PAK vs AFG: आणि नबीने भर पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला केले गप्प, व्हिडीओ पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शुक्रवारी T20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा पाकिस्तानकडून 5 विकेट्सने पराभव झाला (PAK vs AFG T20 World Cup 2021). एकेकाळी अफगाणिस्तान धक्कादायक निकाल नोंदवेल असे वाटत होते. मात्र 19 व्या षटकात आसिफ अलीने 4 षटकार मारत सामन्याला कलाटणी दिली आणि अखेर पाकिस्तानने विश्वचषकातील विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

सामन्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने आपल्या देशाच्या पाकिस्तानशी असलेल्या राजकीय संबंधांबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नबीने अत्यंत प्रेमाने त्या पत्रकाराची बोलती बंद केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रकाराची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि हेतू यावर लोकं शंका घेत आहेत. तुम्ही पण ऐका, पत्रकाराने नबीला कोणता प्रश्न विचारला आणि त्याने काय उत्तर दिले.

मोहम्मद नबीने पत्रकाराची बोलती बंद केली
पत्रकार परिषदेत पत्रकाराने नबीला विचारले गेले की, अफगाणिस्तानचा संघ खूप छान खेळतोय. दोन्ही सामन्यांमध्ये आपल्या संघाची कामगिरी चांगली झाली आहे. कुठेतरी अशी भीती आहे की, तुमच्या पाठीमागे असलेल्या सरकारची परिस्थिती बदलली आहे, मग तुम्ही परत गेल्यावर तुमची विचारपूस केली जाईल की असा काही दबाव आहे का?” वास्तविक, पाकिस्तान अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडे बोट दाखवत होता.

यानंतर पत्रकार पुढे म्हणाला की,” माझा दुसरा प्रश्न आहे की, हे नवीन युग सुरू झाले आहे. यामध्ये अफगाणिस्तानचे पाकिस्तानशी संबंध चांगले आहेत, त्यामुळे हे संबंध सुधारले तर अफगाणिस्तान संघ मजबूत होईल का?”

‘परिस्थिती सोडून फक्त क्रिकेटवर बोला’ – नबी
या दोन प्रश्नांवर नबीने स्पष्टपणे उत्तरे दिली. तो म्हणाला की,” आपण परिस्थिती सोडून क्रिकेटबद्दल बोलू शकतो का?” यावर पत्रकार पुन्हा म्हणाला की,” मी फक्त क्रिकेटबद्दलच प्रश्न विचारत आहे.” यावर नबी म्हणाला की, आम्ही येथे वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलो आहोत. आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो आहोत. पूर्ण आत्मविश्वासाने इथे आलो. तुम्हाला क्रिकेटशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.”

नबीने वारंवार नकार देऊनही, पत्रकार त्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत राहिला. दोघांमधील वाढती भांडणे पाहून पत्रकार परिषद हाताळणाऱ्या आयसीसी अधिकाऱ्याने पत्रकाराला दुसरा प्रश्न विचारण्यास सांगितले. मात्र पत्रकाराला ते मान्य नव्हते. यानंतर नबी पत्रकार परिषद सोडून निघून गेला.

पाकिस्तानने हा सामना 5 विकेटने जिंकला
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून आसिफ अलीने 7 चेंडूत 25 धावा केल्या. त्याने 4 षटकार मारले. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग तिसरा विजय ठरला.

Leave a Comment