Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6704

भारतातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी अन्ना मल्होत्रा यांचे निधन

Anna Malhotra
Anna Malhotra

मुंबई | भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या श्रीमती अन्ना राजम मल्होत्रा यांचे त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आज दुख;द निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.

अन्ना यांचा जन्म केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यामधे १९२७ साली झाला होता. कोझीकोड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्ना यांनी मद्रास विश्विद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. अन्ना या १९५१ साली भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या. त्या मद्रास केडर च्या आय.ए.एस. अधिकारी होत्या. भारतीय रिजर्व्ह बॅकेचे माजी गव्हर्नर आर.एन. मल्होत्रा यांच्या अन्ना या पत्नी होत्या.

मुंबई जवळील जवाहरलाल नेहरु बंदराच्या स्थापनेत अन्ना यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्ष्या म्हणूनही काही काळ काम पाहीले. १९८२ साली दिल्ली येथे भरलेल्या आशियायी स्पर्धांवेली त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबत काम केले. १९८९ मधे अन्ना यांना पद्मभूषन पुरस्काराने गौरवण्यात आले.

लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोलीसांना धक्काबुक्की

राजा
राजा

मुंबई | परळ येथील लालबागचा राजा चे दर्शन घेण्यासाठी भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना नीट वागणूक मिळत नाही अशी दरवर्षीची तक्रार असते. यंदाही असाच प्रकार घडला असून लालबागचा राजा मंडलाच्या कार्यकर्त्यांनी चक्क पोलीसांनाच धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला आहे.

दर्शनासाठी रांगेत उभे राहीलेल्या भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होते. महीला आणि वृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या मनात मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिळणार्या वाईट वागणूकी बद्दल असंतोष असून बर्याचदा नागरीकांनी त्याविरोधात आवाज उठवत पोलीसांत तक्रार देखील केली आहे.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारकिर्दीत असाच प्रकार घडला असता त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दम भरला होता. तसेच गरज पडली तर मंडळावर गुन्हे दाखल करण्याची तयारी दर्शवली होती.

ट्रायल रुममधे विदेशी तरुणीसोबत अश्लील चाळे

Forgner assaulted in nagpur mall
Forgner assaulted in nagpur mall

नागपूर | भारतातील गणेशोत्सव पाहण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटक तरुणीला नागपूरातील एका माॅलमधे अश्लील चाळ्याला सामोरे जावे लागले आहे. नागपूर येथील इटर्निटी माॅलमधील एका कपड्याच्या दुकानातील ट्रायल रुममधे हा प्रकार घडला आहे. पिडीत तरुणी २२ वर्षांची असून मुळची थायलंडची राहणारी आहे. तरुणीच्या मित्राने पोलीसांत तक्रार केल्यानंतर संबंधीत आरोपींवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

हाती आलेल्या माहीतीनुसार, घटनेतील तक्रारदार मित्र एकवर्षापूर्वी कामानिमित्त थायलंडला गेला असता त्याची पिडीत तरुणीशी ओळख झाली होती. या तरुणीने महाराष्ट्रातील गणेशेत्सवाबद्दल इंटरनेटवर बरेच काही वाचले होते. तिला हा गणेशोत्सव पाहायचा होता. काही दिवसांपूर्वी ती नागपूरला आली. पिडीत तरुणी आणि तिचा मित्र रविवारी सायंकाळी कपडे खरेदीसाठी नागपूरातील इटर्निटी माॅलमधे गेले होते. यावेळी एफबीबी शोरूममधे कपडे ट्राय करुन पाहण्यासाठी पिडीत तरुणी ट्रायल रुममधे गेली. परंतू काही अडचण आल्यामुळे तिने तेथे कार्यरत असलेल्या जयशील प्रीतमसिंह परिहार (वय २३) याला आवाज दिला. मदतीचा बहाणा करुन जयशील सरळ ट्रायल रुम मधे घूसला आणि त्याने तरुणीशी अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. जयशीलने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने तरुणीने आरडाओरडा केला. यावेळी तरुणीचा मित्र आणि जवळपास असलेले लोक तिच्या मदतीसाठी धावून गेले.

प्रियांका चोप्राला दम्याचा आजार

zfpkslwloo
zfpkslwloo

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला दम्याचा आजार असल्याचे तिने नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत असताना प्रियांकाच्या या ट्विटने बाॅलिवुडमधे एकच खळबळ उडवून दिली आहे.

‘जे मला जवळून ओळखतात त्यांना हे माहीत आहे की मला दमा आहे’ असे प्रियांकाने ट्विट मधे म्हणले आहे. त्यात लपवण्यासारखे काय आहे? असा सवालही प्रियांकाने केला आहे. ‘मला माहित आहे की दम्याने मला रोखण्यापूर्वी मलाच दम्याला रोखणे गरजेचे आहे. जोपर्यंत माझ्यासोबत माझा इनहेलर आहे तोपर्यंत अस्थमाचा आजार मला माझ्या कोणत्याच स्वप्नांपासून रोखू शकत नाही’ असेही प्रियांकाने सदरील ट्विट मधे म्हटले आहे.

 

लालबागच्या राजाला भक्ताकडून ४२ लाखांची सोन्याची मुर्ती दान

Lalbaughcha Raja
Lalbaughcha Raja

मुंबई | परळ मधील लालबागच्या राजाला दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात दान करतात. यंदा एका गणेशभक्ताने चक्क ४२ लाखांची सोन्याची मुर्ती दान केली आहे.

सदर सोन्याची मूर्ती पूर्णपणे भरिव असून मुकुट हिरेजडीत असल्याचे सांगीतले जात आहे. लालबागच्या राजाची ही प्रतीकृती १ किलो २ ग्रेमची असून मुकुटातील हिरा १ लाख रुपयांचा आहे. अतिशय आकर्शक आहे.

मागील वर्षी भाविकांनी लालबागच्या राजाला ६ कोटी ७५ लाखांचे दान केले होते. त्यामधे प्रामुख्याने सोने आणि चांदीच्या हिरेजडीत मुर्तींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ठरले जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ

Mumbai Airport
Mumbai Airport

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ ठरले अाहे. नुकतेच मुंबई येथील आंतराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ म्हणुन गौरवण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांनी मुंबई विमानतळाला चांगले गुण दिल्याने हा पुरस्कार देण्यात आल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी म्हटले आहे. कॅनडामध्ये झालेल्या कार्यक्रमात चषक स्विकारताना ते बोलत होते.

एसीआय ही हवाई वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असून जगातील १७८ देशांमध्ये १,९५३ विमानतळे त्याचे सहयोगी आहेत. हवाई प्रवाशांना समाधानकारक सेवा देऊन प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांच्या आधारे ३४ मुद्द्यांवर संस्थेतर्फे जगातील विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्वेक्षण करण्यात आले व त्यामध्ये मुंबई विमानतळाची सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड करण्यात आली. चेक इन, सुरक्षा तपासणी विश्रांतीगृह, रेस्टॉरन्टस व इतर मुद्द्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

पंतप्रधान स्वत:च्या प्रेमात पडलेले ‘प्रसिद्धी विनायक’, राज ठाकरेंचा टोला

Narendra Modi
Narendra Modi

मुंबई | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रामधून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी व्यंगचित्र काढून मोदी हे स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले प्रसिद्धी विनायक असल्याचे म्हटले आहे.

शाळांमध्ये मुलांना नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित ”चलो जीते है” हा लघुपट दाखवण्याची जबदस्ती करण्याच्या या निर्णयावर राज ठाकरे यांनी मोदींना घेरले आहे. मोदींनी काल आपला ६८ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे मोदींना स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक म्हणून संबोधले आहे. या चित्रात राज ठाकरे यांनी गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शहांचीही खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे त्या गणपतीला मोदी स्वत: ओवाळत आहेत. यावेळी बाजूला अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही नेहमीची मंडळीही उपस्थित आहे.

या चित्रात गणेशमूर्तीत दाखवलेल्या नरेंद्र मोदी यांच्या चार हातात वेगवेगळ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहे . त्यापैकी एका हातात वर्तमान पत्रे , दुसऱ्या हातात काही मीडिया प्रतिनिधींचे कॅमेरे , तिसऱ्या हातात पक्षनिधीसाठी पावती पुस्तक तर चौथ्या हातात ईव्हीएम मशिन आहे . या चारही बाबींचा मोदींकडून होत असलेला दुरुपयोग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे

वैचारिक गढूळता दूर करण्यासाठी विवेकवाहिन्या हव्यातच – प्रा सुभाष वाघमारे

IMG WA
IMG WA

पाचवड | विवेकवाहिनीची स्थापना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व महाराष्ट्रातील विचारवंत शिक्षणतज्ञांची देणगी असून आज सभोवतालची गढूळता दूर करण्यासाठी विवेकवाहिन्या हव्यातच, असे मत विवेकवाहिनीचे प्रसारक प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड येथे विवेकवाहिनी व अर्थशास्त्र विभाग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात,” विवेकवाहिनी का आणि कशासाठी ” या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र देशमुख तर गणेश तारू हे प्रमुख उपस्थित होते

विवेकवाहिनीबाबत बोलताना पुढे ते म्हणाले की विवेकवाहिनी हे महाविद्यालयातील विचारी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संघटन आहे, महाराष्ट्र विवेकवाहिनीशी ते संलग्न आहे,“आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी” हे विवेकवाहिनीचे ब्रीद वाक्य आहे. विवेक वाहिनीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यानी नियमित व्यायाम, नियमित ललित व वैचारिक ग्रंथाचे वाचन, वर्षातून एकदा तरी खादीचे कापड घेणे, निर्व्यसनी राहणे, आणि दर महिन्यास होणारया बैठकीस उपस्थित राहून समस्यांवर चर्चा करून विधायक विचार व विधायक कृती करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले
विवेकवाहिनीचे तत्वज्ञान कोणताही धर्म नसून वैज्ञानिक दृष्टिकोण आहे व त्यावर आधारित मूल्यात्मक विचार म्हणजेच विवेक होय. भारतीयत्व घडवण्यासाठी विवेकवाहिनी महत्वाची ठरत आहे. भारतीय संविधानाच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी विवेकवादी विद्यार्थी हवे आहेत, धर्मांध किंवा अविवेकी विद्यार्थी देशात खून, जाळपोळ,बलात्कार, चोऱ्या किंवा बाँम्बस्फोट अशा कारवाया करत आहेत. स्वत:च्या व जगाच्या प्रश्नांची जाणीव होऊन, विवेकी प्रगल्भतेने देशात व जगात सुखी जीवन जगण्यासाठी विवेकवाहिनी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असले तरी, अनेक अविवेकी घटना या राज्यात घडत आहेत म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक महाविद्यालयात विवेकवाहिन्या उभ्या कराव्यात, असे आवाहनही त्यानी केले
प्रदीप शिंदे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन एवढेच विवेकवाहिनी करत नसून जगण्याच्या प्रत्येक प्रश्नांचा विचार विवेक वाहीनीत करणे आवश्यक असते, असे मत व्यकत केले, प्रभारी प्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख म्हणाले की भारतीय लोकांकडे ज्ञान पूर्वीपासून आहे, ते आपण तपासून घेतले पाहिजे त्यासाठी संशोधनवृत्ती वाढीस लागली पाहिजे.

व्याख्यानाच्या प्रारंभी विवेकवाहिनीच्या कार्याध्यक्षा प्रा राणी शिंदे यांनी प्रास्ताविक केले, विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्या विद्यार्थिनी कु.रिया मोरे व प्रा दीपाली पोळ यानी सूत्र संचालन केले, परिचय कु.शीतल ठोंबरे हिने करून दिला तर कु.कार्तिकी भोसले हिने आभार मानले, या कार्यक्रमास प्रा. तृप्ती नाईक, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते

मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध- मुख्यमंत्री फडणवीस

मुक्तिसंग्राम दिन
मुक्तिसंग्राम दिन

औरंगाबाद | अमित येवले

मराठवा़डा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी मराठवा़डा मुक्तीसंग्राम दिना निमित्त औरंगाबाद येथे ध्वजारोहण आणि ‘अग्रेसर मराठवाडा ‘ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील ४ वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजीवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग,ऑरिक सिटी,मराठवाडा वॉटरग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे.

मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहिम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत राहु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी परिवहनमंत्री रावते , महापौर नंदकुमार घोडीले , मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने..

ARTICLE COVER PIC
ARTICLE COVER PIC

हैदराबाद संस्थान व मराठवाडा मुक्तिदिन विशेष| धनंजय सानप

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या गुलामगिरीतुन स्वतंत्र झाले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र काही संस्थानानांचे पेच निर्माण झाले होते. त्यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, जूनागढ़ आणि हैद्राबाद ही संस्थाने होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १ वर्ष १ महीना २ दिवसानंतर हैद्राबाद संस्थान निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाले व स्वतंत्र भारतात विलीन झाले. हैदराबाद संस्थानामधे त्यावेळी सध्याचे तेलंगाना राज्य, महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग आणि कर्नाटकातील बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ आणि गुलबर्गा (या भागाला आज हैद्राबाद कर्नाटक म्हणले जाते) या जिल्ह्यांचा समावेश होता. महाराष्ट्रात हैदराबाद मुक्तिसंग्रामाला मराठवाडा मुक्तीसंग्राम असेही म्हणतात. मराठवाड्यातल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मराठवाड्याच्या मुक्तिसाठी आपलं सर्वस्व पणाला लावले होते.

हैद्राबाद संस्थानचा मुक्तिदिन १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून मराठवाड्यात मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. या लढ्यात मुक्तीसंग्रामासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आठवणीला उजाळा देत राष्ट्रीय ध्वज गावोगावी फडकवला जातो. हा साधारण आणि किमान महाराष्ट्राला माहित असावा इतका साधा आणि सरळ इतिहास आहे. पण ही अपेक्षा ठेवणं म्हणजे धाडसाचं काम आहे.

मागच्या काही वर्षात मराठवाडा म्हटलं की आठवतो तो दुष्काळ, शिक्षणाचा घसरलेला टक्का, बालविवाह, हुंडाबळी, जातीयवाद, राजकारण तसेच सामाजिकीकरणाची मंदावलेली गती, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण आणि पुणे मुंबई सारख्या शहरात उपजीविकेचं साधन मिळावं म्हणून
मराठवाड्यातुन स्थलांतरीत होणारे लोंढे. कुशल कामगार नाहीत, आरोग्याचे प्रश्न असंख्य आहेत, शेतीबद्दल वाढत जाणारी उदासिनता, वाढत जाणाऱ्या औद्योगिकीकरणाच्या रेट्यामुळे निर्माण झालेले पर्यावरणाचे प्रश्न. विकास काय असतो? कसा असतो? हे माहीत नसल्याने साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीला भारावून जाणं इथल्या माणसांच्या अंगवळणी पडलेलं आहे.

हा ‘नाही’चा पाढा वाचल्यानंतर मग मराठवाड्यात आहे काय? असा प्रश्न पडणं देखील साहजिक आहे. मराठवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातुर, हिंगोली, नांदेड असे आठ जिल्हे आहेत. या पैकी औरंगाबाद, नांदेड आणि लातुर हे जिल्हे बऱ्यापैकी विकसित आहेत तर परभणी, जालना हे जिल्हे विकसनशील आहेत. बीड, उस्मानाबाद आणि हिंगोलीचं चित्र मात्र समाधानकारक नाहीये.

राजकीय क्षेत्रात राष्ट्रीयस्तरावर मराठवाड्याचं नाव घेऊन जाणारे शिवराज पाटील-चाकूरकर, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, पद्मसिंह पाटील असे नेते इथे निर्माण झाले. मात्र राजकीय स्वार्थासाठी विकास या संकल्पनेला मर्यादित स्वरुपात बंदिस्त करून ठेवलं गेलं. घराणेशाहीचा प्रभाव इथल्या राजकारणात प्रभावी आणि परिणामकारक ठरलेला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात मोठं योगदान मराठवाडी लेखक साहित्यिकाचं आहे. दलित साहित्यात देखील मराठवाड्यातील साहित्यिकांचा मोलाचा वाटा आहे.
कला, खेळ, संगीत, नाटक, चित्रपट यामध्ये नव्याने संधी निर्माण करणारी पिढी पुढे येऊ लागली आहे. औरंगाबाद हे मराठवाड्यातलं मोठं आणि झपाट्याने वाढणारं शहर आहे. मराठवाड्यातल्या सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचं केंद्र असलेले औरंगाबाद शहर वेरूळ-अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जात आहे. संत परंपरा आणि प्राचीन लेणी यांचा वारसा या भूमित आहे. वैचारिक वारसा जपणारी मोठी मंडळी इथल्या भूमित जन्मली.

मराठवाड्यातल्या बोलीभाषा या प्रमाणभाषेच्या जवळ जाणाऱ्या आहेत. आणि त्यात पण जिल्ह्यानुसार बोलींचे वैविध्य आहे. खाद्यसंस्कृतीवर निजामाचा प्रभाव दिसतो तोच प्रभाव रहाणीमानावरही दिसून येतो. मराठवाड्यातील माणसं नवाबी शैलीत जगताना दिसतील. आणि याच्या उलट धावपळ न करता मिळेल त्यात समाधान शोधणारा माणूसही इथे भेटेल. बोलताना सहज ‘च्या मायला’ म्हणणं आणि रिकामटेकडी हौस लोकांच्या स्वभाववृत्तीत दिसून येते. लोक धार्मिकवृतीचे आहेत संतांची भूमी असल्याने वारकरी संप्रदायाचा मोठा अनुयायी वर्ग या भागात आहे. पंढरपुरच्या पांडुरंगाला दैवत मानणारा हा शेतकरी, कष्टकरी वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे.

इतकी विविधता असून देखील विकासाच्या दृष्टिकोनातुन विचार केला तर मात्र विकासाच्या बाबतीत मराठवाडा महाराष्ट्रातील इतर प्रदेशापेक्षा खुप मागे असल्याचं दिसतं. याला जबाबदार जसे इथले राजकीय नेते आहेत तशीच लोकंसुद्धा या अवस्थेला जबाबदार आहेत हे नकारता येत नाही.
विकासाचा आलेख प्रगतीच्या दिशेला घेऊन जायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभाग याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन येत राहणार आणि आम्ही मात्र एक दिवस साजरा करून पुन्हा दुसऱ्या दिवशी बोंबलत बसणार हे काही राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासासाठी परिणामकारक ठरणार नाही !
ढोबळमनाने केलेली मांडणी सुद्धा वास्तवाजवळ जाते हे लक्षात घ्या.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन चिरायु होवो..

७० व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या प्रेमळ सदिच्छा..!

Dhananjay Sanap

धनंजय सानप