीसाठी वाली कोण ? असा सवाल उपस्थित होत असून यामुळे गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न भिजत पडला आहे. याचाही विचार तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी होत आहे.

भारतीय पुरातत्व विभागाकडून आकारण्यात येणारे विद्युत शुल्क रद्द

Ajanta caves

औरंगाबाद | भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अजिंठा लेणी पाहण्यासाठी प्रवेश शुल्क सोबत लागणारे असली तर विद्युत शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अजिंठा लेणी दर्शनासाठी फक्त चाळीस रुपये शुल्क आकारला जाणार आहे. आतापर्यंत अजिंठा लेणी च्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांकडून चाळीस रुपये तिकीट आणि विद्युत शुल्क पाच रुपये असे पाणी चाळीस रुपये आकारण्यात येत होते.

आता हे विद्युत शुल्क रद्द करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. यामुळे पर्यटकांना अजिंठा लेणी येथील चित्रशैली व शिल्पकलेचा आनंद लुटता येईल. पर्यटनासाठी आलेले पर्यटक लेणीचे शुल्क बघून वैतागून माघारी परतत होते. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस तिकीट खिडकीवर असलेल्या व्यक्तीसोबत बाचाबाची होत असल्याचे दिसून येत होते. आता काही प्रमाणात पर्यटकांनादिलासा मिळाला आहे.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फर्दापुर येथील टी पॉईंट वर सुविधा शुल्‍क परत व्यक्ती दहा रुपये, बस भाडे विनावातानूकुलित बस साठी एकेरी फेरीसाठी वीस रुपये, वातानुकूलित बससाठी 30 रुपये एवढे शुल्क एसटी महामंडळाकडून आकारले जाते. आणि अजिंठा लेणी भारतीय पुरातत्व विभागाकडून 45 रुपये तिकीट आकारण्यात येत होते. आता 40 रुपये तिकीट आकारला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीमुळे मका खरेदीसाठी शासनाकडून मुदतवाढ

purchase of maize

औरंगाबाद | मका खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिलेली असून 31 जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना माल विक्रीस आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या अंतर्गत रब्बी हंगामातील मका खरेदीसाठी जिल्ह्यातील आठ केंद्रांमध्ये पुन्हा मका खरेदी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, कन्नड, करमाड, खुलताबाद, गंगापूर, सोयगाव आणि वैजापूर येथील तालुका विविध सहकारी संघाच्या केंद्रावर मका खरेदी सुरू करण्यात आली होती. त्याचबरोबर जिल्ह्यात 36 हजार क्विंटल मका खरेदीचा कोटा देण्यात आला आहे. मका विक्रीसाठी एकूण 2 हजार 495 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना माल घेऊन येण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु 165 शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला.

यामुळे फक्त चार हजार सात क्विंटल मका खरेदी होऊ शकला. आता शेतकऱ्यांकडून पुन्हा केंद्र सुरु करण्याची मागणी झाल्यामुळे शासनाकडून केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मका खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. के. पांडव यांनी केले आहे.

पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त; पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. आघाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी वारंवार आरोपही केले आहेत. आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महापूर, नुकसानीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे, अशी टीका पडळकरांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज टीका करीत ट्विटद्वारे ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे.पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे.

 

आमदार पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी मुसळधार पावसाने आतोनात नुकसान आहे. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्थांसाठी या सरकारला आपली तिजोरी उघडता येत नाही. हे सरकार नुसत्या फसव्या घोषणा करीत आहेत. मागे जेव्हा पूर आला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती. या सरकारला एवढीच विंनती आहे कि, नुकसानग्रस्थाना तत्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी.

राज कुंद्राने गेल्या 5 महिन्यात पॉर्न व्हिडिओंमधून कमावले 1.17 कोटी, 2023 पर्यंत होते 34 कोटींचे लक्ष्य

मुंबई । राज कुंद्रा पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या भूमिकेविषयी सतत विचारणा केली जात आहे. चौकशीनंतर मात्र पोलिसांनी अद्याप तिला क्लीन चिट दिली नाही. पोलिस सर्व संभाव्य बाबींची चौकशी करत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, या व्हिडिओंद्वारे त्याने 2023 पर्यंत त्याचे मोठे टार्गेट निश्चित केले होते.

पॉर्न व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्राचे घर आणि ऑफिसची झडती घेतली असता त्यामध्ये मोठा डेटा सापडला आहे. पोलिसांना त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि बरीच साधने सापडली आहेत, ज्यामुळे हे प्रकरण सोडविण्यात त्यांना मदत होईल. मीडिया रिपोर्टनुसार राज कुंद्रा या व्हिडिओंद्वारे बरेच पैसे कमावत होता आणि म्हणूनच त्याने 2023 सालासाठी आपले उत्पन्नाचे लक्ष्यही निश्चित केले होते. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून 2023 पर्यंत 34 कोटींचा नफा मिळविण्याचे त्याचे लक्ष्य होते.

वास्तविक, राज कुंद्रा आणि त्याला भेटलेली लोकं ज्या अ‍ॅपसाठी काम करतात ते पेड सब्सक्राइबर्ससाठी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने ऑगस्ट ते डिसेंबर 2020 पर्यंत हॉटशॉट्स ग्राहकांकडून 1.17 कोटी रुपये कमावले. ही कमाई Apple अ‍ॅप स्टोअरची आहे. डिसेंबर 2020 पर्यंत हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरही होते, अशा परिस्थितीत पोलिसांकडून असा अंदाज लावला जात आहे की, यातूनही त्यांना चांगली रक्कम मिळाली असेल.

पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेट बँक ऑफ इंडियाला कानपूरमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राची दोन स्टेट बँक खाती फ्रिज करण्याचे निर्देश दिले होते. या दोन बँक खात्यात कोट्यावधी रुपये जमा असल्याचे SBI अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

पूरग्रस्तांसाठी भाजप आमदार देणार एक महिन्याचे मानधन – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आमदारांनीही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे “भाजपा आमदारांचे एक महिन्याचे एक महिण्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी, मुख्यमंत्री सहायता निधीला देयाचा निर्णय घेतला आहे,”अशी माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली.

सध्या राज्यात अस्मानी संकट ओढवलेलं आहे. महापूर, दरडी कोसळण्याच्या घटनेत अनेक लोकांची कुटूंब उद्धवस्थ झाली तर अनेक जणांना जीवही गमवावे लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी भयानक घटना घडल्या आहेत. दरम्यान, या सर्व परिस्थितीमध्ये राज्य संकटात असताना सर्वजण राजकारण विसरुन आपत्तीग्रस्तांना मदत करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ आता भाजपनेही आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांचा एक महिण्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

आमदार शेलार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे कि, भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक झाली आहे. त्यामध्ये भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pornography Case : राज कुंद्राला आता तुरुंगातच रहावे लागणार, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई । पॉर्न व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला. पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीसंदर्भात आणि काही अँप्सद्वारे उघडकीस आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पने जामीन अर्ज दाखल केला होता. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज कुंद्राला आणखी काही दिवस तुरुंगातच रहावे लागणार आहे.

Pornography Case, Raj Kundra, Bombay high court, Raj Kundra bail plea reject, Raj Kundra goal, Raj Kundra porn Video, Raj Kundra earn 34 crore by 2023, Shilpa Shetty, राज कुंद्रा , राज कुंद्रा पोर्न वीडियो केस

वृत्तसंस्थेतील ANI च्या म्हणण्यानुसार मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाने राज कुंद्रा आणि रायन थॉर्पचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

यापूर्वी मंगळवारी (27 जुलै) मुंबईच्या फोर्ट कोर्टाने राज कुंद्राला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी राज कुंद्राला 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. राज कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे डेबिट खाती गोठविली गेली आहेत, अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.

मुसळधार पावसामुळे मुंबई रेल्वेचे पन्नास हजाराचे तिकीट रद्द

tapowan express

औरंगाबाद | सध्या मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी दरड कोसळत असल्यामुळे या मार्गावरील चार एक्सप्रेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी तिकीट बुक केलेल्या सुमारे पन्नास ते साठ हजार प्रवाशांनी त्यांचे तिकीट रद्द केले होते.

हजारो प्रवासी नांदेड मुंबईवर प्रवास करतात. सध्याच्या काळात एक्सप्रेस आरक्षित असल्यामुळे अगोदरच प्रवाशांना नोंदणी करावी लागते. त्याशिवाय प्रवास करता येत नाही. मुंबई येथे चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला यामुळे या मार्गावर जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. यावेळी जवळपास पन्नास हजार प्रवाशांनी नोंदणी केली होती.

आता मुंबईची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आता येणाऱ्या दिवसात पाऊसाचा अंदाज घेऊन प्रवासी तिकीट बुक करत आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या वतीने तिकीट रद्द केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा चार्ज करण्यात आला नाही.

गेल्या एक वर्षात महिलांच्या बेरोजगारीच्या दरात झाली घट, महिलांच्या रोजगाराबाबतची सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

Office

नवी दिल्ली । केंद्र सरकारने मंगळवार यांना सांगितले आहे की, महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण 2018-19 मध्ये 5.1 टक्क्यांवरून 2019-20 मध्ये 4.2 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सन 2019-20 या कालावधीत सांख्यिकी मंत्रालयाच्या (statistics ministry) कामगार दलाच्या सर्वेक्षण (labour force survey) संदर्भात केंद्र सरकारने म्हटले आहे की,”महिलांसाठी 2019-20 या कालावधीत (Labour Force Participation Rate – LFPR) 24.5 टक्क्यांवरून 30 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे 2018-19 मध्ये महिलांचा बेरोजगारीचा दर 4.2 टक्के खाली आला आहे.”

कामगार मंत्रालयाने काय म्हटले आहे ते जाणून घ्या?
कामगार मंत्रालयात (labour ministry) महिलांचा सहभाग (labour force) सुधारण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत असा दावा कामगार मंत्रालयाने केला आहे. महिलांच्या रोजगाराला प्रोत्साहित करण्यासाठी कामगार कायद्यात अनेक संरक्षणात्मक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, यामध्ये प्रसूती सुट्टी (paid maternity leave) 12 आठवड्यांपासून 26 आठवड्यांपर्यंत वाढविणे, 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये (establishments) अनिवार्य क्रॅच सुविधा (crèche facility) देण्याची तरतूद आहे, यात महिला कर्मचार्‍यांना पुरेशी सुरक्षा उपायांसह रात्रीच्या कर्तव्यासाठी परवानगी देणे समाविष्ट आहे.

रोजगार वाढविण्याचे प्रयत्न
सरकार women industrial training institutes, national vocational training institutes आणि regional vocational training institutes यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून महिला कामगारांच्या (female workers) रोजगाराची क्षमता वाढविणे तसेच महिलांना प्रशिक्षण (training) पुरवित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन 2019-20 मध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठीचा LPFR हिमाचल प्रदेशात सर्वाधिक 65 टक्के होता. त्यानंतर सिक्कीममध्ये 59.4 टक्के, छत्तीसगडमध्ये 53.1 टक्के, दादरा आणि नगर हवेली 52.3 टक्के, लडाख 51.1 टक्के आहेत.

महिनाभरात वाहन नोंदणीतुन मिळाला 14 कोटींचा महसूल

aurangabad rto

औरंगाबाद | वाहनधारकांच्या आरटीओ वारीला आता ब्रेक लागला आहे. 22 जूनपासून वाहन पासिंगचे काम वाहन विक्रेत्यांकडे सोपवण्यात आले होते. यामुळे वाहनधारक वाहन विक्रेत्यांकडूनच पासिंग करून घेत असल्यामुळे त्यांना आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहिली नव्हती. परंतु वाहन नोंदणी साठी लागणारे शुल्क रोड टॅक्स ऑनलाईन आरटीओ कार्यालयात भरावे लागते.

22 जून ते 22 जुलै या महिन्यात वाहन नोंदनीमधून आरटीओ कार्यालयाला सुमारे 14 कोटीचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली. वाहन पासिंग चे काम वाहन विक्रेत्यांकडे सोपवल्या मुळे आरटीओ कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण देखील कमी झाला आहे.

कोरोना महामारी च्या काळात सार्वजनिक वाहणापेक्षा स्वतःच्या चारचाकी वाहनांकडे अनेकांचा कल वाढला होता. त्याचबरोबर दुचाकी ऐवजी चार चाकी वाहन घेण्यासाठी नागरिक पसंती देत असल्यामुळे वाहन विक्रेत्यांकडून 100 च्या जवळपास वाहनांची पासिंग होत होती. सध्या दोनशे वाहनांची नोंदणी होत असून चारचाकी तीनचाकी आणि दुचाकीसह इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती मेत्रेवार यांनी दिली.